शिक्षक दिन सोपे मराठी भाषण marathi speech on teachers’ day
अक्षर अक्षर शिकवून आम्हाला, शब्दाचा अर्थ सांगितला… कधी प्रेमाने तर कधी रागावून, जीवनाचा मार्ग दाखवला… सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन
वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो ! सर्वांना माझा नमस्कार! सर्वप्रथम आपणास शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक…!
आज 05 सप्टेंबर हा दिवस आपण ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन होय.
ते कुशल वक्ते, थोर विचारवंत, विद्वान, उत्तम लेखक व आदर्श शिक्षक होते. त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती, संकट काळात धैर्य देणारी स्फर्ती !
चारित्र्य पूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार जादूची छडी म्हणजे जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार…!
शिक्षक दिन हा राष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आहे. हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल आद्र व कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते अट असते.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता असतो. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो. त्याप्रमाणे शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देत असतात. शिक्षक दिन सर्व शाळा व महाविद्यालयात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देतात. या दिवशी शिक्षक हेच भावी पिढीचे शिल्पकार आहेत. शिक्षण हाच खरा विकासाचा मंत्र आहे. शिक्षक हेच समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. यामध्ये शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे. ज्याप्रमाणे माळी झाडांची काटछाट करून त्याला सुंदर बनवतो. त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचे दुर्गुण दूर करून त्यांच्यात सदगुणांचा विकास घडवून आणतात. शिक्षणाच्या ज्योतीतून, अज्ञानाचा अंधार दूर करत, नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना – शत शत प्रणाम ! शत शत प्रणाम !!