शिक्षक दिनाचे जबरदस्त मराठी भाषण 2024 marathi speech on teachers day
नमस्कार मित्रांनो शिक्षक दिनासाठी शाळेमध्ये भाषण कसे करावे तसेच शिक्षक दिनाच्या भाषणात कोणकोणते मुद्दे असावेत दरवर्षीप्रमाणे आपण 5 सप्टेंबरला म्हणजे माझी उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आपण साजरी करतो त्यांचा जन्मदिवस म्हणजेच शिक्षक दिन होय याकरिता आपण भाषणाची तयारी करतो सुंदर भाषण करण्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत ते आपण या पोस्ट मधून पाहणार आहोत.
भाषणाची सुरुवात कशी करावी ते खालील मुद्द्यावरून तुमच्या लक्षात येईल.
भाषण क्रमांक एक
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बाल मित्रांनो मी तुम्हाला आज शिक्षक दिन याविषयी माझे विचार मी मांडणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते.
मित्रांनो तुम्हाला माहित आहे 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन होय शिक्षक दिन हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस आहे आणि त्यांच्या जन्मदिवसाच्या आठवण म्हणून शिक्षक दिन साजरा केला जातो कारण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते तसेच ते शिक्षक देखील होते त्यामुळे एक शिक्षक उपराष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकतो हे डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांनी दाखवून दिले त्याचे कार्य खूप मोठे होते त्यामुळे त्यांच्या गौरव आपण शिक्षक दिन त्यांचा जन्मदिवस दिनाच्या निमित्ताने साजरा करतो.
डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते ते शिक्षक या पदावर कार्यरत होते त्यांनी विद्यार्थी घडवण्याचे काम केले त्यांच्या अंगी खूप चांगले गुण होते विद्यार्थ्यांचा गुणात्मक व सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घालवण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पण केले.
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून गौरव करण्यात येतो खऱ्या अर्थाने भारत सरकारने देखील शिक्षकांचा गौरव हा सन्मान डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या रूपाने दाखवून दिलेला आहे.
शिक्षक हा शब्द खऱ्या अर्थाने खूप छोटा आहे परंतु या शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे या तीन अक्षरी शब्दांमध्ये प्रचंड शक्ती आहे एक चांगला शिक्षक अनेक विद्यार्थी अनेक पिढ्या घडू शकतो विद्यार्थ्यांच्या मनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांच्या जीवनामध्ये स्फूर्ती देणारा झरा म्हणजे शिक्षक होय विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचे महान कार्य खऱ्या अर्थाने शिक्षक करत असतो आपल्या जीवनामध्ये जेवढे महत्त्व आई-वडिलांना आहे तेवढेच महत्त्व शिक्षकांना देखील आहे शिक्षकांचा आजही सन्मान केला जातो खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षक होय आणि या घटकामुळेच देशाचे सुजाण नागरिक घडण्यास मदत होते देशाचे व समाजाचे आदर्श नागरिक शिक्षकांच्या हाताने घडत असतात त्यामुळे एक चांगला शिक्षक हजारो पिढ्या घडवण्याचे कार्य करतो विद्यार्थी हा मातीचा गोळा असतो आणि या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचं काम शिक्षकच करत असतात विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण कौशल्य आत्मसात करण्यासाठी शिक्षक हे प्रेरणादायी म्हणून काम करत असतात आपल्यासमोरील विद्यार्थ्यांचे भविष्य प्रकाशमय होण्यासाठी शिक्षक अहोरात्र कष्ट घेत असतात आपल्या विद्यार्थ्यांचे चांगले झाले पाहिजे आपला विद्यार्थी खूप मोठा झाला पाहिजे हे फक्त त्या विद्यार्थ्यांचे आई-वडील आणि शिक्षकांनाच वाटत असते विद्यार्थ्यांचे जीवन सुखमय करण्यासाठी शिक्षक मार्गदर्शन करत असतात शिक्षक हे केवळ पुस्तके शिकवत नाही तर विद्यार्थ्यांना जीवनातील विविध अनुभव देण्याचे कार्य शिक्षकच करत असतात.
आज आपण शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेला आहोत आपल्या शाळेमध्ये सकाळपासून खऱ्या अर्थाने विद्यार्थी हेच आज शिक्षक बनलेले आहेत आणि त्यांना देखील शिक्षकांचे जीवन कसे आहे हे एक दिवस तरी अनुभवायल आलेले आहे प्रत्येक शिक्षकासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी सारखेच असतात प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी शिक्षक घेत असतात एखादा विद्यार्थी जर चुकत असेल तर त्याला समजावून सांगण्याचे काम योग्य दिशेने देण्याचे कार्य शिक्षक करत असतात ज्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्यांची काळजी घेतात त्याचप्रमाणे विद्यार्थी देखील शिक्षकांचा आदर सन्मान घेतात.
जीवनामध्ये गुरुचे स्थान मोठे आहे गुरुचा महिमा खूप मोठा आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक गुरु असतोच आणि तो केलाच पाहिजे कारण गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आणि ते ज्ञान मिळवायचे असेल आणि टिकून ठेवायचे असेल तर गुरु शिवाय पर्याय नाही गुरु हेच ग्रंथ असतात पुस्तकांना देखील गुरु मानलेला आहे पुस्तके देखील आपल्याला मार्गदर्शन करतात योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देतात त्यामुळे ग्रंथा एवढेच शिक्षकाचे स्थान देखील महत्त्वाचे आहे शिक्षक हे प्रत्यक्ष ज्ञानाचे भांडार असतात आणि त्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यांना मोठे करण्यासाठी करतात शिष्य देखील मोठा झाल्यावर त्यांनी गुरुचे सन्मान केला पाहिजे.