150 मराठी म्हणी व त्यांचा अर्थ marathi proverbs and meaning
अ. क्र. | म्हणी | म्हणी चा अर्थ |
1 | अति तिथे माती | कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक असतो |
2 | अति शहाणा त्याचा बैल रिकामा | जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते |
3 | अडला हरी गाढवाचे पाय धरी | शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते |
4 | असतील शिते तर जमतील भूते | आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात |
5 | आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी | जेथे मदतीची गरज आहे तेथे तीन पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे |
6 | आगीतून फुफाट्यात | लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे |
7 | आधी पोटोबा मग विठोबा | आधी स्वतःच्या पोटापाण्याचा विचार करणे व नंतर अन्य काम करणे |
8 | अंथरूण पाहून पाय पसरावे | ऐपतीच्या मानाने खर्च करावा |
9 | आवळा देऊन कोहळा काढणे | शिल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे |
10 | आयत्या बिळात नागोबा | दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधने |
11 | आलिया भोगासी असावी सादर | जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे |
12 | आपला हात जगन्नाथ | आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सूचने योग्य ठरते |
13 | हाडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार | जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय |
14 | आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन | किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे |
15 | इकडे आड तिकडे विहीर | दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे |
16 | उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग | उतावळेपणाने मूर्ख सारखे वर्तन करणे |
17 | उचलली जीभ लावली टाळ्याला | विचार न करता वाटेल ते अमर्याद पणे बोलणे |
18 | उथळ पाण्याला खळखळाट फार | ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडा ही मारतो |
19 | ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये | एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलो बाळगू नये |
20 | एक ना धड बाराभर चिंद्या | एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे |
21 | एका हाताने टाळी वाजत नाही | कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडे माणसे जबाबदार असतात |
22 | ऐकावे जनाची करावे मनाचे | कोणत्याही कामाबाबत दुसऱ्यांचे मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे |
23 | कर नाही त्याला डर कशाला | ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची भीती बाळगण्याचे कारण नाही |
24 | करावे तसे भरावे | दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच |
25 | कामापुरता मामा | गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस |
26 | काखेत कळसा गावाला वळसा | हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे |
27 | काना मागून आली आणि तिखट झाली | एखाद्या व्यक्ती पेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे |
28 | काळ आला होता पण वेळ आली नव्हती | एखादे घोर संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे |
29 | कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही | शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही |
30 | कुऱ्हाडीचा दांडा होतास काळ | आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे |
31 | कोठे इंद्राचा ऐरावत कुठे श्याम भटाची तट्टानी | अति थोर माणूस व सामान्य माणूस यांची बराबरी होऊ शकत नाही |
32 | कोळसा उघडावा तितका काळाच | दुष्ट माणसासबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याचे अधिक अधिक दुष्कृत उजेडात येतात |
33 | कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही | निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही |
34 | कोंड्याचा मांडा करून खाणे | हालाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे |
35 | कोल्हा काकडीला राजी | सामान्य कृतीची माणसे शूद्र वस्तूच्या प्राप्तीने ही संतुष्ट होतात |
36 | खाई त्याला खवखवे | जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते |
37 | खान तशी माती | आई-वडिलांप्रमाणे मुलाची वागणूक |
38 | खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी | एक तर विलासी जीवन उपभोक्ता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाची निवड करणे |
39 | खायला काळ भुईला भार | निरहुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो |
40 | गरजवंताला अक्कल नसते | गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते |
41 | गर्वाचे घर खाली | गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्विकरावा लागतो |
42 | गरज सर्व वैद्य मरो | आपले काम संपतात उपकार कर्त्याला विसरणे |
43 | गरजेल तो पडेल काय | केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही |
44 | गाढवाला गुळाची चव काय | अडाण्याला चांगल्या वस्तूंचे मोल कळत नाही |
45 | गावकरी ते राव न करी | जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटाच श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकत नाही |
46 | गुरुची विद्या गुरुला फळली | एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे |
47 | गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली | एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे |
48 | गोगलगाय नि पोटात पाय | एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे |
49 | घरोघरी मातीच्या चुली | सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे |
50 | चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे | प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच |
51 | चोराच्या मनात चांदणे | आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे |
52 | चोर सोडून संन्याशाला सुळी देणे | अपराध्याला सोडून निरा प्राध्याला शिक्षा देणे |
53 | चोरावर मोर | एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे |
54 | पाण्यात राहून माशाची वैर करू नये | जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैर भाव ठेवू नये |
55 | जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे | दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत |
56 | जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही | मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही |
57 | जे न देखे रवी ते देखे कवी | कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे वर्णन करू शकतो |
58 | ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी | ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे |
59 | झाकली मूठ सव्वा लाखाची | मोन पाळून अब्रू राखणे |
60 | टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही | अपार कष्टांपासून मोठेपणा मिळत नाही |
61 | डोंगर पोखरून उंदीर काढणे | अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे |
62 | तळे राखी तो पाणी चखी | एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच |
63 | तहान लागल्यावर विहीर खानने | एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे |
64 | ताकापुरती आजी | स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे |
65 | थेंबे थेंबे तळे साचे | थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो |
66 | दगडापेक्षा वीट मऊ | मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे |
67 | दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर जात नाहीत | अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे |
68 | दाम करी काम | पैशाने सर्व कामे साध्य होणे |
69 | दिव्याखाली अंधार | मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच |
70 | दुरून डोंगर साजरे | कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते |
71 | देश तसा वेश | परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे |
71 | देव तारी त्याला कोण मारी | देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना |
73 | दैव देते कर्म नेते | अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे |
74 | दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ | भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे |
75 | न कर्त्याचा वार शनिवार | अनेक सबब सांगून कामाची टाळाटाळ करणे |
76 | नव्याचे नऊ दिवस | एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे |
77 | नाव मोठे लक्षण खोटे | बाप का मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे |
78 | नळी फोन केली सोनारे इकडून तिकडे गेले वारे | केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे |
79 | नाचता येईना अंगण वाकडे | आपल्यातील पुणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे |
80 | नाकापेक्षा मोती जड | कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठावून वरचढ होणे |
81 | नावडतीचे मीठ अळणी | नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते |
82 | पळसाला पाणी तीनच | कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे |
83 | पाच मुखी परमेश्वर | पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानाने |
84 | पालथ्या घागरीवर पाणी | केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे |
85 | पुढच्यास ठेच मागचा शहाणा | दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे |
86 | प्रयत्नांती परमेश्वर | कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते |
87 | पदरी पडले पवित्र झाले | कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे |
88 | पाचही बोटे सारखी नसतात | सर्व माणसे सारख्याच स्वभावाची योग्यतेची नसतात |
89 | ती हळद आणि हो गोरी | कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे |
90 | बळी तो कानपिळी | बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो |
91 | बैल गेला आणि झोपा केला | एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते |
92 | बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी | प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे |
93 | भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा | कातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्यास साधनाने ती भागविणे |
94 | भित्यापाठी ब्रह्मराक्षस | भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात |
95 | भरवशाच्या म्हशीला टोणगा | ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे |
96 | भीक नको पण कुत्रा आवर | ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे |
97 | मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये | एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये |
98 | मुलाचे पाय पाळण्यात दिसतात | एखाद्याच्या भावीकर्तबदारीचा अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो |
99 | मनी वसे ते स्वप्निल दिसे | जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडतात |
100 | रात्र थोडी सोंगे फार | कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न करणे |
101 | रोज मरे त्याला कोण रडे | नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनास होते |
102 | लहान तोंडी मोठा घास | आपल्या योग्यतेच न शोभेल असे वर्तन करणे |
103 | लेकी बोले सुने लागे | एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे |
104 | वासरात लंगडी गाय शहाणी | अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते |
105 | शितावरून भाताची परीक्षा | एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे |
106 | शेंडी तुटो की पारंबी तुटो | दृढ निश्चय करणे |
107 | शेरास सव्वाशेर | समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे |
108 | सगळे मुसळ केरात | काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे |
109 | साखरेचे खाणार त्याला देव देणार | भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीत अनुकूल असते |
110 | सुंठी वाचून खोकला जाणे | उपाय योजना करण्या अगोदरच संकट दूर होणे |
111 | सुंभ जळाला की तरी पीळ जात नाही | माणुस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही |
112 | सरड्याची धाव कुंपणापर्यंत | सामान्य कृतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादितच असते |
113 | सत्ते पुढे शहाणपण नाही | ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मता पुढे इतरांच्या मताचा काही किंमत नसते |
114 | हत्ती गेला आणि शेपूट राहिले | कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे कार्य शिल्लक राहणे |
115 | हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे | जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे |
116 | हाजीर तो वजीर | जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल |
117 | हातच्या कंकणाला आरसा कशाला | प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते |
118 | हलवायाच्या घरावर तुळशीपत्र | दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे |
119 | हसतील त्याचे दात दिसतील | चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्याची परवा न करणे |