मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत वितरीत केलेल्या निधींचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणेबाबत mazi shala sundar shala 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत वितरीत केलेल्या निधींचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणेबाबत mazi shala sundar shala 

संदर्भ- १. शासन निर्णय क मुमंब २०२३/प्र.क्र.११४/एसडी६ दिनांक ३०.११.२०२३ २. शासन निर्णय वित्त विभाग क संकिर्ण १०.२१/प्र.क्र.६३/अर्थोपाय, दिनांक १६.१०.२०२३

उपरोक्त संदर्भ क १ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनेच्या शाळांकरीता मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात आलेले आहे. सदर अभियानाची सुरुवात दिनांक ०१.०१.२०२४ रोजी झालेली असुन दिनांक १५.०२.२०२४ पर्यंत हे अभियान राज्यात राबविण्यात आलेले आहे. मा.

आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी त्यांचेकडे दिनांक ०६.०१.२०२४ च्या पत्रान्वये अभियानाच्या अंमलबजावणीसाठी दिनांकनिहाय कालदर्शिका सर्व संबंधीतांना फळविलेली आहे.

या अभियानाअंतर्गत संचालनालयाकडून अभियानाची अंमल बजावणी, प्रचार व प्रसार यासाठी अनुदान आदेश क १ तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजयी झालेल्या शाळांना पारितोषिकासाठी अनुदान आदेश क ५ अन्वये वितरीत करण्यात आलेले आहे. (प्रत संलग्न)

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सन २०२३-२४ अंतर्गत जिल्हयांना प्राप्त सदर निधीपैकी अखर्चित निधी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात खर्च करण्यास परवानगी मिळण्यासाठी जिल्हयाकडून विचारणा होत आहे. तरी उपरोक्त विषयाबाबत वित्त विभागाचे संदर्भ क २ दिनांक ०६.०६.२००८ च्या शासन निर्णयान्वये सदर अभियानांतर्गत सन २०२३-२४ अंतर्गत आपणास प्राप्त निधीपैकी खाली नमूद केलेल्या बाबीसाठी अखर्चित निधी सन

२०२४-२५ या आर्थिक वर्षात परवानगी देण्यात येत आहे. मुया क. १ मुख्यमंत्री माशी शळा सुंदर शाळा अंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रामुख्याने अभियानाची अंमलबजावणी प्रभार-प्रसार तसेच त्या-त्या टप्पावर आयोजित करावयाचे कार्यक्रम मान्यवरांच्या भेटी यासाठी अनुदान वितरण आदेश क्र १. दिनांक १४.०२.२०२४ अन्वये अनुदान वितरीत करण्यात आलेले होते. सदर आदेशाद्वारे वितरीत

अनुदान हे प्रामुख्याने अभियानाच्या प्रचार-प्रसारासाठी म्हणजेच अभियान कालावधीत दिनांक १५.०२.२०२४ पर्यंत खर्च

होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सदर बाबीवर अभियान कालावधी संपल्यानंतर म्हणजेच दिनांक १५.०२.२०२४ नंतर कोणत्याही प्रकारचा वर्च करण्यास परवानगी नाही. सदर बाबींवर अभियान कालावधीनंतर वर्ष झाल्यास ती वित्तीय अनियमितता होऊ शकते,

मुया क्र.२ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आदेश क ५ दिनांक २९.०३.२०२४ अन्वये जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय विजयी झालेल्या शाळांना पारितोषिकांची रक्कम मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना आरटीजीएस द्वारे वितरीत करण्यात आलेले आहे. पारितोषिकांच्या निधीचे वाटप विजयी झालेल्या शाळांना अद्याप पर्यंत झालेले नसल्यास सदरची रक्कम विजयी झालेल्या शाळांना वाटप करण्यास संदर्भ क्र २ च्या शासन निर्णयातील नमूद बाबीनुसार परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार तात्काळ कार्यवाही करावी. तसेच या अभियानासाठी आपणास आदेश क १ व ५ अन्वये वितरीत केलेल्या तरतूदींच्या अनुषंगाने ज्या

वावीवर खर्च करण्यास निर्देश दिलेले आहेत. त्याच बाबीवर खर्च केला असल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र दोन्ही (आदेश क १ व आदेश क ५) आदेशासाठी असलेल्या उपयोगिता प्रमाणपत्रामध्ये स्वतंत्रपणे सादर करावे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रामुख्याने अभियानाची अंमलबजावणी प्रचार प्रसार तसेच त्या-त्या टप्पावर आयोजित करावयाचे कार्यक्रम मान्यवरांच्या भेटी गामाठी अनुदान वितरण आदेश क १ दिनांक १४.०२.२०२४ अन्वये अनुदान वितरीत करण्यात आलेले होते. यासाठी शिल्लक अनुदान हे खाली नमूद लेखाशीर्षांवर आपल्या जिल्‌ह्याच्या जिल्हा कोषागार कार्यालयात चलनाद्वारे जमा करावे त्याची एक प्रत उपयोगिता प्रमाणपत्रासोबत सादर करावी. लेखाशिर्ष ०२०२ शिक्षण, किडा, कला व संस्कृती

८०० इतर जमा रक्कमा (०१) (११) इतर संकिर्ण जमा रक्कमा ०२०२०७०५०१

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment