मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर शाळेची यादी येथे पहा mazi shala sundar shala result declare
शासकीय गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धानोरे तर खाजगी गटात प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा राज्यातून प्रथम
—-
*विजेत्या शाळांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिनंदन*
मुंबई दि. 12 – विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
👉मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मंत्री श्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.
👉मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक-2 शासन निर्णय येथे पहा
मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन या वर्षी देखील या अभियानाचा दुसरा टप्पा ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमास देखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली.
👉माझी शाळा सुंदर शाळा दुसऱ्या टप्प्याचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.
शासकीय आणि खाजगी शाळा वर्गवारीतील राज्य आणि विभाग स्तरावरील विजेत्या शाळांची यादी सोबत जोडली आहे.