“गुन्हयाबद्दल शिक्षा” प्रेरणादायी बोधकथा marathi moral stories
दोन व्यक्ती होत्या. त्यांची नावे होती अजय आणि विजय. दोघानाही एका गुन्हयाबद्धल शिक्षा झाली.
१० किलोचे वजन डोक्यावर घेऊन एक डोंगर चढून जायची शिक्षा होती. अजयने १० किलोच्या वजनाचा धोंडा डोक्यावर घेतला आणि तो डोंगर चढू लागला. चढता चढता थकून गेला बिच्चारा .
दुसरा विजय, तो विचारी होता. त्याच्या मनांत आले, १० किलो वजन न्यायचे आहे. काय न्यायचे हे कुठे सांगितले आहे ? त्याने चपाती, भाजी, ताट, दह्याचा लोटा आणि पाण्याचा तांब्या असे सारे १० किलो वजनाचे सामान बरोबर घेऊन तो डोंगर चढू लागला. विजय ही थकला. पण तेथे बसताच त्याने मजेत चपाती- भाजी वर ताव मारला. तांब्यातून पाणी प्यायला. तृप्तीचा ढेकर दिला.
शिक्षा तर अजय आणि विजय ह्या दोघांनी भोगली. पण अजयला शिक्षा क्लेशदायक ठरली. तर विजयला शिक्षा आनंदमय ठरली.
तात्पर्य : ” ओझे म्हणू काम केले तर ते शरीराला आणि मनालाही त्रासदायक होते. पण तेच ओझे विचारपूर्वक आणि उत्सा