Marathi Speech on bhimjayanti भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी भाषण
भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 891 रोजी मध्यप्रदेश मधील महू या ठिकाणी झाला त्यांचे वडील त्या ठिकाणी सैन्य दलामध्ये नोकरी करत होते त्यामुळे त्यांचे बालपण त्या ठिकाणीच गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व होते लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार चाणाक्ष बुद्धिमान होते.
लहानपणीच ते शाळेत असताना त्यांना शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले यामध्ये गरिबांना तसेच दलितांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळत नव्हते त्यावेळेस स्पर्श अस्पृश्यता चे स्तोम माजले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणी ज्या शाळेमध्ये होते त्या ठिकाणी देखील त्यांना असे अनुभव आले त्यांना अनेक वेळा वर्गाच्या बाहेर बसून अध्ययन करावे लागले त्यामुळे त्यांचे मन अतिशय दुःखी झाले.
त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच ठरवले की आपण ही अस्पृश्यता नष्ट करायची गोरगरिबांना दलितांना कामगारांना शोषितांना न्याय मिळवून द्यायचा त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी लढाईचे व त्यांना चांगल्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी न्याय मिळवून द्यायचा हे त्यांनी लहानपणीच ठरवले होते.
अतिशय गरीब घरात जन्मून देखील त्यांनी उच्च पातळीवरचे शिक्षण घेतले प्रदेशातून डॉक्टर एट पीएचडी लॉ अशा अनेक पदव्या त्यांनी घेतल्या शाहू महाराज सयाजीराव गायकवाड यांनी प्रदेशातील शिक्षणाचा खर्च भागवला.
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी काही दिवस वकिली पदाची नोकरी देखील केली परंतु त्यांचे नोकरी मध्ये मन रमली नाही त्यांनी समाजातील चालीरीती रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला.
नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये त्यांनी आंदोलन केले आणि दलितांना व गोरगरिबांना शोषितांना पिढी त्यांना दर्शन घेण्यासाठी मंदिरात सत्याग्रह केला तसेच चवदार तळ्याचा सत्याग्रह देखील त्यांनी केला यामध्ये गरीब समाजातील स्पृश्य अस्पृश्य समाजातील दलितांना सार्वजनिक पानवट्यावर पाणी भरण्याची परवानगी नव्हती ती परवानगी त्यांनी मिळवून दिली अशा प्रकारचे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केले.
तसेच त्यांनी भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस देखील सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम पाहिले पुढे भारत सरकारने भारताचे संविधान लिहिण्यासाठी त्यांची नियुक्ती केली त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवले खऱ्या अर्थाने मसुदा लेण्यांचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी के केले . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक देशातील वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास केला व सर्वसमावेशक अशी आपल्या भारताची सर्वात मोठी राज्यघटना संविधान लिहिण्याचे काम त्यांनी केले हे काम करण्यासाठी त्यांना दोन वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला यामध्ये सर्व जातीतील धर्मातील लोकांना समान हक्क कर्तव्य न्याय देण्याचं काम त्यांनी केलं.
शेवटी जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांच्या धर्मामध्ये1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
अशाप्रकारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांनी आपले सामाजिक शैक्षणिक कार्य केले त्या मुळे आज ते आपल्या विचारामुळे आजही आपल्यामध्ये असल्याची जाणीव सर्वांना होते अशा या महान व्यक्तिमत्त्वाला माझा साष्टांग दंडवत विनम्र अभिवादन.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत