वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक व प्रलंबित सातवा वेतन आयोग ४ था,५ वा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत medical bill 7th pay commission 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक व प्रलंबित सातवा वेतन आयोग ४ था,५ वा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत medical bill 7th pay commission 

संदर्भ :- १. मा. शिक्षण संचालक यांचेकडील पत्र क्र अंदाज/२०२४-२५/वेतनअनु/२०१८७४१८ दिनांक २५.११.२०२४

उपरोक्त संदर्भान्वये वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक, सेवानिवृत्त शिक्षक व केंद्र प्रमुख (वसुली असलेले केंद्रप्रमुख वगळून) यांचे सातवा वेतन आयोगाचे प्रलंबीत हप्ते इत्यादी अदा करणेबाबत निधी प्राप्त झालेला आहे. सदर वैद्यकीय देयक (अर्थ विभागाकडील मंजुर आडव्या तक्त्यानुसार) व प्रलंबित सातवा वेतन आयोग हप्ते हे शालार्थ प्रणालीमधून अदा करणेबाबत बरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाले आहेत. त्याकरीता सदरचे वैद्यकीय देयक व प्रलंबीत सातवा वेतन आयोग हप्ते अदा करणेकामी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

तसेच आपण सादर केलेल्या वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक व प्रलंबित सातवा वेतन आयोग हप्ते यादीप्रमाणे तालुका निहाय अदा करावयाची रक्कम निश्चित करून सदरची यादी व विहित नमुन्यातील प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने या कार्यालयास (सॉफ्टकॉपी व हार्डकॉपीसह) सादर करावे. सदर यादी प्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये वैद्यकीय देयक तयार करून आठ दिवसात या कार्यालयाकडे सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी, देयके विलंबाने सादर केल्यास व नियमान्वये पात्र असणारे एकही देयक प्रलंबित राहिल्यास त्यास सर्वस्वी आपले कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी,