प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ऑनलाईन सुविधांबाबत करावयाच्या कार्यवाही बाबत mid day meal shasan paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये ऑनलाईन सुविधांबाबत करावयाच्या कार्यवाही बाबत mid day meal shasan paripatrak 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती सर्व जिल्हयातील शाळांनी सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. याकरीता योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व शाळांचा समावेश एमडीएम पोर्टल (https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/) (https://pmposhan.education.gov.in/) पोर्टलवर असणे आवश्यक आहे. तसेच केंद्रशासनाच्या एम.आय.एस

माहे एप्रिल, २०२५ पासून योजनेअंतर्गत करावयाचे सर्व ऑनलाईन कामकाज सुरुळीत आणि अचूक होणेकरीता खालीलप्रमाणे निर्देश जिल्ह्यांना देण्यात येत आहेत.

१. योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांची नोंद उक्त नमूद दोन्ही पोर्टलवर असल्याची खात्री सर्व जिल्ह्यांनी करुन

घ्यावयाची आहे. खात्री करतांना युडायस क्रमांकाची देखील पडताळणी करणेत यावी.

२. जिल्ह्यामध्ये अनुदानास पात्र झालेल्या सर्व शाळांचा समावेश विहित प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन माहे एप्रिल, २०२५ अखेर पोर्टलवर करुन घेण्यात यावा तद्नंतर कोणत्याही नवीन शाळांचा समावेश पोर्टलवर करता येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

३. एम.डी.एम पोर्टलवर शाळांचा समावेश करणे किंवा एखादी शाळा Deactivate करण्याची ऑनलाईन सुविधा जिल्हा लॉगिनवर “Change Basic Info” या टॅब अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

४. प्रति वर्षी प्रमाणे माहे एप्रिल, २०२५ मध्ये सर्व शाळांची Annual Data Entry करुन घेण्यात यावी. Annual Data Entry करतांना विहित नमुन्यातील नमुना सर्व शाळांकडून अचूकपणे भरुन घेण्यात यावा. नमुन्यातील सर्व मुद्यांची माहिती अचूकपणे पोर्टलवर नोंदविली जाईल (उदा. वर्गवारी निहाय पटसंख्या, आधार माहिती, स्वयंपाकी माहिती, भौतिक सुविधांची माहिती इत्यादी) तसेच याचे सनियंत्रण तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी करावयाचे असून सदरचे काम दि. ३० एप्रिल, २०२५ पूर्वी पूर्ण करावयाचे आहे.

५. तालुकास्तरावर योजनेस पात्र सर्व शाळांकडे एम.डी.एम पोर्टलचे लॉगिन आयडी, पासवर्ड, मोबाईल अॅप इत्यादी असल्याची खात्री करुन घ्यावी तसेच संबंधितांकडे त्याबद्दलची माहिती असल्याची खात्री तालुक्यांनी करावयाची आहे.

६. केंद्रीय स्वयंपकागृह संस्थांना देखील नियमित माहिती पडताळणी करणेकरीता लॉगिन उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, तथापि आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत सर्व केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना याबाबत अवगत करुन देण्यात यावे.

७. जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे प्रत्येक कार्यदिवशी विद्यार्थ्यांना दिलेल्या लाभाची माहिती एम.डी.एम पोर्टलवर नोंदवित असल्याची दररोज खात्री करणेत यावी. जिल्ह्यातील १०० टक्के शाळांची माहिती नियमितपणे भरली जाईल याकरीता सूक्ष्म नियोजन करण्यात यावे व सर्व क्षेत्रीय यंत्रणांचा वापर करणेत यावा.

८. प्रत्येक महिन्याच्या शेवटी सदर महिन्याची एकत्रित लाभाची माहिती केंद्रशासनाच्या एम.आय.एस पोर्टलवर त्यापुढील महिन्याच्या १० तारखेपूर्वी भरण्यात यावी.

९. शाळा तसेच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना पोर्टल संदर्भात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्याचे त्वरीत निराकरण करण्यात यावे तसेच वरिष्ठ कार्यालयास यासंदर्भात त्वरीत अवगत करुन देण्यात यावे.

Join Now