शाळा सुंदर,टापटीप बनवा; ५१ लाखांचे बक्षीस मिळवा !जिल्हा परिषद; मुख्यमंत्री माझी शाळा:अभियानाचा दुसरा टप्पा सुरू mazi shala sundar shala
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : माझी शाळा.. सुंदर शाळेच्या
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरिता निधी उपलब्ध झाल्याने अनेक शाळा स्पर्धेत सहभागी झाल्या. या स्पर्धेच्या माध्यमातून भौतिक फायद्यापेक्षा विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण झाल्याने अनेक सकारात्मक बदल दिसून आल्याने मुख्यमंत्री माझी शाळा… सुंदर शाळा या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पयाविरण, क्रीडा इत्यादी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. शिवाय शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देण्याचाही प्रयत्न होणार आहे.
अशी असणार समितीची रचना
जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष असणार आहेत. सदस्य म्हणून प्राचार्य, जिल्हाशिक्षण वप्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी, प्राथमिक असून संबंधित उपशिक्षणाधिकारी हे सचिव सदस्य असणार आहेत.
५ ऑगस्टला होणार अभियानाची सुरुवात
५ ऑगस्ट २०२४ रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होणार आहे. ४ सप्टेंबर २०२४ रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होणार आहे. ५ सप्टेंबर २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर योग्य तारखेला परितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा २९ जुलैपासून सुरू झाला आहे. सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त शाळांची नोंदणी करून तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावरील जास्तीत जास्त शाळांना बक्षीस मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. यासाठी आवश्यक ते बदल, सेवासुविधा शाळांमध्ये वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
माझी शाळा सुंदर शाळा शासन निर्णय येथे पहा पण click here
प्रारंभी सहभागी शाळांची नोंदणी होणार
२९ जुलै ते ४ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असणार आहे. या कालावधीत अभियानाची माहिती
माझी शाळा सुंदर शाळा बक्षिसासाठी लागणारे निकष व 30 फोटो येथे पहा Click here
सर्व शाळांमध्ये पोहोचविण्याचे काम करण्यात येणार आहे. सहभागी शाळांची नोंदणीही होणार आहे. अशी आहे गुणांकन पद्धती – पायाभूत सुविधा ३३ गुण शासन ध्येय धोरण अंमलबजावणी – ७४ गुण – शैक्षणिक संपादणूक ४३ गुण.
राज्यस्तरावर पहिले बक्षीस ५१ लाखांचे
■राज्यस्तर प्रथम ५१ लाख, द्वितीय-३१ लाख, तृतीय-२१ लाख ■
विभागीय स्तर – प्रथम २१ लाख, द्वितीय-१५ लाख। तृतीय-११ लाख,
■ जिल्हास्तर – प्रथम ११ लाख, द्वितीय ५ लाख व तृतीय ३ लाख
तालुकास्तर – प्रथम ११ लाख, द्वितीय २ लाख व तृतीय १ लाख
कोणत्या शाळा ठरू शकतील पात्र?
■ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा
■ उर्वरित सर्व व्यवस्थापनांच्या शाळा
-कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, सोलापूर
■वर्ग अ व वर्ग ब च्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र