राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत mid day meal shapoaa yojana
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.
२. संचालनालयाचे पत्र क्र. जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण/ २०२३-२४/ ०३२१७, दिनांक २२/०४/२०२४.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, धुळे यांचे पत्र जा.क्र. धुजिप/ शिविप्रा/शापोआ/१६५/२०२४, दिनांक २४/०४/२०२४.
शासनाने सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील ४० तालुक्यांमध्ये संदर्भिय शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित केलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत. त्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्याचे निर्देश संदर्भिय पत्रान्वये आपणांस दिले आहेत. सदर दिर्घकालीन सुट्टीच्या कालावधीमध्ये योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपणांस खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. दिर्घ सुट्टी माहे मे व जून २०२४ कालावधीकरीता शासकीय सुट्टया वगळून इतर कार्यदिन विचारात घेऊन कार्यवाही करावी.
२. दिर्घ सुट्टी कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना शाळास्तरावर शिजविलेला आहार उपलब्ध करुन देणेकरीता मुख्याध्यापक/शिक्षक (किमान १ जण) शाळेत उपस्थित राहील. याबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.
३. सद्यस्थितीत राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ हा सकाळ सत्रामध्ये (सकाळी ०९:३० वाजेपर्यंत) देण्यात यावा. तद्नंतर विद्यार्थ्यांना घरी पाठवावे.
४. शाळा प्रशासनाने आहार शिजविणेकरीता स्वयंपाकी/मदतनीस यांना तशा सूचना द्याव्यात.
५. शाळास्तरावर आहार शिजवून दिलेल्या कालावधीकरीता स्वयंपाकी/मदतनीस मानधन अदा करण्यात येणार आहे.
६. विद्यार्थी शाळेत उपस्थित राहून लाभ घेत असतील तर त्याची माहिती (विद्यार्थ्यांनी आहार घेतलेबाबतची माहिती) दैनंदिनरित्या ऑनलाईन पोर्टलवर भरली जाईल याची दक्षता घेण्यात यावी.
७. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आहार उपलब्ध करुन देण्याकरीता आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय यंत्रणेस आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात.
८. ४० दुष्काळग्रस्त घोषित तालुक्यातील विद्यार्थी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत, याबाबत दक्षता घ्यावी.