प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरणबाबत mid day meal
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरीता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत…..
संदर्भ:-१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२४२३/(९३/२३)/अर्थसंकल्प, दि.२८ ऑगस्ट, २०२३.
२) शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा प्रस्ताव क्र. प्राशिसं/ पीएमपोषण/२०२३-२४/०५२६३, दि.०२ ऑगस्ट, २०२४.
शासन परिपत्रक:-
वित्त विभागाने या विभागाकरिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीच्या निधीचे वाटप नियंत्रक अधिकाऱ्यांना दरमहा करण्यात येत आहे. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम १५ (३) अन्वये विभागातील विविध योजनांना आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी यांना शासन परिपत्रक दि.२८ ऑगस्ट, २०२३ अन्वये घोषित करण्यात आले आहे. २. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (पीएम-पोषण) योजनेसाठी राज्य समन्वय अधिकारी हे आहरण व संवितरण अधिकारी असून त्यांचे लगतचे नियंत्रक /सक्षम प्राधिकारी म्हणून शिक्षण संचालक (प्राथ.) असल्याने कोषागाराच्या प्राधिकार पत्रावर / कार्यालयीन आदेशावर / देयकावर शिक्षण संचालक (प्राथ.) यांना नियंत्रक अधिकारी म्हणून स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत
करण्यात येत आहे.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०९०२१८१६२२०१२१ असा आहे. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.