भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी सुंदर भाषण marathi soeech on bhimjayanti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
marathi essay on bhimjayanti 
marathi essay on bhimjayanti

भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी सुंदर भाषण marathi soeech on bhimjayanti 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे कुटूंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेले महार कुटुंब होते. वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि आई भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४ वे अपत्य होते. त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले, त्यामुळे कुणी भीम, भीमा व भिवा नावानेही त्यांना हाक मारत. भीमरावांचे कुटूंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे गावचे होते. (आंबडवे या गावचा अंबावडे असा चूकिचा उल्लेखपूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.) त्यांचे पूर्वज ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांच्या वडिलांनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. त्यामुळे

त्यांनी आपल्या मुलांना, आणि विशेष करून भीमरावाला शिक्षण देऊन, ज्ञानोपासनेची प्रेरणा दिली. इ.स. १८९६ मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या, म्हणून रामजींसह सर्वजण त्यांचा आदर करीत असत. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी सातारा येथील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल सातारा) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही अंबावडेकर असा चूकीचा उल्लेख केलेला आहे) साताऱ्याच्य शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णाजी केशव आंबेडकर नावाचे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले आंबडवेकर हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे आंबेडकर हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. त्याला बाळ भीमाने लगेच होकार

दिला आणि बाबासाहेबांचे आडनाव आंबडवेकराचे आंबेडकर झाले. तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून बाळ भीमाचे नाव आंबेडकर झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.

पिता रामजींनी मीराईंच्या सांगण्यावरून इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि हे कुटुंब मुंबईला नेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले. कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वतः लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र’ हे पुस्तक भेट म्हणून दिले. ते पुस्तक वाचून त्यातील काही प्रसंगांनी भीमराव अक्षरशः भारावून गेले. तेव्हा वडीलांनी आम्हाला बौद्ध साहित्याचा परिचय का करून दिला नाही? असे त्यांना वाटले. त्यांनी वडीलांना सरळ विचारले की, ” ज्या ग्रंथात केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव आणि शूद्र व अस्पृश्यांची नालस्ती केली आहे, ते महाभारत व रामायणासारखे ग्रंथ त्यांनी मला वाचावयास का सांगितले ? तेव्हा वडील म्हणाले, आपण अस्पृश्य जमातीचे आहोत आणि त्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने हा न्यूनगंड दूर होण्यास मदत होईल. द्रोण व कर्ण ही अत्यंत लहान माणसेही किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे. वाल्मिकी हा कोळी असूनही रामायणाचा कर्ता झाला. वडिलांच्या युक्तिवादात त्यांना तथ्य आढळले परंतु त्याने त्यांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्तीरेखा त्यांच्या मनाला भूरळ घालू शकली नाही, हे त्यांच्या वडीलास स्पष्ट शब्दात सांगितले की, मला भीष्म, द्रोण, किंवा कृष्ण कुणीच पसंत पडले नाही. रामही मला आवडत नाही. यावर त्यांचे वडील चूप राहिले. भीमरावांच्या मनात बंड उद्भवले आहे हे वडीलांच्या लक्षात आले आणि त्यामुळे भीमराव तेथूनच बुद्धांकडे वळले. रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे

साहाय्य मिळत नसे. इ.स. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई

विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. इ.स.१९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रविषय घेऊन बी.ए. ची

पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याचवर्षी त्यांना यशवंतहा पुत्ररत्न प्राप्त झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स.१९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी या दुःखी सुपुत्राने उदार हृदयी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च

शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.

Leave a Comment