मतदान सूक्ष्म निरीक्षक कोण असतात?Micro-Observer
आपले मतदान केंद्र संवेदनशील (Vulnerable) मतदान केंद्राच्या यादीत असल्यास सूक्ष्म निरीक्षक आपल्या मतदान केंद्रास भेट देतील.
मतदान केंद्रावरील विविध निवडणूक प्रकियांचे (उदा. मॉक पोल, निवडणूक प्रतिनिधींची उपस्थिती, मतदारांची ओळख पटविणे इत्यादि) ते निरीक्षण करतील.
आपला अहवाल ते स्वतंत्रपणे निवडणूक निरीक्षकांना सादर करतील.
आयोगाने नेमलेल्या निरीक्षकांना द्यावयाच्या सुविधा
• मतदान केंद्रातील अनुपस्थित, स्थलांतरित व मयत मतदारांची यादी (ASD यादी) निरीक्षकाला / सूक्ष्म निरीक्षकाला उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.
मतदारांना अधिक सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने किंवा तुमच्या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीने त्यांनी तुम्हाला कोणतीही सूचना केली तर तुम्ही त्यांची सूचना विचारात घेतली पाहिजे.
मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीबरोबर जी ‘भेट नोंदवही देण्यात येईल त्या ‘भेट नोंदवही ‘मध्ये सही करण्यासाठी निरीक्षकांना विनंती करावी.
मतदारांच्या प्रवेशाचे विनियमन
१. दिव्यांग / ज्येष्ठ नागरिक, पुरुष व महिला मतदारांसाठी ३ स्वतंत्र रांगा असाव्यात.
२. मतदान केंद्राध्यक्ष निदेश देईल त्याप्रमाणे रांगांचे विनियमन करणारी व्यक्ती एकावेळी ३- ४ मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश देण्यास परवानगी देईल.
३. दिव्यांग, शारिरीक दुर्बल, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला व कडेवर लहान मूल असलेल्या महिला मतदारांना प्राधान्य दिले जाईल.
४. प्रत्येक २ महिला मतदारांनंतर एक पुरुष मतदार यांना प्रवेश दिला जाईल.
५. फक्त मतदान केंद्राध्यक्ष व सुक्ष्म निरिक्षक यांना सोबत मोबाईल नेता येईल, मात्र तो Silent ठेवावा लागेल.
६. राजकीय पक्षाचे नाव, चिन्ह तसेच घोषणा नमूद असलेल्या टोप्या, शाली, उपरणे इ. मतदान केंद्रात नेता येणार नाही.