“मराठी प्रेरणादायी सुंदर कथा” marathi motivational stories
एका माणसाला बोट रंगवायला सांगितली होती. त्याने आपले रंग आणि ब्रश आणले आणि मालकाने त्याला विचारल्याप्रमाणे बोटीला एक चमकदार लाल रंग लावल्यास सुरुवात केली.
तो पेंटिंग करत असताना त्याला एक लहान होल/छिद्र दिसल आणि त्याने शांतपणे ते ठीक केले.
जेव्हा त्याचे पेंटिंग करणे संपले,
तेव्हा त्याला त्याचे पैसे मिळाले आणि निघून गेले.
दुसऱ्या दिवशी, बोटीचा मालक पेंटर जवळ आला आणि त्याला उदार मनाने खूप पैसे दिले, पेंटिंगच्या फीपेक्षा खूपच जास्त.
चित्रकार आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, “तुम्ही मला बोट रंगवण्यासाठी यापूर्वीच पैसे दिले आहेत, साहेब!” ”
“पण हे पेंटिग कामांसाठी नाही. बोटीतील छिद्र दुरुस्त करण्यासाठी आहे. ”
“हो ! पण हे इतकं छोटसंच काम होत… नक्कीच मला इतक्या कमी खर्चासाठी इतकी मोठी रक्कम देणे योग्य नाही. ”
“माझ्या प्रिय मित्रा, तुला काही समजत नाही. काय झालं ते मी सांगतो;
“जेव्हा मी तुला बोट रंगवायला सांगितली, तेव्हा मी छिद्राचा उल्लेख करायला विसरलो.
“जेव्हा बोट वाळली, तेव्हा माझी मुले बोट घेऊन मासेमारीच्या सहलीवर समुद्रात गेली.
“त्यांना माहित नव्हते की तेथ एक छिद्र आहे. त्यावेळी मी सुद्धा घरी नव्हतो.
“जेव्हा मी परत आलो आणि लक्षात आल की त्यांनी बोट घेतली आहे, तेव्हा मी खुप हताश झालो कारण मला आठवल की बोटीमध्ये छेद आहे.
” मी त्यांना मासेमारी करून परत येताना पाहिले तेव्हा माझ्या मनाला खूप दिलासा मिळाला. तुम्ही त्या आनंदाची कल्पना करू शकत नाही.
“मग, मी बोट तपासली आणि लक्षात आले की ते तुम्ही छिद्र दुरुस्त केले होते !
“तुम्ही आता काय केलेत ?
माझ्या मुलांचा जीव वाचवलात !
तुमचे ‘लहान’ पुण्य अदा करायला माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. ”
आपल्या आयुष्यात कोण, कधी, किंवा कसे, कोणत्याही कामासाठी येईल तेव्हा नक्किच मदत करत रहा, त्यांच्या आयुष्यातील दुःख स्वरूपी छिद्र दुरुस्त करत रहा.
या कार्यात टिकून रहा, त्यांचे अश्रू पुसत रहा.
लक्ष देऊन ऐका आणि आपल्याला सापडलेल्या सर्व ‘छिद्र’ काळजीपूर्वक दुरुस्त करा. आपल्याला माहित नाही कधी कोणाला आपली गरज आहे, किंवा जेव्हा देव आपल्याला एखाद्यासाठी उपयोगी आणि महत्वाचे होण्यासाठी एक सुखद संधी देतो.
आयुष्याच्या वाटेत, तुम्ही किती जीव वाचवले आहेत हे न समजता अनेक लोकांसाठी अनेक ‘बोटीचे छिद्र’ दुरुस्त केले असतील.
बदल घडवा तुम्ही सर्वोत्तम व्हा..