MDM ऑनलाईन पोर्टल बंदमुळे मागील माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देणेबाबत mid day meal application
MDM ऑनलाईन पोर्टल बंद असणे बाबत
अर्जदार – मुख्याध्यापक जि.प.प्रा.शाळा …
महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयांवर आपणास विनंती करण्यात येते की मागील महिन्यापासून MDM संदर्भात बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत. वारंवार याबाबत चौकशी करून कोणत्याही स्वरूपाची माहिती मिळत नाही. शालेय पोषण आहाराचे MDM APP बंद असून त्यावरून कोणत्याही स्वरूपाची माहिती ऑनलाइन भरली जात नाही. तसेच पोर्टलवरूनही माहिती भरता येत नाही. बऱ्याच बांधवांचे मोबाईलचे अँड्रॉइड 15 हे हे NEW VERSION अपडेट केल्यानंतर शालेय पोषण आहाराचे अॅप काम करणे बंद करते किंवा ऑनलाइन माहितीही भरली जात नाही.
त्यामुळे शालेय पोषण आहाराचे ऑनलाइन माहिती न भरल्यामुळे बिलाबाबतची साशंकता निर्माण होत आहे. त्यामुळे शालेय पोषण आहाराची ऑफलाईन बिले गृहीत धरून पोषण आहाराचे बिल जोपर्यंत ऑनलाइन सुविधा सुरळीत होत नाही तोपर्यंत काढण्यात यावे. तसेच शालेय पोषण आहार तील MDM अॅप संदर्भातील त्रुटी दूर करून जेव्हा नवीन एप्लीकेशन डाउनलोड होईल, तेव्हा मागील माहिती ऑनलाईन भरण्याची सुविधा जिल्हास्तरावरून उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात येत आहे.