27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन सूत्रसंचालन marathi state language day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन सूत्रसंचालन marathi state language day 

Marathi state language day
Marathi state language day

27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन सूत्रसंचालन marathi state language day

स्वागतम…. आगतम…. सुस्वागतम ….!!

मराठी अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या व मराठी मनात मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्व आदरणीय मान्यवरांचे मी श्री. / सौ. स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते. व मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमास मी सुरुवात करतो / करते.

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यांतील शिळा

कवितेच्या वरील ओळी असो किंवा “ओळखलंत क सर मला? पावसात आला कोणी..” किंवा “To be or not to be, That is the question…. जगावं कि मरावं हा एकच सवाल आहे..” या ओळी कानी पडताच क्षणात ‘कणा’ कवितेची व ‘नटसम्राट’ नाटकाची आठवण न होणारे मराठी मन शोधूनही सापडणार नाही. ज्या अनमोल व अ‌द्वितीय लेखणीतून अशा विविध अजरामर साहित्य व कलाकृती प्रसवल्या त्या मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ज्ञानपीठ व प‌द्मभूषण पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘मराठी भाषा गौरव दिन’ जगभरात साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांच्या मराठी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल मराठी भाषा प्रेमींकडून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

अध्यक्षीय निवड :

एखादयाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते काळजात कोरलेलं आभाळभर लेणं असतं, याच रुपानं आपल्या कार्याचे बीज पेरणारे व सतत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे / राहणाऱ्या श्री. / सौ. अध्यक्षस्थान स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते. यांनी आजच्या कार्यक्रमाचे

( सहकारी शिक्षक / शिक्षिकेने अध्यक्षीय विनंतीस अनुमोदन दयावे )

दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :

कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो । करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञानास दूर सारावे.

सुमंगल वातावरणात

समईच्या उजळल्या वाती

मान्यवरांनी शुभहस्ते

प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती

– गिरीष दारुंटे

( प्रतिमा पूजन करतांना खालील ओळी वापरू शकतात….)

इये महाटिचीया नागरी

ब्रम्हविद्येचा सुकाळू करी

अशा शब्दांतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीचा उल्लेख करतांना मराठी भाषेला

State language day
State language day

मान्यवर परिचय व स्वागत :

( व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. )

ब्रम्हविद्या म्हटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने जाणवते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठी भाषेचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. •

प्रमुख पाहुणे : श्री. / सौ.

अतिथींच्या आगमनाने झाले वातावरण प्रसन्न उल्हासित करुनी उपकृत आम्हा स्विकारावे आमुचे स्वागत

गिरीष दारुंटे

(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे. )

• प्रास्ताविक :

सुख दुःखाच्या छायेतून कळते जसे सार अवघ्या जीवनाचे आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते तसे हे महत्व प्रास्ताविकाचे

गिरीष दारूंटे

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेतील श्री. / सौ.

4/8

व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष, मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो…. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ वि. वा. यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी हा जगभरातील मराठी भाषिकांकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात असतो. मराठी साहित्य व काव्यविश्वात कुसुमाग्रजांचे स्थान हे ध्रुवताऱ्याप्रमाणे आहे. विद्यार्थ्यांसाठी व तरूणाईसाठी त्यांची “कणा” हि कविता तर प्रेरणादायी, जगण्याची स्फूर्ती व बळ देणारीच आहे. त्यांचेच “नटसम्राट” हे नाटक तर आजही मैलाचा दगड ठरत आहे.

कलाकारांसाठी अभिनयाचा कस लागावा अशीच श्रेष्ठ व सर्वोतम नाट्यकृती

कुसुमाग्रजांनी आपल्याला दिलेली आहे. मराठी भाषेविषयीचे अपार प्रेम व मराठी साहित्यातील

योगदान याविषयी तमाम मराठी प्रेमीजन कुसुमाग्रजांचे सदैव ऋणीच राहतील. महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा हि जगभरातील कोट्यावधी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषेचे साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.

माझा मराठीची बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजासी जिंके । ऐसे अक्षरे रसिके । मेळवीन ।।

असे मराठी भाषेचे वर्णन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी केले आहे. तर सुरेश भट यांनीदेखील

आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे……

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढया जगात माय मानतो मराठी

मराठी भाषेचा हाच गोडवा कित्येक साहित्यिक, गीतकार व गायकांनी आपल्यापरिने

समृद्ध करण्यास अनमोल योगदान दिलेले आहे. एवढेच नव्हे तर स्वतः स्वराज्य संस्थापक

छत्रपती शिवाजी महाराज यांनीदेखील मराठी भाषेसाठी पहिला राजकोष तयार केला आहे.

संतांनी, वारकरी सांप्रदायाने संत साहित्यातुन मराठी भाषा फुलवली आहे. विसाव्या व एकविसाव्या शतकातील अनेक लेखक, कवींनी मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात अतुलनीय योगदान दिलेले आहे. हाच प्रवास आजही विविध साहित्यिक कार्यक्रम, संमेलने इ. सारख्या आयोजनांतून अविरत सुरु आहे. मराठी भाषा फुलावी, वाढावी व तिचा उत्तरोत्तर प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत.

शासनदेखील याकामी यथाशक्य सहभाग व सहकार्य करीत आहे.

• विद्यार्थी व शिक्षक भाषणे :

(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विदयार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत. )

• अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :

तेज तुमचे आहे, सुर्य-चंद्राहूनही जास्त तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे, जीवनाचे संपूर्ण शास्त्र ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून, कळस गाठू प्रगतीचा त्यासाठी मान आहे, अध्यक्षीय मार्गदर्शनाचा

विदयार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष

श्री. / सौ.

यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही

मार्गदर्शनपर मौलिक विचार आमच्या विदयार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विदयार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विदयार्थ्यांसमोर मांडावेत धन्यवाद !!

Marathi state language day
Marathi state language day

• आभार प्रदर्शन :

माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. / सौ.

आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विदयार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी

विदयालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला

लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. for

ज्ञानकुंभ रिता करुनी

अनमोल, प्रेरक ज्ञान दिले

बोधामृत पाजूनी ज्ञानाचे

आम्हा उपकृत केले

तुम्ही पाठीराखे आमुचे

सदा तुमचाच आधार

मार्गदर्शन असू दयावे नित्य

स्विकारुनी हे आभार

– गिरीष दारुंटे

आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या

विदयार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण, समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती साधली

जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे.

तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो हाताहाताने कार्यक्रम फुलतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार

यांनी

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार

समारोप :

आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता समारोपाची वेळ आली

अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो / करते.

!! जय हिंद – जय महाराष्ट्र !!

(सूत्रसंचालनातील काही भाग संकलीत असल्याने ज्ञात / अज्ञात कवींचे / लेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)

Leave a Comment