शालेय पोषण आहार मेनू कार्ड mid day meal menu card
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नविन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना लाभ देणेबाबत.
संदर्भ
: १) शासन निर्णय क्रमांक शापोआ-२०२२/प्र.क्र ११७/एस.डी-३ दिनांक ११.०६.२०२४ २) मा. शिक्षण संचालक (प्राथ) महा. राज्य पुणे यांचे पत्र क्रमांक ०४३८५/२४
दि. २५.६.२०२४
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ वरील शासन निर्णयान्वये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन तीन संरचित आहार (Thred Course Meal) पध्दतीमध्ये एकुण १५ प्रकारच्या पाककृतींच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता दिलेली आहे.
उपरोक्त शासन निर्णयातील मुद्या क्रमांक १० अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आठवडयातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची आहे. याबाबत निर्णय घ्यावयाचा आहे.
शालेय पोषण आहार मेनू कार्ड येथे पहा Click here
या पत्रासोबत उपरोक्त १५ पाककृती आणि कोणत्या दिवशी कोणती पाककृती करावयाची यांचे विवरण पत्रे सोबत जोडलेले आहेतः त्यानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना लागु असलेल्या शाळामध्ये सोबत दिलेल्या पाककृतीनुसार दैनंदिन आहारं शिजवून देण्याबाबत मुख्याध्यापक यांना • आपल्यास्तरावरुन निर्देश देण्यात यावेत.