गुरुपौर्णिमा मराठी भाषण marathi speech on gurupornima
जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये योग्य मार्ग दाखवण्याची तसेच योग्य मार्गदर्शन करण्याचे काम हे गुरुच करतात चांगले जीवन कशा पद्धतीने जगावे ही कला आपल्याला गुरुच शिकवतात या भाषणामध्ये आपण गुरु विषय का महिमा तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणामध्ये कोणते मुद्दे घ्यायचे आहेत ते पाहणार आहोत अतिशय सुंदर रीतीने अप्रतिम भाषेमध्ये आपण गुरुपौर्णिमेनिमित्त भाषणाची तयारी करण्यासाठी सदर पोस्टमध्ये माहिती दिलेली आहे.
गुरुपौर्णिमा आपण साजरी करत असतो यामध्ये गुरुपौर्णिमा या दिवशी शिक्षक आणि आपल्या गुरु बद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा दिवस म्हणजे गुरुपौरमा होय याच दिवशी विद्यार्थी शिक्षकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात उपक्रम घेत असतात या कार्यक्रमांना काही विद्यार्थी आपल्या आवडीच्या गुरुजींच्या बद्दल भाषण देखील सादर करतात.
गुरु पौर्णिमा ही केवळ भारत नेपाळ आणि इतर देशांमध्ये हिंदू बुद्ध आणि जैन धर्मीयांद्वारे साजरा केला जाणारा एक वार्षिक उत्सव आहे. हिंदू कॅलेंडरच्या नुसार आषाढ जून जुलै या हिंदू महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
शालेय जीवनामध्ये गुरुपौर्णिमेचे भाषण करताना सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा
माझे नाव……….. आज आपण सर्वजण या ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी जमलेलो आहोत आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान खूप मोठे आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचे स्थान हे ईश्वराच्या समान आहे कारण की गुरु आपल्याला अनमोल जीवन जगण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश देतात.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडविले त्यावरून प्रति आदर व्यक्त करण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा महत्त्वाचा दिन म्हणजे गुरु पूर्णिमा होय. आपल्याला खऱ्या अर्थाने आई-वडील हे पंख देत असतात म्हणजे जन्म देतात आणि त्या पंखांमध्ये बाळ देण्याचा काम फरारी मारण्यासाठी बळ देण्याचं काम हे खऱ्या अर्थाने गुरुच करतात अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी गुरूच आपल्या ज्ञानामध्ये भर घालतात येणाऱ्या काळामध्ये एक चांगला सुज्ञ नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार करण्याचे काम हे गुरुच करतात गुरु हे आपल्या शिष्याला योग्य दिशा योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात. अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध कसे लढावे ही शिकवण देतात. चांगले काय वाईट काय काय दिले मी काय होते अशा प्रकारचे मार्गदर्शन फक्त गुरुच करतात प्रत्येक गुरूला एकच वाटत असते की आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा हे फक्त गुरुलाच वाटते.
त्यामुळे गुरुची आठवण नेहमीच राहते आणि गुरुने दिलेले संस्कार गुरुने दिलेला मंत्र हा नेहमी आयुष्यात कामे पडतो त्यामुळे गुरुचे महत्त्व हे खूप मोठे आहे प्रत्येक मानवाला गुरु असतो गुरुच्या सानिध्यात राहून अनेक गोष्टी आपल्याला शिकण्यास मिळतात जीवन जगण्यासाठी जीवनाचे कौशल्य विकसित करण्यासाठी गुरुचे मार्गदर्शन हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे मी आज असे म्हणेल की
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह अस्मैसी गुरवे नमः
आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी भाषण सांगितले ते भाषण तुम्ही शांततेने ऐकलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानते व मला इथे गुरूंनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते धन्यवाद!