वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची टिपणी PDF medical bill
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीची टिपणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिकृती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तसेच आवश्यक लागणारे घटक विषय सर्व या ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्व माहिती पीडीएफ स्वरूपात आहे
वैद्यकीय खर्चाची प्रतिकृती ची टिपणी पीडीएफ येथे पहा
👉PDF download
१) कर्मचाऱ्याचे नाव –
२) पदनाम
३) कार्यालय
४) रुग्णाचे नाव व कर्मचाऱ्याशी असलेले नाते –
५) आजाराचा कालावधी –
६) रुग्णालयाचा प्रकार- शासकीय/शासनमान्य/खाजगी –
७) शासन मान्य असल्यास शासन मान्यतेचा शासन निर्णय क्रमांक व दिनांक –
८) प्रस्ताव विहीत कालमर्यादेत (एक वर्षाच्या आत) सादर केला आहे काय?
९) शासन निर्णय दिनांक ९ मे २००५ व २८ नोव्हेंबर २००० अन्वये वैद्यकीय खर्चाच्या कुटुंब मर्यादेत ठेवल्याचे प्रमाणपत्र जोडले आहे काय? –
१०) मागणी केलेली रक्कम –
११) पती/पत्नी नोकरी वर आहेत काय?
अ) पती/पत्नी जेथे नोकरी करते तेथे प्रतिपुर्तीची मागणी केली आहे काय? नसल्याबाबत प्रमाणपत्र जोडावे.
ब) रुग्ण केंद्र/राज्य/जि.प./अन्य कार्यालयाचा निवृत्तीवेतन धारक/कुटूंब निवृत्तीवेतन धारक आहे काय?
असल्यास किती निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन मिळते ? (सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार रु.३५००/- इतके मुळ निवृत्तीवेतन (कम्युटेशन करण्यापुर्वीचे) च्या वर असल्यास प्रतिपुर्ती अनुज्ञेय नाही)
१२) विहित नमुना अ/ब/क/ड परिपूर्ण भरले असून सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षऱ्या आहेत काय? ( अ – शासकीय रुग्णालय बाहय रुग्ण खर्च ब शासकीय रुग्णालय आंतररुग्ण खर्च क-
शासन मान्य / खाजगी रुग्णालय आंतररुग्ण खर्च ड – औषधोपचाराच्या खर्चाच्या पावत्या)
१३) आजार विनिर्दिष्ट तातडीच्या आजाराच्या यादीत समाविष्ट असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सकाचे प्रमाणपत्र (आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी सक्षम आहेत) महिला कर्मचाऱ्याने रुग्णाच्या प्रतिपुर्तीच्या दृष्टीने विकल्प देवून त्याची सेवापुस्तकात नोंद घेतली आहे काय?
१४) महिला कर्मचा-याने रुग्णाच्या प्रतिपूर्तीच्या दृष्टीने विकल्प देऊन त्याची सेवापुस्तकात नोंद घेततली आहे काय ? (महिला कर्मचा-याजवळ रहात असलेल्या आई वडिल किंवा/सासू- सास-यांच्या संदर्भात) नियम ३ (तीन) खालील टिप.
१५) रुग्णालयातील राहण्याच्या खोलीचा प्रकार दर्शविणारे प्रमाणपत्र (जनरल वार्ड/स्पेशल रुम/आयसीयू इत्यादी)
१६) देयकासोबत पावत्या वैध व परिपूर्ण आहेत काय?
१७) डिस्चार्ज प्रमाणपत्र जोडले आहे काय (पृष्ठ क्रमांक)?
१८) अपघात झाला असल्यास न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे काय. होय/नाही. होय असेल तर FIR ची प्रत सोबत जोडली आहे काय तसेच त्याबाबत नुकसान भरपाई मिळाली आहे काय?
१९) सदर देयकाच्या प्रतिपुर्तिपोटी विमा कंपनी कडे मागणी केली नसल्याबाबत कर्मचाऱ्याचे हमी पत्र
२०) औषधोपचारामध्ये टॉनिक/अल्कोहोलचा अमावेश नसल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र (पृष्ठ क्रमांक)
२१) रुग्णाचा मृत्यू झाला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र.
२२) खाजगी रुग्णालयात उपचार करण्याबाबत आजारात निश्यितपणे आकस्मिकता होती याबाबत वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र.
२३) प्रसुतीसाठीच्या प्रकरणात तीन महिन्याच्या आत शासकीय रुग्णालयात नोंदणी केली असल्याबाबत नोंदणी प्रमाणपत्र.
२४) प्रसूती नोंदणी केलेल्या/नजीकच्या शासकीय रुग्णालयात का केली नाही याबाबतीत कारण मिमांसा दर्शवणारे निवेदन.
२५) राज्याबाहेर उपचार घेतला असल्यास त्याबाबत कर्मचाऱ्याचे याबाबतीत कारण मिमांसा दर्शवणारे निवेदन.
२६) उपरोक्त २५ च्या अनुषंगाने शासकीय रुग्णालयाकडून प्राप्त संदर्भ चिठ्ठी (Referral Slip) जोडली आहे काय ?
२७) रुग्णालयाची पावती जोडली आहे काय?
२८) सदर उपचारापोटी अग्रिम घेतले होते काय? असल्यास आदेश क्रमांक व दिनांक व रक्कम
२९) पंतप्रधान/मुख्यमंत्री तसेच अन्य संस्थेकडून आर्थिक सहाय्य मिळाले आहे काय? असल्यास तपशील.
३०) कर्मचारी स्वत: रुग्ण असल्यास आंतर रुग्ण कालावधीतील रजा मंजुरीचे आदेश जोडले आहेत काय.
३१) रुग्णालयात बाह्य/आंतररुग्ण कालावधीमध्ये झालेल्या खर्चाचा तपशील-
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दि.१९ मार्च २००५ नुसार खाजगी रुग्णालयातील उपचारासाठी खालीलप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती अनुज्ञेय आहे.