विधानसभा निवडणुका जवळ येताच आमदार प्रशांत बंम यांचे शिक्षकांविषयीचे सूर बदलले mla prashant bamb news 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा निवडणुका जवळ येताच आमदार प्रशांत बंम यांचे शिक्षकांविषयीचे सूर बदलले mla prashant bamb news 

विधानसभा निवडणुका राजकीय नेत्यांना काय काय करायला लावतील? याचा काही नेम नाही. आता हेच पहा ना, ज्या भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी वर्षभरापुर्वी मुख्यालयी हजर राहत नाही, असा आरोप करत शिक्षकांवर कारवाईसाठी राज्यभर रान पेटवले होते, त्याच बंब यांना विधानसभा निवडणुका येताच गुरुजनांची आठवण झाली.

आताच शिक्षक दिन राज्यभरात साजरा झाला. या निमित्ताने गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघातील म्हैसमाळ येथे शिक्षकांचा स्नेह मिलन मेळावा घेतला.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिक्षकांचे पाद्यपूजन करत बंब यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

या चर्चेचे कारण म्हणजे प्रशांत बंब यांनी राज्यातील शिक्षक आपल्या मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे, त्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला होता.

अगदी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत प्रशांत बंब यांनी आक्रमक भाषण करत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे वेतन, पदोन्नती रोखण्याची मागणी केली होती.

बंब यांचा मुद्दा रास्त होता, पण त्यामुळे शिक्षक आणि त्यांच्या संघटना दुखावल्या गेल्या. अगदी बंब यांच्या विरोधात मोर्चे, त्यांना फोन वरून जाब विचारण्याचे प्रकारही घडले.

बंब यांना शिक्षक विरोधी ठरवत राष्ट्रवादीच्या मराठवाडा पदवीधर व शिक्षक मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे यांनीही मोर्चा काढला होता.

शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने महाराष्ट्राच्या विधानसभेत पदवीधर आणि शिक्षक आमदार नकोच, त्यांची पद रद्द करा, अशी मागणी करत प्रशांत बंब यांनी खळबळ उडवून दिली होती.

पुढील काही दिवस आमदार बंब यांनी शिक्षकांवर कारवाईसाठी पाठपुरावाही केला. पण कालांतराने ते काहीसे मवाळ झाले आणि हा मुद्दा मागे पडला.

आता दोन महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. (BJP) आमदार बंब यांच्या मतदारसंघात मराठवाडा पदवीधरचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षापासून जोरदार तयारी सुरू केली आहे.

पदवीधर आमदारच नको, अशी भूमिका घेणाऱ्या बंब यांनाच घरी बसवण्याचा विडा सतीश चव्हाण यांनी उचलला.

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाच्या निकालाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे विरोधक कितीही अंगावर आले, तर त्यांना गार करण्याची क्षमता बंब बाळगून असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

एकदा अपक्ष आणि दोन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार झालेले प्रशांत बंब हे धुर्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. राज्यातील भाजप नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मर्जी असल्याने बंब

यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघात निधी, योजना आणल्या. पण

शिक्षकांच्याविरोधात तेव्हा घेतलेली भूमिका आता निवडणुकीत

अडचणीची ठरू नये, याची काळजी बंब यांच्याकडून घेतली जात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खास मर्जी असल्याने बंब यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघात निधी, योजना आणल्या. पण शिक्षकांच्याविरोधात तेव्हा घेतलेली भूमिका आता निवडणुकीत अडचणीची ठरू नये, याची काळजी बंब यांच्याकडून घेतली जात आहे. शिक्षक दिनी स्नेह मिलन मेळाव्याचे आयोजन हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारी व्यक्ती म्हणजेच आपले शिक्षक ! असे म्हणत बंब यांनी शिक्षक दिनी शिक्षकांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान केला.

देशाचे भवितव्य घडविणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक शुभेच्छा देत त्यांचे आभार मानले! चला, भावी पिढी सक्षम बनविणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूयात, अशा भावना यावेळी बंब यांनी व्यक्त केल्या.

आता बंब यांना आलेली ही उपरती म्हणायची ? की शिक्षकांचा त्यांनी केलेला सन्मान कोणाताही राजकीय हेतू मनात न ठेवता केला? याची राजकीय वर्तुळाच चर्चा होत आहे.