विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑफलाईन प्रस्ताव सादर करणे बाबत matric scholarship ofline prastava 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑफलाईन प्रस्ताव सादर करणे बाबत matric scholarship ofline prastava 

अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑफलाईन प्रस्ताव सादर करणे बाबत

संदर्भ:- (१) मा.अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक भासशि / प्रकरण २९/शिक्षण- १ दिनांक १२/०३/२०२५.

(२) मा. सह आयुक्त शिक्षण समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांचे पत्र क्रमांक शिक्षण/मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती का-४/२०२४-२५ पुणे दिनांक १३/०३/२०२५.

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जातो (SC) प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचे महा-डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज संबंधित शाळा मुख्याध्यापकांच्या लॉगिन वरून भरण्यात येत आहे.

परंतु सन २०२४-२५ चा प्राप्त निधी अखर्चित राहू नये तसेच पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षात सदरील योजना ऑफलाईन पद्धतीने राबविण्यास शासन मान्यता देण्यात येत असल्याचे संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

तरी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे मंट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनांचे प्रस्ताव विहित प्रपत्रांमध्ये ऑफलाइन तात्काळ सादर करण्यात यावे जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच सदरील योजनेचा लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची नोंद घेण्यात यावी सोवतः-विहित प्रपत्र

Join Now