15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिन छोटे मराठी भाषण marathi speech on independence day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिन छोटे मराठी भाषण marathi speech on independence day 

स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.

कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या

विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या

पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे

रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य

सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम

व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी

टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज

केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर

भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य

मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र

ठरली. १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य

मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर

सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले

जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम

असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते

आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते

1 thought on “15 ऑगस्ट 2024 भारतीय स्वातंत्र्य दिन छोटे मराठी भाषण marathi speech on independence day ”

Leave a Comment