राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण marathi speech on rajarshi shahu Maharaj 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण marathi speech on rajarshi shahu Maharaj

आरक्षणाचे जनक दीनदुबळ्यांचे कैवारी कुशल प्रशासक राधानगरी धरणाचे निर्माते थोर समाज सुधारक शिक्षण प्रेमी राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती साजरी करत आहोत.

या जयंतीच्या निमित्त आपल्या शाळेमध्ये देखील कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे मी तुम्हाला राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी दोन शब्द सांगणार आहे तुम्ही शांततेने ऐकून घ्या ही नम्र विनंती.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे होते तर आईचे नाव राधाबाई होते.

तत्कालीन कोल्हापूर संस्थांचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी कागलच्या घाटगे घराण्यातील यशवंतराव यास दत्तक घेऊन त्यांचे नाव राजर्षी शाहू महाराज ठेवण्यात आले शाहू महाराजांचे शिक्षण 1885 ते 1889 या कालावधीमध्ये राजकोट येथे झाले.

शाहू महाराजांना शिक्षणाचे महत्त्व खूप होते आपल्या कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचे त्यांनी आदेश दिलेले होते कोल्हापूर संस्थानात गावोगावी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळेमध्ये पगारी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांच्यावर दंडाची कारवाई त्यांनी सुरू केली होती. शाहू महाराजांच्या या कार्यामुळे खेड्यापाड्यातील सामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहोचण्यास मदत झाली.

कोल्हापूर संस्थानातील सामान्य लोकांना शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी एक लाख रुपये खर्च करत असत महात्मा फुलेंनी शिक्षणाचे सांगितलेले महत्त्व प्रत्यक्षात अंमलबजावणीचे काम राजर्षी शाहू महाराज यांनी केले होते.

प्राथमिक शिक्षणाबरोबरच उच्च शिक्षण ही विद्यार्थ्यांना घेता यासाठी शाहू महाराजांनी व सतीगृह यांची स्थापना केली निरनिराळ्या जाती धर्मातील लोकांना मुलांना एकाच वस्तीगृहात राहताना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून शाहू महाराजांनी प्रत्येक जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांकडता स्वतंत्र्य व सती गृह उभारले यामध्ये राजाराम वस्तीगृह मराठा बोर्डिंग वीर शिव लिंगायत बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग मिस क्लार्क बोर्डिंग नामदेव बोर्डिंग इत्यादी वस्तिगृहांचा समावेश होता अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले होते.

ज्या विद्यार्थ्यांना प्रदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांकरिता त्यांनी शिष्यवृत्तीची योजना राबवली होती अशाच प्रकारच्या शिष्यवृत्तीची संधी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिले होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण प्रदेशात जाऊन पूर्ण करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज यांनी केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याप्रमाणे शूद्र मानून त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला तशाच प्रकारचा त्रास शाहू महाराजांना सुद्धा झाला होता शाहू महाराजांच्या बाबतीत वेदोक्त प्रकरण घडले होते शाहू महाराजांच्या पूजा आर्चीच्या वेळी वेदोक्त मंत्र न म्हणता त्यांच्या ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणता म्हणत असत कारण ब्राह्मणांच्या मते छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे क्षत्रिय नसून शूद्र असल्याकारणाने त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्र मानता येणार नाही.

शाहू महाराजांच्या बाबतीत राजे असूनही असा प्रसंग घडत असेल तर सर्वसामान्यांच्या बाबतीत खूप वेगळी परिस्थिती तत्कालीन होती असे शाहू महाराजांना वाटले म्हणून कोल्हापूर संस्थानांमध्ये वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांनी बहुजन समाजातील पुरोहित तयार करण्याचा निर्णय घेतला धार्मिक विधीचे शिक्षण देण्यासाठी त्यांनी श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली पूर्वी सर्व विधी करण्यासाठी ब्राह्मणांची आवश्यकता होती शाहू महाराजांचा या निर्णयानंतर त्यांना न बोलवता ही धार्मिक विधी पार पाडले जाऊ लागले अशाप्रकारे आत्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्य शाहू महाराजांनी पुढे चालू ठेवले सर्वसामान्य जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी काम केले.

समाजामध्ये जातीभेदीचा भिंती पाडण्यासाठी शाहू महाराजांनी निर्णय प्रयत्न केले राजर्षी शाहू महाराज स्वतः कोणत्याही प्रकारचा जातिभेद मानत नव्हते.

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कोल्हापूर संस्थानात शिक्षण सामाजिक प्रबोधन सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे अशा या महामानवाने 6 मे 1922 ला या जगाचा निरोप घेतला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना माझे विनम्र अभिवादन

 

Leave a Comment