०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे मराठी सुंदर भाषण marathi speech on teachers’ day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे मराठी सुंदर भाषण marathi speech on teachers’ day 

शिक्षक दिन भाषण क्रमांक -१

सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजनवर्ग, विद्यार्थीमित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भास्तात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

एक शिक्षक, उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे.

या विशेष प्रसंगी, मी येथे जमलेल्या सर्व शिक्षकांना आणि ज्यांनी माझ्यावर संस्कार केले व मला ज्ञान दिले आहे अशा सर्व शिक्षकांना मी वंदन करतो.

आपल्या सर्वांना माहित आहे की ‘शिक्षक’ ची व्याख्या करणे अशक्य आहे कारण शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरते किंवा शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करण्यापुरते मर्यादित नसतात तर विद्यार्थ्यांना योग्य मार्गावर जाण्यास मदत करतात. ते आपल्या चारित्र्यामध्ये मोलाची भर घालतात आणि आपल्याला देशाचे आदर्श व सुसंस्कृत नागरिक बनवतात.

दुसरे म्हणजे, शिक्षक हे आपले दुसरे पालक आहेत, आपल्यावर प्रभाव पाडण्यात आणि प्रेरणा देण्यात शिक्षकांची प्रमुख भूमिका असते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे अनुकरण करून त्यांना आदर्श मानण्याचा प्रयत्न करतो. पालकांनंतर, प्रत्येक टप्प्यावर मुलाचे चारित्र्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकच घेतात.

म्हणून, आज शिक्षकांना व त्यांच्या अथक प्रयत्नांना सलाम करून त्यांना शुभेच्छा देणे हे आपले परम कर्तव्य आहे. आपण सततच त्यांचा सन्मान करून आपल्याला घडविण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करूया. त्यांच्या अमूल्य प्रयत्नांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो.

शिक्षक हे मार्गदर्शक देखील असतात जे विद्यार्थ्याला जबाबदार नागरिक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ते मार्गदर्शक म्हणून देखील काम करतात. आपले ध्येय गाठण्यात शिक्षक सतत मदत करतात. त्यांचे योगदान केवळ शाळांपुरते मर्यादित नसून ते समाज आणि देशापर्यंत विस्तारलेले आहे. अशा प्रकारे, पालकांनंतर, शिक्षकांना योग्य आदर मिळायलाच हवा.

शिक्षक दिनाचा हा विशेष कार्यक्रम आपल्या शाळेत साजरा होतांना मला आनंद होत आहे.

हा दिवस विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी व शिक्षकांचे आभार मानण्याची एक उत्तम संधी देतो. मी उपस्थित सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो व माझे भाषण संपवतो मला संधी दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.

शिक्षक दिन भाषण क्रमांक-२

सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित गुरुजनवर्ग व माझ्या विद्यार्थीमित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेल्या तुम्हा सर्वांना मी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो.

प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिन हा एक विशेष आणि महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी विद्यार्थी शिक्षकांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वंदन करतात.

शिक्षक हेच खरे आयुष्यातील मार्गदर्शक असतात. शिक्षक विद्यार्थ्यांला जबाबदार नागरिक बनवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. ते मार्गदर्शक म्हणून देखील काम करतात आणि विद्यार्थ्यांना जीवनात ध्येय गाठण्यासाठी मदत करतात. त्यांचे योगदान केवळ शाळांपुरतेच मर्यादित नसून ते समाज आणि देशापर्यंत पोहोचले आहे. पालकांनंतर, शिक्षकांनाच समाजात आदर दिला जातो.

शिक्षक दिनाचा कार्यक्रम शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना भेटवस्तू, फुले आणि ग्रीटिंग कार्ड्स देऊन हा कार्यक्रम साजरा करत असतात. कार्यक्रम अधिक रंजक आणि रंगतदार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जाते.

शिक्षक दिन विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी व शिक्षकांचे आभार मानण्याची एक संधी देत असतो. आपले आयुष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा सतत आदर करूयात व त्यांचे आभार मानुयात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, धन्यवाद!

शिक्षक दिन भाषण क्रमांक-३

उपस्थित गुरुजनवर्ग व माझ्या प्रिय मित्रांनो! आपल्या सर्वांना माहीत आहे की, आज आपण सर्व येथे शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. या सुंदर प्रसंगी, आपल्या सर्व शिक्षकांना, ज्यांनी आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यात अतुलनीय योगदान दिले आहे, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन होय,

दरवर्षी ५ सप्टेंबरला आपण शिक्षक दिन साजरा करतो. नेहमीप्रमाणे आजचा हा दिवस खूप उत्साह आणि आनंदाने भरलेला आहे. सर्वच विद्यार्थी आपल्या शिक्षकांना ते त्यांच्यासाठी कसे आणि का स्वास आहेत हे सांगण्यासाठी उत्सुक आहेत. प्रिय मित्रांनो, आज मी आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्व या विषयावर दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही विनंती!

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे केवळ भारताचे राष्ट्रपतीच नव्हते तर ते एक महान विद्धान आणि शिक्षक देखील होते.

देशभरातील विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. शिक्षक हे आपल्या समाजाचा कणा आहेत. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात आणि त्यांना देशाचे आदर्श व संस्कारित नागरिक बनवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे.

शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आणि राष्ट्राच्या वाढीवर, विकासावर आणि कल्याणावर मोठा प्रभाव पडतो.

पालकांपेक्षा शिक्षक हे नेहमीच मोठे असतात. अशी एक म्हण आहे की, पालक मुलाला जन्म देतात तर

शिक्षक त्या मुलाचे व्यक्तिमत्त्व घडवून त्याचे भविष्य उज्ज्वल करतात. अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी तसेच जीवनातील प्रत्येक टप्प्यावर शिक्षक आपल्या पाठीशी कायम उभे असतात,

शिक्षक हे आपल्यासाठी सदैव ज्ञान आणि बुद्धीचे स्त्रोत आहेत. आमचे आयुष्य घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे आम्ही सदैव ऋणी आहोत. या प्रसंगी मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.

शिक्षक दिन भाषण क्रमांक-४ 

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत त्या निमित्ताने शिक्षकांना आदरपूर्वक नमस्कार, आज, आपण शिक्षक दिनानिमित्त येथे जमलो आहोत, शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचा आजचा दिवस.

प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकवणारे पहिले भास्तीय असलेल्या उल्लेखनीय भारतीय विद्धानाच्या जन्माच्या स्मरणार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो. होय. मी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलत आहे, ज्यांनी पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणूनही काम केले.

डॉ. राधाकृष्णन त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि त्यांच्याकडे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आहेत. शिक्षकांचा गौरव हाच माझा गौरव आहे अशी त्यांची भावना होती आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. समाजातील भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षक सदैव तत्पर असतात. म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येतो.

भावी पिढी घडवणारे

गिरी सदैव आदरणीय शिक्षक

बीज पेरतात संस्कारांचे

त्यांच्या चरणी मी नतमस्तक

अशा थोर गुरुजनांना सादर प्रणाम आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शिक्षक दिन भाषण क्रमांक-५