15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण marathi speech on independence day
भाषण क्रमांक-१
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निबंध
१५ ऑगस्ट १९४७, हा भारतीय इतिहासातील सर्वात भाग्यवान आणि महत्वाचा दिवस होता, जेव्हा आपल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वकाही त्याग करून, आपल्या प्राणांची आहुती देऊन भारत देशासाठी स्वातंत्र्य मिळवले. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर, भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या रूपात त्यांचे पहिले पंतप्रधान निवडले, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. आज प्रत्येक भारतीय हा १५ ऑगस्ट विशेष दिवस अगदी सणासारखा साजरा करतो.
बऱ्याच वर्षांच्या बंडांनंतरच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि 14 आणि 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र देश बनला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच भारतीय ध्वज फडकवला. त्यांनी मध्यरात्रीच्या वेळी “ट्राय योर डेस्टिनी” हे भाषण दिले. संपूर्ण राष्ट्राने अत्यंत आनंदाने आणि समाधानाने त्याचे ऐकले. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान जुन्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि जनतेला संबोधित करतात. यासह तिरंग्याला 21 तोफांची सलामी दिली जाते.
भाषण क्रमांक-२
स्वातंत्र्य दिन दहा ओळीचे भाषण
१. भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
२. तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
३.१५ ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी खूप
महत्त्वाचा आहे. ४. या दिवशी आपण सर्व भारतीय आणि आपल्या भारताला २०० वर्षांनंतर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले.
५. हा आपला राष्ट्रीय सण आहे.
६. भारताचे नाव उच्च ठेवण्यासाठी अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
७.१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
८. आपल्या अनेक शूर नेत्यांनी आणि देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
९. त्या देशभक्तांनी देश मुक्त करण्यासाठी आपले प्राण दिले.
१०. सर्व देशभक्तांचा असा विश्वास होता की जर आपण गुलाम राहिलो तर आपल्या भावी पिढ्याही गुलाम होतील, म्हणून त्यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण दिले.
मराठीत स्वातंत्र्यदिनी 10 ओळी
भाषण क्रमांक-३
15 ऑगस्ट भाषण
भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला… 15 ऑगस्टला आमचा भारत स्वतंत्र झाला…
१. सर्वांना नमस्कार!
२. माझे नाव कांचन वाघ आहे.
३. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत.
४. प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
HAPPY INDEPENDENCE DAY
५. 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला.
६. स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे.
७. हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो.
८. या दिवशी भारताचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात.
९. हा सण आपणास स्वातंत्र्यासाठी हुतात्मा
झालेल्यांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो.
१०. आज आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया. जय हिंद ! जय भारत…
भाषण क्रमांक-४
१५ ऑगस्ट
१. इंग्रज भारतात व्यापारासाठी आले व हळूहळू देशाचे राज्यकर्ते बनले.
२. ब्रिटिशांनी सुमारे दीडशेहून अधिक वर्ष भारतावर राज्य केले.
३. त्यांनी भारतीयांना गुलाम म्हणून वागवले.
४. इंग्रजांनी येथील शेतकरी, सामान्य नागरिक यांच्यावर अनेक निर्बंध लादले.
५. देशातील जनता ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीखाली भरडली जात होती.
६. अखेर भारतीयांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले व अनेक वर्षे त्यांच्याविरुद्ध लढा दिला.
७. या लढ्यात हजारो क्रातिकारक, नागरिकांना हौतात्म्य प्राप्त झाले.
८. अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
९. दरवर्षी हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभर साजरा केला जातो.
१०. यादिवशी अनेक ठिकाणी ध्वजारोहण राष्ट्रगान व थोर हुतात्म्यांना अभिवादन केले.
भाषण क्रमांक-५
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजण इथे आपल्या भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.
सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! मित्र हो, १५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजा सहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इ. सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साग आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
तरीही आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचार, गरीबी सारख्या समस्या आ वासून आहेत. या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी, संपन्न व प्रगत होणार नाही.
चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया.
भाषण क्रमांक-६
सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे तसेच माझे गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला दोन शब्द स्वातंत्र्य दिना विषयी सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्याल अशी मी नम्रतेची विनंती करते संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या उत्सवात मग्न झाला आहे. तसेच मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.
१५ ऑगस्ट १९४७ हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या २०० वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिश राजवटीत देशातील जनतेवर खूप अत्याचार झाले.
इंग्रजांच्या अत्याचारातून देशातील जनतेची सुटका करण्यासाठी शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मंगल पांडे, राजगुरू, सुखदेव, यांसारख्या अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वतंत्र करण्यात त मोलाचे योगदान दिले. दिल या सर्व क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यसैनि- -कांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.
मित्रांनो । दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस येतो आणि ‘आपण स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र राहू’ ही भावना हर्दयात आणि मनात जागृत होते. आजच्या या पवित्र दिवशी राष्ट्रध्वजाला वंदन करूया आणि राष्ट्राच्या कल्याणाचा संकल्प करूया. देशाच्या विकासासोबतच देशाची सुरक्षा आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी सदैव समर्पित राहण्याची शपथ घेऊया.
तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद जय भारत !
भाषण क्रमांक-७
तीन रंगांचा तिरंगा, आकाशी आज फटकता नतमस्तक मी, त्या सर्वांसाठी, ज्यांनी भारत देश स्वतंत्र केला. १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत ब्रिटिशांच्या साखळदंडातून स्वतंत्र झाला. पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताना स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो के राष्ट्रीय सन संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जातो
कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला जुलमी ब्रिट्रिश राजवटीच्या जोखंडातून भारतभूमीला स्वतंत्र कण्यासाठी जीवाची रान करणारा जीवाची बजी लावणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते स्वातंत्र्य वीरांना, प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्याग, बलिदानाने भारत बनला आहे महान त्या ब्रिटिशांनी सर्वप्रथम व्यापारासाठी आलेल्या टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे संस्थाने काबीज केले. १५ ऑगस्ट १९६७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोइन स्वतंत्र मिळवले. ती रात्र ठरली.
या दिवशी दिल्लीच्या किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. १५ ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजे आदल्या दिवशी. आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरुन राष्ट्रला संदेश देतात. दिवशी सकाळी लाल किल्ल्यावर तिरंगाचे ध्वजारीक्षण होते, राष्ट्रगीत होऊन प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख राजघाटावर महात्मा गांधी आणि इतर थोर नेत्यांना मद्द्यांजली वाहतात.
आणि नंतर प्रमुख कार्यक्रमाला जातानः या दिवशी दिल्लीत म्हणजे आपल्या राजधानीत तसेच सर्व शाळांमध्ये व कॉलेजांमध्ये सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. १५ ऑगस्ट दिवशी भारत सरकार आनेक व्यक्तींना राष्ट्रीय पुरस्कार देतात.
भाषण क्रमांक-८
१७ ऑगस्ट भाषण
विसरू नका अशा वीराना, ज्यांनी देशासाठी दिले प्राण, तिरक्षा आहे आपली शान, आणि सैनिकच राखतात त्याची जान.
सूर्याप्रमाणे तेज दिसम्णारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शितल छाया देणारे परीक्षक उराणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या देशबांधवानी, सर्वांना माझा नमस्कार । आज १५ ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन । आज आपण सर्वजन इथे भारताचा उद् वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासावो एकत्र जमलो आहेत. सर्वप्रथम सवर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खूप शुभेच्छा…। १५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खूप खास आहे. १७ ऑगस्ट १९४७ मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. मित्रांनो, इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करीत होते. त्या अत्याचारोना कंटा ळून भारतीयांनी एकत्र येऊन बड पुकारले उठाव, एव, चळवळी, सत्यासह आंदोलूने करून इंग्रजांना जेरीस आणले. अखेर १७ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला.
भाषण क्रमांक-९
स्वातंत्र्य दिन
१) स्वातंत्र्य दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.
२) हा १५ ऑगस्टला साजरा केला जातो.
३) हा भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे.
४) स्वातंत्र्य दिन देशभरात थाटामाटात साजरा केला जातो.
५) १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
६) देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूर वीरांनी प्राणांचे बलिदान दिले.
७) त्या सर्व शूर वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.
८) या दिवशी भारताचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात.
भाषण क्रमांक-१०
छोटे व सोपे भाषण
१५ ऑगस्ट
फक्त प ओळी सुंदर भाषण
KINEMASTER
अध्यक्ष्म महाशय, पुज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो…
१ आज १५ ऑगस्ट ! आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन.
२ १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
३ महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू यांसारख्या अनेक नेत्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
४ हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो.
५ चला, आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करूया. स्वच्छ भारत, सुंदर भारत करूया. सर्वांना स्वातंत्त्यदिनाच्या शुभेच्छा !
जय हिंद ! जय भारत ।
धन्यवाद ।
1 thought on “15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जबरदस्त मराठी भाषण marathi speech on independence day ”