शालेय मराठी प्रार्थना परिपाठ साठी उपयुक्त marathi prayer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Marathi prayer
Marathi prayer

शालेय मराठी प्रार्थना परिपाठ साठी उपयुक्त marathi prayer 

१. नमो देवराया

नमो देवराया नमो ज्ञानसिंधो, नमो दीननाथा नमो दीनबंधो नमो निर्मला निर्गुणा निर्विकारा, नमो सर्वशक्ते नमो हे उदारा ॥ नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाळा, नमो मायबापा नृपाळा कृपाळा नमो सौख्यकंदा नमो विश्वभूपा, नमो सच्चिदानंद शांतिस्वरुपा ॥

२. हंस वाहिनी सरस्वती

हंस वाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते ॥ धृ.॥ वीना हाती मंजुळ वादन, श्वेत कमल हे मंगल आसन राजहंसतव राजसवाहन, घे वंदन माते ॥ मुर्ती साजरी नयन मनोहर, धवल वस्त्र किती शोभे सुंदर चंद्रही लाजे उदार अंबर, भारावून जाते ॥

३. शुद्धी दे, बुद्धी दे

शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना, शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना तरतम ते उमजेना, उमजेना सत्य फसविते आम्हांला विश्व हे अनित्य दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त निर्भयता जागावी हीच प्रार्थना

४. जे का रंजले

जे का रंजले, गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥ मृदु सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त ॥ ज्यासि आपंगिता नाही, त्यासी धरी जो हृयी ॥ तया करणे पुत्रासी, तेचि दसा आणि दासी ॥ तुका म्हणे सांगो किती, तोचि भगवंताची मूर्ती

५. लहानपण देगा देवा

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ॥ ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार ॥

ज्याचे अंगी मोठेपण, तया यातना कठीण ॥

तुका म्हणे जाण, व्हावे लहानातून लहान ॥

६. गुरुवंदना

प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा ॥ अज्ञानत्व हरोनि बुध्दि मति दे आराध्य मोरेश्वरा ॥ चिंता, क्लेश, दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी ॥ हेरंबा गणनायका, गजमुखा भक्तां बहू तोषवी ॥

७. ईश्वरास वंदिता

ईश्वरास वंदिता, हि मनात प्रार्थना सूर ताल देत असे चराचरास चेतना ॥धृ॥ निळ्या नभातल्या, चंद्र सूर्य चांदण्या वाहती तुझ्या सर्वे पर्वतातल्या नद्या मिळो तुझी कृपा सदा मोह होऊ दे जना ॥ ये वसंत अंगणी उमलत्या कुळ्या कळ्या देखल्या सुगंध तू, फुलवी झाकल्या फुला मिळो तुझी कृपा सदा मोह होऊ दे जना ॥

८. नमस्कार माझा

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा ॥धृ॥ शब्दरुप शक्ती दे, भावरुप भक्ती दे, प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥ विद्याधन दे आम्हांस एक छंद एक ध्यास नाव नेई पैलतीरी दयासागरा ॥ होऊ आम्ही नीतीमंत, कला गुणी बुद्धिवंत कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा ॥

९. मंगलमय चरणी

मंगलमय चरणी तुझ्या, विनंती हिच देवा ॥धृ॥ आठव तव नित्य असो, हृयी गुरु वचन ठसो शुभविचार मनी विलासे, हा अमोल ठेवा देशावर प्रेम करू, कर्तव्य नच विसरू सत्कार्या पुढती सरू, वर असाची द्यावा ॥

१०. केशवा, माधवा

केशवा, माधवा, तुझ्या नामांत रे गोडवा ॥धृ॥ तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा ॥धृ॥ वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी नंदाघरच्या गायी हाकिशी गोकुळी यादवा ॥ वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन हाती रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ॥

११. गुरुराया

मी मातीचा गोळा, तू दिला आकार. काढून विकार, गुरुराया ॥धृ ज्ञानामृत देई, गुरु माझे आई. चुका पोटी घेई, लेकराच्या ॥ गुरु दूर करी, अज्ञान अंधार. प्रकाष होवून, ज्ञानियाचा ॥ संसार नश्वर, स्वार्थाची ती बेडी. मोह पाश तोडी, गुरु माझा ॥ गुरु हाच ध्यास, गुरु माझा श्वास. जगाचा विश्वास, गुरु माझा ॥ गुरु-देव एक, अनुभव आला. साक्षात्कार झाला याची देही ॥ मी मातीचा गोळा, तू दिला आकार काढून विकार, गुरुराया ॥

१२. जो आवडतो सर्वाना

जो आवडतो सर्वाना, तोचि आवडे देवाला ॥धृ॥ दीन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालूनी दुःख नेत्रीचे घेता पिळूनी, फोडी पाझर पाषाणाला ॥ घेऊनी पंगू आपल्या पाठी, आंधळ्याची होता काठी पायाखाली त्याच्यासाठी, देव अंतरी निज ह्याला ।।

जनसेवेचे बांधून कंकन, त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून आपले हृदयसिंहासन, नित भजतो मानवतेला ॥

१३. प्रभाती सूर नभी रंगती प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती ॥धृ॥ पनो-पानी अमुत शिंपित, इषा हसरी हसते धुंदीत जागे होऊन फुले सुगंधिर, तालावरी डोलती ॥ ऋषीवनांची हाक ऐकूनी, मोट धावती शेतांमधुनी पक्षी आपुल्या मधुर स्वरानी, सवरात स्वर मिळविशी ॥ प्रसन्न वदनी सुहासिनी कुनी, सडे शिंपती मुदल करांनी श्री विष्णूचे नाम स्मरूणी, तार कुणी छेडती ॥

१४. ॐ तत सत

ॐ तत सत श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू सिद्ध बुद्ध तू स्कंद विनायक सविता पालक तू ब्रम्ह मज्द तू यहव शक्ती तू ईशू-पिता प्रभू तू रुद्र विष्णू तू राम-कृष्ण तू रहीम ताओ तू वासुदेव गो-विश्वरुप तू सचिदानंद हरी तू

१६. सत्य शिवाहून सुंदर हे

ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे ॥धृ॥ इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे, प्रतिक रम्य शुभंकर हे ॥१॥ चिरा-चिरा हा घडवावा, कळस किर्तिचा चढवावा अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे ॥२॥ त्यागाला त्या नाव नसे, भाग्यवान हा देश असे कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे ॥३॥

१७. जय शारदे

जय शारदे वागीश्वरी विधिकन्यके विद्याधरी ज्योत्स्नेपरि कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा तुझिया कृपेचे चांदणे नित वर्ष दे अमुच्याशिरी वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलावय अंगुली संगीत जन्मा ये नवे, जडता मतीची भंगली उन्मेष कल्पतरुवरी, बहरून आल्या मंजिरी

१८. आई

आई सारखे दैवत सा-या जगतात नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई ॥धृ॥ तीच वाढवी, ती सांभाळी, ती करी सेवाअ तीन त्रिकाळी देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी ॥1 || कौसल्याविण राम न ठावा, देवकी पोटी कृष्ण जन्मला शिवरायांचे चारित्र्य घडवी, आई जिजाबाई ॥२॥ नकोस विसरू ऋण आईचे, स्वर्ग माऊली पुण्याईचे थोर पुरुष ठरुनि तियेचा, होई उत्तराई ॥३॥

१९. शुभंकरोती

दिवा पाहूनी लक्ष्मी येते, करु तिची प्रार्थना, शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा ॥धृ॥ शुभंकरोती कल्याणमं, शुभंकरोती कल्याणमं, जेथे ज्योती, तेथे लक्ष्मी, उभी जगाच्या सेवाधर्मी दिशांदिशांतून या लक्ष्मीच्या, दिसती पाऊल खुणा ॥१॥ या ज्योतीने सरे आपदा, आरोग्यासह मिळे संपदा शत्रुबुद्धिचा विनाश होता, सौख्य मिळे जीवना ॥२॥ दिव्या दिव्या रे दिपत्कार, कानी कुंडल मोतीहार दिव्यास पाहून नमस्कार हा, रिवाज आहे जुना ॥३॥ शुभंकरोती म्हणा मुलांनो, शुभंकरोती म्हणा

२०. प्रभू तू दयाळू

प्रभू तू दयाळू कपावंत दाता, दया मागतो रे तुझी मी अनंता ॥धृ॥ जगविण्यास देहा दिली एक रोटी, नमस्कार माझे तुला कोटी कोटी वासना कशाची नसे अन्य चिंता ॥ तुझ्या पावलांशी लाभता निवारा, निघे शीण सारामिळे प्रेम धारा सर्व नष्ट होती, मनातील खंता ॥

२१. सुसंगती सदा घडो

सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो कलंक मनिचा झडो, विषय सर्वथा नावडो संदधि कमळी दडो, मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो न भजनी चित्त चळो, मति सदुक्त मागी बळो स्वतत्व हृद्या कळो, दुराभिमान सारा गळो पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधो जळो

२२. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ॥धृ॥

जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे पांघरशी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करीशी नाटक, तीन प्रवेशाचे ॥१॥ मुकी अंगडी बालपनाची, रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्यांचे ॥२॥

या वस्त्रात विणतो कोण, एकसारखी नसती दोन कुणा न दिसती त्रिखंडात, त्या हात विणकराचे ॥३॥

२३. अजाण आम्ही तुझी लेकरे

अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता नेमाने तुझ नमितो, गतो तुझ्या गुणांच्या कथा ॥धृ॥ सूर्य चंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे तुझीच शेते सागर, डोंगर फळे फुले पाखरे ॥१॥ अनेक नावे तुला, तुझे रे दहा दिशांना घर करिसी देवा सारखीच तू माया, सगळ्यावर ॥२॥ खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी हौस एवढी पुरवी देवा, हिच एक मागणी ॥३॥

२४. शोधिसी मानवा

शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥धृ॥ मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी ? सूर येती कसे, वाजते बासरी ? रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥१॥ गंध का हासतो, पाकळी सारुनी? वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी भोवताली तुला, साद घाली कुणी खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥२॥ भेटतो देव का, पूजनी अर्चनी ? पुण्य का लाभते, दानधर्मातुनी ? शोध रे दिव्यता, आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ? शोधिसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥३॥

२५. तू बुद्धि दे

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे ॥धृ॥

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे ॥१॥

जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे ॥२॥

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे ||३||

२६. पसायदान

आता विश्चात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ॥

जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढ़ो भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ।। दुरिताचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मंदियाळी अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां ।। चलां कल्पतरुंचे आरव, चेतना चिंतामणींचे गांव

बोलते जे अर्णव, पीयूषाचे ।। चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु ।। किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनि तिहींलोकीं भजि जो आदिपुरुरवी, अखंडित ॥ आणि ग्रंथोपवीजिये, विशेषी लोकी इये दृष्टादृष्टविजयें, हो आवे जी ॥येथ म्हणे विश्चेश्चरावो, हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला ॥

२७. माते मंगलमय माते देई आशीर्वचनाते,

वंदनीय तू पुजनीय तू वरदायिनी माते ॥धृ॥ तुझ्या वैभवी अमुचे वैभव, तव सन्माने अमुचा गौरव, स्फूर्ति प्रेरणा देई अभिनव जग उजळायाते ॥१॥ सभोवती शस्त्रांची खणखण, क्रुर रिपुंचे असुरी वर्तन, तुझ्या रक्षणी स्वधर्मरक्षण जागवु ईयते ॥२॥ दुष्ट मतलबी घरभेद्यांचे, डाव उधळवू आव्हानांचे, चढू हिमालय कर्तृत्वाचे तुझ्या पूजनाते ॥३॥प्रबळ उभारू अविचल भक्ति, प्रलयंकारी अजेय शक्ति, तुझ्या कारण जीवन एकच अम्हाते ॥४॥ अपूर्ण केवळ अमुचे जीवन, चिरवांछित परि ध्येय चिरंतन, याच देहि ते अमुचे हातुन ने पूर्नत्वाने ॥५॥

२८. देह मंदिर, चित्त मंदिर देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ॥ धृ.॥ दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना दुर्बळाच्या रक्षणाला पौरुषाची साधना ॥१॥

जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना, सुन्द्रचा वेध लागो, मानवाच्या जीवना, शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता सशोधना ॥२॥ भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना मुक्त आम्ही फक्त मानू बधुतेच्या बंधना ॥३॥

२९. गीत गातो देवा तुझा सूर्य उगवे आम्हीं प्रकाशात न्हातो तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो || धृ.॥

झऱ्यातुनी निर्मळ वाहे तुझा निळा छंद फुलांतुनी लहरत राहे तुझा हा सुगंध तुझ्या प्रेरणेने पक्षी उंच उंच जातो तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ॥१॥

मुसाफिरा थकल्या देतो वृक्ष गाढ छाया तशी तुझी आम्हांवरती माऊलीची माया जिथे जातो तेथे तुझा नाद ऐकू येतो तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ॥२॥ मंदिरात माणुसकीच्या तुझा नित्य वास सत्य, प्रेम करुणा आहे तिथे तुझा श्वास विकासात वाहून आम्हीं भेट तुझी घेतो तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ||३|| तुझी मुले सगळी आम्हीं, नसे जात-पात द्वेष भेद यांच्या भिंती नको या जगात सुरांतुनी वाहुनि आम्हीं तुझे प्रेम नेतो

तुझे गीत गातो देवा, तुझे गीत गातो ॥४॥

३०. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सिताराम ईस्वर अल्ला तेरे नाम, सबको सन्मती दे भगवान मंदिर मस्जिद तेरे धाम, सबको जन्म दिया भगवान गोविंद गोविंदहरे मुरारे, गोविंद गोपाळ मुकुंद कृष्ण वैष्णव जन तर तोचि म्हणावा, जो परपीडा जानी रे पर दुःखी उपकार करी तरी, मनी अभिमान न आणी रे सकल जनी सर्वांसी वंदी, निंदा करी न कुणाची रे वाचा तन मन निश्चल राखी, धन्य तयाची जननी रे समदृष्टी जो तृष्णा त्यागी. परकोता ज्या माता रे असत्य वचना वदे न रसना, कर न परधना स्पर्शी रे मोह माया व्यापिती ना या, दृढवैराग्य वसे मनी रे

नामस्मरणी लागली टाळी, तनु तार्थखनी त्याची रे

३१. जैसे ज्याचे कर्म

जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर ॥धृ॥

क्षणिक सुखासाठी आपुल्या, होतो कुणी नितीभ्रष्ट कुणी त्यागी जीवन आपुले, दुःखी जग करण्या नष्ट देहापरी जे जे नाही, आत्मा भोगतो नंतर ॥ ज्ञानी असो की अज्ञान, जगी एक आहे रान मग तुला न चुकवी कोणी, थोर असो अथवा लहान सोड सोड माया सारी, आहे हे जग नश्वर ॥ मना खंत वाटून, ज्याचे शुध्द होई अंतःकरण क्षमा करी परमेश्वर त्यास, जातो तयाला जो शरण अंत पृथ्वीचा मग आला, युगे चालती झर झर ॥

आई तुझ्याच पायी मजला सुखे मरु दे यश माप हे भरुदे ॥धृ॥ कसली विलोभने ही, दिसतील ठायि ठायी उडवीन ठोकरीने, तव साउली असु दे ॥१॥ तव पुत्र कोटि कोटी, परि भाग्य ना ललाटी जाणीव जाळिते ही, रजनी तरी जळू दे ॥२॥ निज संपदा घराला, येता फिरुन तिजला पद दोन टाकण्याते, मम देह हा असु दे ॥३॥ उधळीन प्राण माझे, चरणास रक्त ताजे हसरा मुखेंदु आई, मम लोचनी असू दे ॥४॥ समरी ध्वजा चढावी, गगनी उषा हसावी जयनाद होउनीया, श्रवणी तुझ्या पडू दे ॥५॥

३२. खरा तो एकचि धर्म

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ॥ धृ.॥

जगी जे हीन अति पतित, जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ||धृ. १।। जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे ॥१॥ समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥२॥ सदा जे आर्त अति विकल, जयांना गांजती सकल तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ||३|| कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ॥४॥

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे ॥५॥ असे जे आपणापाशी, असे जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे ॥६॥ भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे ||७|| असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राण ही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ॥८॥

३३. सदा सर्वदा

सदा सर्वदा योग तूझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गूणवंता अनंता, रघूनायका मागणे हेचि आतां कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी मोरया मोरया मी बाळ तान्हें, तुझीच सेवा करु काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा ब तू घाल पोटी ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे, त्या त्या ठीकाणी निजरुप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी, तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी

३४. जय सरस्वती मां

ये हंसावरती बसून ये गरूडावरती बसून ॥ नेसूनी शुभ पातळ गळा घालूनी मुक्ताफळ कटी कंबरपट्टा कसून ॥ हाती घेवूनीया वीणा करी मंजूळ गायना ये सभेमध्ये हसून ॥

तुका म्हणे ब्रम्हनंदिनी मम हृदय विराजूनी दे अंर्तः ज्ञान ठसून ॥

 

Join Now

Leave a Comment