शिक्षक दिनाचे सुंदर मराठी भाषण marathi speech on teachers’ day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक दिनाचे सुंदर मराठी भाषण marathi speech on teachers’ day 

मित्रांनो आपण दरवर्षी शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा करत असतो सर्वजण एकत्र जमतात व शिक्षक दिन साजरा करतात शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात शिक्षकांचा गौरवाचा अभिमानाचा सन्मानाचा दिवस म्हणजे शिक्षक दिन होय या दिवशी सर्वजण शिक्षकांना आदराने नमस्कार करतात तसेच काहीजण भेटवस्तू देखील देतात शिक्षक दिनाच्या निमित्ताने भाषण कसे करावे कोणते मुद्दे असावेत शिक्षकांना शुभेच्छा कोणत्या द्याव्यात यासंबंधी सुंदर मराठी भाषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी आज तुम्हाला शिक्षक दिनाविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल ही नम्र विनंती आज आपण येथे सर्वजण एकत्र जमलो आहोत ते शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक दिन म्हणजे शिक्षकांच्या विषयी सन्मानाचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिन होय या दिवशी आपण शिक्षकांचा आधार सन्मान करतो परंतु हा नेहमीच केला पाहिजे फक्त तो आजच्या दिवशी मर्यादित न राहता शिक्षकांचा नेहमी आदर्श सन्मान करावा.

पूर्वीच्या काळी पासून गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे पूर्वी शिक्षकांना गुरु म्हटले जायचे आणि गुरुचे स्थान हे अतिउच्च होते गुरूसाठी शिष्य आपला जीव द्यायलाही तयार व्हायचा पूर्वीच्या काळी पासूनच गुरुचे स्थान हे खूप मोठे आहे.

आज आपण जर पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये गुरूला खूप मोठे स्थान आहे आपल्या जीवनातील खरा शिक्षक खरा गुरु म्हणजे आपले शिक्षकच होय पहिले गुरू म्हणजे आपले आई-वडील आणि दुसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक होय आपल्या आई-वडिलाप्रमाणेच आपल्याला ज्ञान देणारे समजावून सांगणारे व योग्य जीवनाला दिशा देणारे गुरु म्हणजे आपले शिक्षक होय प्रत्येक आई-वडिलांना असे वाटते की आपला मुलगा चांगला झाला पाहिजे मोठा बनला पाहिजे त्याचप्रमाणे शिक्षकांना देखील असे वाटते की आपला शिष्य हा देखील मोठा बनला पाहिजे यांनी आपले नाव मोठे केले पाहिजे हे फक्त आई-वडील आणि शिक्षकांनाच वाटत असते आणि ते नेहमी तशी वाटचाल करण्यास आपणास मार्गदर्शन देखील करतात.

शिक्षक म्हणजे एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाचे फळे फुले आणि सावली देण्याचं काम हे शिक्षकच करतात शिक्षक हे सर्वांना सारखीच सावली देतात प्रत्येक शिष्याला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम हे गुरुच करतात गुरुच्या मनात कोणताही भेदभाव नसतो त्यासाठी प्रत्येक शिष्य हा समान असतो. विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि या गोळ्याला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम ही शिक्षकाच करत असतात शिक्षक हे अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांना अध्यापनाबरोबर कौशल्य शिकवतात गुण शिकवतात तसेच विविध खेळ देखील शिकवतात शिक्षक हा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा खरा दागिना असतो तो विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देतो विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक गुणांना वाव देतो प्रत्येक विद्यार्थ्यांमधील क्षमता हे शिक्षकांना माहीत असतात आणि त्या क्षमतेनुसार त्याला ज्ञान देण्याचे काम हे शिक्षक करत असतात. शिक्षक हे फक्त पुस्तके शिकवत नाही तर पुस्तकाच्या बाहेरच्या जीवनातील अनुभव देखील विद्यार्थ्यांना शिकवतात भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी संकटांना कसे सामोरे जायचे हे देखील शिक्षका शिकवत असतात.

शिक्षक दिन साजरा करत असताना शिक्षक दिन हा खऱ्या अर्थाने भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन म्हणजे 5 सप्टेंबर होय डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली हे पेशाने व्यवसायाने शिक्षक होते एक सामान्य शिक्षक खूप मोठ्या अतिउच्च पदापर्यंत पोहोचला त्यामुळे त्यांच्या जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे साधी राणी आणि उच्च विचार श्रेणीचे होते त्यांच्या जीवनामध्ये अध्यापनाला खूप महत्त्व होते ते ज्ञानी होते. आपल्या संयम आणि ज्ञानाच्या जीवावर त्यांनी देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली अशा या महान विभोवतीस त्यांच्या त्यांचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांच्या जन्मदिनाचे दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी परवानगी दिली यामध्ये शिक्षकाचा खूप मोठा गौरव करण्यात आला त्यामुळे शिक्षक दिन हाच आम्हा शिक्षकांचा सन्मानाचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिन आहे.

शिक्षक हा नेहमी शाळेमध्ये दारिद्र्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतो तसेच भारताचे आधारस्तंभ बनवण्याचे काम करत असतो हे आधारस्तंभ बनवताना त्यांना आनंद अडचणीतात परंतु त्या अडचणींचा बाऊ न करता खऱ्या अर्थाने कार्य करत असतात आणि या कार्या चा गौरव दिन म्हणजे शिक्षक दिन होय आजच्या दिवशी शाळेमध्ये खूप उत्साही वातावरण असते कारण आज शिक्षकांना शुभेच्छांचा वर्षाव केला जातो तसेच दिवसभर विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्य करत असतात आणि शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी या लक्षात येतात त्यामुळे शिक्षकाचे कार्य तसेच शिकवण्यामध्ये येणारे अडचणी मुलांना समजून सांगताना येणारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवते सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment