माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ‘पर्यावरण सेवा योजना शाळांचा सहभाग’ या निर्देशकांकरीता आयोजन mazi vasundhara abhiyan
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ‘पर्यावरण सेवा योजना शाळांचा सहभाग’ या निर्देशकांकरीता आयोजित केलेल्या पुणे विभागीय (ग्रामीण) कार्यशाळेबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरुन, माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण सेवा योजना (ESS) या उपक्रमामध्ये शालेय विदयार्थ्यांना सहभागी करुन घ्यावायाचे आहे. सदर उपक्रमाचे उदिदष्ट शालेय विद्यार्थ्यांव्दारे पर्यावरण व वातावरणीय बदल कमी करण्याच्या उपायांचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न करणे हे आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान सर्व शासकीय व खासगी (प्राथमिक व माध्यमिक) सर्व शाळांनी पर्यावरण सेवा
योजनेत सहभाग घेणे अपेक्षित आहे. यामध्ये
1. प्रभारी म्हणून शिक्षकाच्या नेतृत्वाखाली विदयार्थ्यांचा गट (एक युवक आणि एक युवती विदयार्थी गट नेता म्हणून निवडणे) तयार करणे आवश्यक आहे.
2. सदर निर्देशकास एकूण 200 गुण असून, मुल्यमापन पध्दती खालीलप्रमाणे आहे.
1. वसुंधरा अभियान 5.0 दरम्यान पर्यावरण सेवा योजनेत (ESS) सहभाग नोंदविलेल्या शाळांची टक्केवारी
(40 गुण रिलेटीव)
11. पर्यावरण सेवा योजनेसाठी प्रत्येक सहभागी शाळेतून संबंधित प्रभारींची नियुक्ती करणे आणि त्यांनी सहभाग घेतलेल्या कार्यशाळा/ ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रमाची संख्या (पर्यावरण सेवा योजनाव्दारे आयोजित केलेले) (40 गुण रिलेटीव)
III. विदयार्थ्यांचा गट तयार करणे (प्रत्येक गटात 50 पेक्षा जास्त विदयार्थी नसावे) (40 गुण)
IV. पर्यावरणीय उपक्रम राबविण्यासाठी शाळांमार्फत आयोजित केलेल्या वार्षिक थीमॅटिक शिबीरे / मोहिमा/उपक्रमांची संख्या. (40 गुण रिलेटीव)
पर्यावरण सेवा योजना गटांव्दारे आयोजित समुदाय सभा/कार्यक्रमांची संख्या. (40 गुण रिलेटीव) माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण सेवा योजनेत शाळांचा सहभाग या निर्देशकांबाबत दि.12/03/2025
V. रोजी स.11.30 ते 1.30 वाजता कार्यशाळा (Video Conferencing) व्दारे आयोजित केली आहे. तरी, आपल्या अधिपत्याखाली शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच जिल्हयातील सर्व शाळांतील मुख्याध्यापक/शिक्षक यांना सदरील ऑनलाईन कार्यशाळेसाठी उपस्थित रहाण्याच्या सुचना आपले स्तरावरुन दयाव्यात. तसेच, सदर कार्यशाळेसाठी माझी वसुंधरा अभियानाचे कामकाज पहाणारे संबंधित अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी. तरी, सदर बाबींची नोंद घेऊन पर्यावरण सेवा योजना या निर्देशकांतर्गत जास्तीत जास्त नोंदणी करुन घेण्यात यावी. ही विनंती.
YouTube live Link-
https://youtube.com/@environmentservicescheme3313?si=stmjuERebYLDzdQH