प्रजासत्ताक दिन मुद्देसूद मराठी सूत्रसंचालन व चारोळ्या marathi sutrasanchalan charolya 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रजासत्ताक दिन मुद्देसूद मराठी सूत्रसंचालन व चारोळ्या marathi sutrasanchalan charolya 

सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम!!

देशभक्तीच्या उत्साहाने व प्रजासत्ताक दिनाच्या चैतन्याने उगवलेल्या आजच्या या मंगलप्रभाती मी श्री./सौ. सर्वप्रथम आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो / देते व कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

मातृभूमी हि अजिंक्य, विश्वात साऱ्या वंद्रद्य संस्कृती, कण कण मातीचा बोले हर्षे, विश्वास प्रेम इथे नांदती । संपन्न असे इतिहास अन युवकांत राष्ट्रप्रेम जागृती हरेक मनात अन हृदयात हुंकार एकच जय भारती ।

प्रारंभी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येकजण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले देशासाठी आपलं बलिदान दिले. आपला भारत १५ ओगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली पण त्याची लोकशाही राज्य घटना ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन ” म्हणून संपूर्ण भारत देशात उत्साहाने साजरा केला जातो. आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजेच हे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता सुरु झाली.

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला, आमुचा भारत देश आम्ही सारे एक नांदतो जरीही नाना जाती नाना वेश

तिरंगा…. ज्यातील प्रत्येक रंग म्हणजे भारताच्या वैभवसंपन्नतेचे व सामर्थ्याचे प्रतिक केशरी रंग साहस व बलिदानाचे प्रतिक पांढरा रंग सत्यता व शांततेचे प्रतिक तर हिरवा रंग श्रद्धा व शौर्याचे प्रतीक आहे. सोबतीलाच 24 आऱ्याचे निळ्या रंगाचे चक्र जणूकाही भारताची अविरत होणारी प्रगतीच दर्शविते. हाच तिरंगा अखंड भारताच्या बंधुत्वाची व एकोप्याची ओळख करून देतो.

तीन रंगांनी नटलेला

तिरंगा आपली शान आहे

पाहताच संचारे चैतन्य अंगी

तिरंगा अमुचा पंचप्राण आहे

अध्यक्षीय निवड :

असं म्हणतात कि आपली काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं…. अगदी या ओळींप्रमाणेच…. सामान्यांचे तसेच सतत आपल्या शाळेचे हित जपणारे / जपणाऱ्या, तसेच कर्तृत्व, नेतृत्व व दातृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे श्री. / सौ.

यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो । करते.

(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन द्यावे. )

तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सन्मानीय श्री./सौ. मी या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो । करते.

प्रतिमा पूजन / दीपप्रज्वलन / ध्वजारोहण 

उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो / करते कि त्यांनी प्रतिमा पूजन / दीपप्रज्वलन करावे.

सुमंगल या वातावरणात

संचारुनी आली देशभक्ती

मान्यवरांनी शुभहस्ते

प्रज्वलीत कराव्या ज्योती

मोहब्बत का दूसरा नाम हैं मेरा देश अनेको में एकता का प्रतिक हैं मेरा देश चंद गैरों की सुनना मुझे गँवारा नहीं हिन्दू हो या मुस्लिम सभी का प्यारा है मेरा देश

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. पूजन व ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते. यांनी ध्वजस्तंभाचे (मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर देण्यात यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी )

राष्ट्रगीत संपल्यानंतर नारे देण्यात यावे……

भारत माता की जय…. !!

भारत माता की जय…. !!

भारत माता की जय…. !!

विजयी विश्व तिरंगा प्यारा……. या झेंडा गीताचे समूहगायन घेण्यात यावे.)

संविधानाचे सामुहिक वाचन :

संविधान उद्देशिका / प्रस्तावना

आम्ही, भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस :

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य :

दर्जाची व संधीची समानता; निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी या‌द्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्याना विनंती करतो/ करते….. धन्यवाद !!

मान्यवर परिचय / स्वागत :

व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. व्यासपीठावरील अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे गुरुजन प्रतिष्ठित नागरिक सर्वांची स्वागत घ्यावे.

( पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करावे.)

प्रास्ताविक :

मान्यवरांचा आशिर्वाद घेवून साथ द्यावी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. / सौ……….हे / या करतील.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

आपण ज्याप्रमाणे धार्मिक सणवार उत्सव हे मोठ्या आनंदाने, कौतुकाने उत्साहाने साजरे करतो. त्या प्रमाणेच संपूर्ण भारतवासी काही राष्ट्रीय सण उत्सव सुद्धा साजरे करतो. त्यातील एक राष्ट्रीय सण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा ‘प्रजासत्ताक दिन’ आपला भारत देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो तो २६ जानेवारीला. हा दिवस शाळा कॉलेजातून सरकारी-निमसरकारी कार्यालयातून, सोसायट्या, चौकांतून झेंडावंदन करून साजरा केला जातो. तिरंगी झेंडा हा देशाचा राष्ट्रध्वज आहे. मान्यवर व्यक्ती निवृत्त अधिकारी नेते मंडळी ह्यांच्या हस्ते हे ध्वजवंदन केले जाते. शाळा कॉलेजपासून कवायती. भाषणे विविध कार्यक्रम केले जातात. लहान मुले हातात झेंडे घेऊन नाचतात. राष्ट्रध्वज गौरवाने छातीवर लावला जातो.

१५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. पारतंत्र्याचे पाश तुटले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या वाटेनं वाटचाल करेल. लोकांच्या

कल्याणाच्या कोणत्या योजना राबवल्या जातील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी सुपुत्र ह्यांनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. ह्या राज्य घटनेची आखणी मांडणी करण्यासाठी एक समिती नेमली होती. त्या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना बहाल केला आहे.

दरवर्षी २६ जानेवारीला लालकिल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्यात गतवर्षाचा आढावा घेत नववर्षाच्या नव योजना जाहीर केल्या जातात. देखणं संचलनही सादर केले जाते. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहिली जाते. भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे / क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी अग्नी) समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.

आपण भारतात कुठेही राहू शकतो, फिरू शकतो, व्यवसाय करू शकतो. आपल्याला स्वतःचे विचार, मत माडण्याचे स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याची जाण आपण ठेवली पाहिजे. या स्वातंत्र्याचा वापर आपण देशहितासाठी आपण केला पाहिजे. शांतता, समता, बंधुता ही मुल्ये आपण जोपासली पाहिजेत. भारतीय राज्यघटनेचा स्वातंत्र्याचा आदर करावा इतकेच. शेवटी कवितेचा दोन ओळी सादर करतो / करते.

हम जिस आझादी में जी रहे है। उस आझादी को वीरोने अपने लहू से लिखा था ।।

देशहिताचे विचार अंगी बाळगण्याची व देशभक्ती राष्ट्रहित प्रत्येक भारतीयाने प्राणपणाने आपल्या हृदयी जोपासण्यासाठी वचनबद्ध होऊयात. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकास पूर्णविराम देतो / देते. धन्यवाद !!

विद्यार्थी व शिक्षक भाषणे :

(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत. )……..,..

(आपल्या नियोजनानुसार सांस्कृतिक कार्यक्रम / देशभक्ती गीत गायन घेण्यात यावे)……….

अध्यक्षीय भाषण / मनोगत :

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवणाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे अध्यक्षीय मार्गदर्शनाचा

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सौ.

यांनी त्यांच्या अनुभावाच्या व ज्ञानाच्या कुंभातील काही मौलिक विचार मांडावे, जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व भरभराटीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो । करते कि त्यांनी आपले मांडावेत….. धन्यवाद !!

आभार :

आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री / सौ. हे  करतील.

कार्यक्रम झाला बहारदार भाषणेही झाली जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वाचे आभार आतिर्थीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

आजच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी कष्ट घेतले व प्रत्यक्ष । अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.

सर्व मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या वि‌द्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची निश्चितच प्रगती साधली जाईल.

सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल मी विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो । मानते.

जहाँ प्रेम की भाषा हैं सर्वोपरि जहाँ धर्म की आशा हैं सर्वोपरि ऐसा हैं मेरा देश हिन्दुस्तान जहाँ देश भक्ति की भावना हैं सर्वोपरि

आणि शेवटी निरोप घेता घेता एवढेच म्हणेन कि………

हा देश माझा याचे भान,

जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या !!

अध्यक्षांच्या परवानगीने प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो / करते.

!! जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र !!