मराठी 50 मार्मिक बोधकथा marathi moral stories
1.सेवा हाच धर्म
एकदा पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार
ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला.
तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरवले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.
यादरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्याकाळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्या मदतकार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. इतरही काही विषयांवर चर्चा करून नंतर तिघेही परत जाण्यासाठी निघाले.
निघतांना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले, “स्वामीजी, आम्हीच तुमच्याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्हीण मात्र सामान्य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.”
यावर स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले, ते असे की, “मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल
उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे
आहे. ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे. रिकाम्यापोटी
तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.”
2.अति लोभ नसावा
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांकडे भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी सांगितले की ‘तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. इंद्र प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल’. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.
इंद्र त्याला म्हणतो, की “तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईल. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल.”
तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.
त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो. तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.
तात्पर्य : कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.
3. गर्विष्ठ मेणबत्ती
एकदा एका गृहस्थाने आपल्या मित्रांना मेजवानीसाठी बोलवले होते. सगळेजण दिवाणखान्यात एका मोठ्या मेणबत्तीच्या प्रकाशात जेवत होते, ते पाहून मेणबत्तीला स्वतःचा अभिमान वाटला, आपल्या प्रकाशाचा केवढा उपयोग आहे असे वाटून ती गर्वाने म्हणाली, “ज्या वेळी व ज्या ठिकाणी सूर्यचंद्राचा प्रकाश पोहोचू शकत नाही. त्या वेळी व त्या स्थळी माझा प्रकाश पडू शकतो, चंद्रसूर्यही माझ्यापुढेही क्षुद्र वाटतात.” तिचे हे गर्वाचे बोलणे ऐकून जेवणारी मंडळी हसली. त्यातला एक जण उठला. त्याने खिडकी उघडली. त्याबरोबर हवेची झुळूक आली व मेणबत्ती विझली. नंतर त्याने पुन्हा खिडकी बंद केली व मेणबत्ती पेटविली. मग तो गृहस्थ मेणबत्तीला म्हणाला, “अगं वेडे आता तरी प्रकाश दे, एवढयाशा झुळकेने विझतेस, चंद्रसूर्याला क्षुद्र समजतेस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याची मिजास करतेस. चंद्रसूर्य कधी तुझ्यासारखे वाऱ्याच्या झळकेने विझून गेले आहेत ‘का?”
तात्पर्य : आपल्यावर सोपवलेली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडण्यातच मोठेपण आहे.
4.गोष्ट दोन मित्रांची… अपमान व उपकार
एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो,” आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले.” ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात.
पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, “आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले.” हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि, “पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?”
लिहिणारा मित्र म्हणाला, ” जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.
” तात्पर्य : “माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.
5. म्हातारी व वैद्य
एका म्हातारीच्या डोळ्यांत ‘फुले’ पडल्याने तिला बरेच कमी दिसू लागले. तिने आपले डोळे गावातल्या एका नामवंत वैद्याला दाखविले व त्याचे औषध सुरू केले. तो वैद्य दररोज तिच्या घरी येई, तिच्या दोन्ही डोळ्यांत औषध घाली आणि तिच्या डोळ्यांना पट्टी बांधी. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येई, आदल्या दिवशीची पट्टी सोडून व नव्याने औषध घालून तो तिच्या डोळ्यांना नवी पट्टी बांधी. तिचे डोळे सदैव बांधलेले असल्याने, तो तिच्याकडून जाताना तिच्या घरातल्या एक-दोन वस्तू चोरून नेई. दोन महिन्यांनी जेव्हा तिला चांगले दिसू लागले व तिच्या डोळ्यांवरील पट्टी कायमची काढण्यात आली. तेव्हा तिला आपल्या घरातल्या सर्व वस्तू वैद्याने लांबविल्या असल्याचे आढळून आले. तिने त्याबद्दल त्या वैद्याला एका शब्दानेही विचारले नाही. फक्त औषधोपचाराचे पैसे देण्याचे नाकारले. यावर त्या पैशांच्या वसुलीसाठी, वैद्याने त्या म्हातारीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला.
वैद्याला औषधाचे पैसे न देण्याचे कारण न्यायमूर्तीनी त्या म्हातारीला विचारता ती म्हणाली, “महाराज, या
वैद्याचे औषध सुरू करण्यापूर्वी माझ्या डोळ्यांना जरी बरेच कमी दिसत होते, तरी अंधुक अंधुक का होईना, घरातल्या सर्व वस्तू दिसत होत्या व चाचपडल्या असता हातांना लागत होत्या. परंतु डोळ्यांवरचे या वैद्याचे औषधोपचार पूर्ण झाल्यापासून मला घरातली एकही वस्तू दिसत नाही किंवा हातांना लागत नाही.” त्या म्हातारीच्या बोलण्यामागे दडलेला अर्थ न्यायमूर्तीना समजला. त्यांनी त्या वैद्याच्या घरावर शिपायांची धाड घालून, त्याच्या घरात दडवलेल्या म्हातारीच्या सर्व वस्तू तिला परत करण्याचा व त्यांच्या चोरीच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून त्याला औषधापोटी म्हातारीने एक पैसाही न देण्याचा हुकूम फर्मावला. वैद्याची चोरी उघडकीस आली, चोरलेल्या सर्व चीजवस्तूही गेल्या आणि त्याबरोबरच चोरी केल्यामुळे अब्रूही गेली.
तात्पर्य : अति लोभ संकटाना निमंत्रण देतो.
6.गर्विष्ठ मोर
एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. तो दररोज नदीकिनारी जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.
मोर म्हणायचा, “माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा !! माझ्याकडे पहा! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे.”
एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, “किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत.”
करकोचा म्हणाला, “मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो.” एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला.
तात्पर्य : दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.
7.पोपटपंची विद्या…
एका गावात चार ब्राह्मणपुत्र होते. त्यांची मोठी मैत्री होती. एकदा त्यांनी विचार केला. या गावात राहण्यात काही फायदा नाही. आपण दुसऱ्या देशाला जाऊन काहीतरी विदया मिळविली पाहिजे. काही पाठांतर केले पाहिजे. मग विदयेच्या बळावर आपल्याला मान सन्मान, पैसा मिळेल. असा विचार करून ते चौघे प्रवासाला निघाले. एका गावातील पाठशाळेत जाऊन त्यांनी विदयाभ्यास सुरू केला. अनेक मंत्र पाठ केले. अध्ययन संपल्यावर ते आपल्या गावाकडे निघाले. वाटेत त्यांना मेलेल्या प्राण्याचा सांगाडा दिसला. तो पाहताच पहिला पंडित म्हणाला, “मी माझ्या जवळच्या मंत्र सामर्थ्याने या सांगाड्यात रक्त आणि मांस भरतो.” असे बोलून त्याने त्या सांगाड्यात रक्त मांस भरले. मग दुसरा पंडित म्हणाला, “रक्त मांस भरलेल्या सांगाड्यावर कातडी चढविण्याची विदया मला येते.” असे सांगून त्याने त्या सांगाड्यावर कातडे चढविले. मग तिसरा पंडित म्हणाला, “मी अशा प्राण्यात इतर अवयव भरण्यास शिकलो आहे.” असे बोलून त्याने त्या सांगाड्यात इतर सर्व अवयव भरले. त्याच क्षणी भयंकर अशा सिंहाचे शरीर उभे राहिले. मग चौथा पंडित म्हणाला, “मला या निर्जीव प्राण्यात प्राण निर्माण करण्याची विदया येते.” असे सांगून त्याने प्राणमंत्र म्हणताच, सिंह जिवंत झाला. त्याने एकाच फटक्यात त्या चौघा मूर्ख पंडितांना ठार मारले.
तात्पर्य : नुसते पोपटपंची ज्ञान घातक ठरते.
8.कष्टाची कमाई श्रेष्ठ
एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक
हिस्सा स्वतःसाठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती
करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना
एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वतः बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला,
तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे का? चोर म्हणाले, ”
आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही
दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वतःकडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो.”
तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला, “आज तुम्ही
चोरी करू शकला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वतःसाठी
ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा.” दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून
म्हणाले, “महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा
ईश्वरचरणी ठेवू.” दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.
तात्पर्य : चुकीच्या मार्गाने केलेली कमाई असंतोष आणि दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक
सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.
9.कोल्ह्याची फजिती
एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्याबद्दल बोलत होते.
कोल्हा म्हणाला, “मला शिकारी कुत्र्यांचा खूप राग येतो.”
मलाही येतो.” मांजर म्हणाली. ”
दरीश दारुंटे
कोल्हा म्हणाला, “ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर
पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत.”
“तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?” मांजरीने विचारले.
“अनेक युक्त्या!” कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, “कधी मी काटेरी झुडपातून धावतो, कधीकधी
जंगलातल्या दाट झुडपात जाऊन बसतो, तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो, अशा अनेक युक्त्या
माझ्याकडे आहेत.”
मांजर म्हणाली, “मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे.”
“अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?” कोल्हाने विचारले.
बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत.” असे म्हणत
” मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.
मांजर मनात म्हणाली, “बिचारा कोल्हा! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती.”
तात्पर्य : कोणत्याही एकाच विषयात पारंगत व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते.
10.घोड्याला अद्दल घडली
एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते, घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते.
वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, “मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे, मला ते फारच जड होत आहे.” घोडा म्हणाला, “जड होवो की हलके, मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस.”
घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्यामुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले.
चालता चालता घोडा मनात म्हणाला, “मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल.
तात्पर्य : इतरांना नेहमीच मदत करा.
11.किंमत
पुर्वीच्या काळी एका राज्यात एक साधू महाराज राहत होते. त्यांचे स्वास वैशिष्टे म्हणजे कोणत्याही वस्तूती अचूक किंमत सांगत होते. त्या राज्यातील राजाला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने साधू महाराजांना दस्वारात बोलावले. साधू महाराज दरबारात पोहचल्यानंतर राजाने त्यांना म्हणाला की, तुम्ही आमच्या राजकुमाराची किंमत सांगू शकता का ?
राजाचा हा प्रश्न ऐकून साधू, महाराज गोंधळात पडले. परंतू राजाने प्रश्न केल्यामुळे त्यांनी राजाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे ठरवले. राजकुमाराचे निरीक्षण करत साधू महाराज म्हणाले, महाराज मी तुमच्या राजकुमाराची किंमत सांगण्यासाठी तयार आहे. परंतू माझी एक अट आहे. मी तुम्हाला राजकुमाराची किंमत सांगितल्यानंतर तुम्ही क्रोधित होणार नाही असे वचन था. राजाने साधू महाराजांची अट मान्य करत त्यांना क्रोध व्यक्त न कसण्याचे वचन दिले. नंतर साधू महाराज म्हणाले, महाराज तुमच्या राजकुमारावी किंमत दोन आण्यांपेक्षा अधिक नाही. साथू महाराजांचे हे उत्तर ऐकताच राजाला समजले की, जर सजकुमार सर्व साधारण मनुष्यासारखे काम करत असेल तर त्याला कोणीही दोन आण्यांपेक्षा जास्त पैसे देणार नाही.
तात्पर्य :- मनुष्याला आपली योग्यता ओळखता आली पाहिजे. त्यानंतस्व त्याला कुटुंबात, समाजात योग्य मान मिळेल
12.अर्थ
एक पंडित स्वतःला फार मोठा विद्वान समजत असे. त्याच्या मनात विचार आला कि राजाच्या समक्ष राजपुरोहीताशी शास्त्रार्थ केला पाहिजे. मला कोणी ठरवू शकत नाही याचा त्याला गर्व झाला होता. राजपुरोहिताला हरविले कि राजाला आपली विद्धता माहित होईल आणि त्याद्वारे राजा आपणास बक्षीस पण देईल असे त्याच्या मनात होते. त्यानुसार ठस्कूल तो राजदरबारात मेला, त्याने पुरोहिताला शास्त्रार्थ करण्यासाठी आव्हान दिले. राजपुसेहीताले पंडिताला प्रथम प्रश्न विचारण्यास सांगितले, पंडिताने प्रश्न केला, “पाच मी, पाच शी, पाच न मी आणि पाच न श्री याचा अर्थ सांगा?” राजपुरोठीताला प्रश्न समजला नाही. त्याने राज्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी ७ दिवसांची मुदत मामून घेतली. राजाने मुदत दिली मात्र सात दिवसानंतर मृत्युदंड कबुल असेल तरच. सात दिवसात पुरोहिताचे उत्तर शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण बुद्धीने, नशिबाने साथ दिली नाही. मोठमोठ्या विद्वानांना हि या प्रश्नाचे उत्तर विचारून पाहिले पण त्यानाही यातील कुट शोधता आले नाही. राजपुरोहिताले विचाराची दिशा सोडूज दिली, आता फक्त मृत्यूवा विचार तो करत होता. मृत्युत्या भीतीने त्याने नगर सोडून दिले, गावाबाहेर चालत राहिला, चालूज चालून थकला तैव्या एकत्र झोपडीपाशी जावून बसला योगायोगाने ती झोपडी त्या पंडिताची होती आणि तो आपल्या पत्नीशी बोलत होता. पंडित बायकोला प्रश्नाचे उत्तर सांगत होता, “माझ्या प्रश्नाचे उत्तर व देता आल्याने राजपुरोहित मरणार हे अरे: अनं ! पंथस तिथीमध्ये पाव तिथी अशा असतात कि त्यांच्या पुढे ‘भी प्रत्यय लागतो पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी तसेच पाच तिथी अशा असतात ज्यामध्ये जी’ प्रत्यय लागतो एकादजी, द्वादशी, अयोदजी, चतुर्दशी आणि पुर्णमाशी आणि पाच तिथीमध्ये मीही लागत नाही आणि शी हा प्रत्यय लागत नाही प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि घष्ठी. बय है उत्तर राजपुरोहीताला कधीच येणार नाही हे बाहेरून पुरोहिताने ऐकले आणि दुसऱ्या दिवशी ठस्बारात उत्तर दिले व स्वतवा जीव वाचविला. अहंकारी पंडिताला राजाने दंड केला.
तात्पर्य :- दुस-याला कधीही कमी लेखू नये कारण आपण या ना त्या प्रकारे त्या अवस्थेत जवू शकतो.
13.राजा आणि दगड
एकदा एक राजा जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता. जरा पुढे वाढलेच होते की मागून एक दगड त्याच्या डोक्यावर येऊन आपटला. राजाला सभ आला आणि लो क्रोधित होऊन आजू-बाजूला बघू लागला परंतू त्याला कोणीच दिसेना. तेवढ्यात झाडामाधून एक म्हातारी समोर आली आणि म्हणाली, हा दगड मी फेकला होता. राजाने म्हातारीला त्या मागील कारण विचारलं. तेव्हा ती म्हणाली ‘क्षमा असावी महाराज, मी तर या आंब्याच्या झाडावरून काही आंबे तोडू पाहत होते परंतू म्हातारपणी या झाडावर वहणे तर शक्य नाही म्हणून दमड मारुन फळं तोडत होते पण त्यातून एक दगड चुकीने आपल्याला लागला. निश्चितत कोणीही साधारण व्यक्तीने अश्या चुकीवर अधिक क्रोधित होऊन चुक करणार्याला शिक्षा दिली असते. परंतू राजा तर महानतेतवे प्रतीक होते, त्यांनी असे मुळीच केले नाही. त्यांनी विचार केला की’ एक साधारण झाडं एवलं सहनशील आणि दयाळू असू शकतं की दगडाचा मार खाऊन देखील मारणार्याला गोड फळ देतं तर मी तर एक राजा आहे आणि राजा सहनशील आणि दयाळू का नसू शकतो? आणि असा विचार करत महाराजांनी त्या म्हातारीला काही स्वर्ण मुठा भेट म्हणून दिल्या,
तात्पर्य :- सहनशीलता आणि दया कमजोर नव्हे तर वीरांचे गुण आहेत. आज लोकं लहान-सहान गोष्टीवर क्रोधित होऊन एकमेकांचे प्राण घेऊ बयता, मारहाण कस्तात अज्ञात राजाचा हा प्रसंग निधित आम्हाला सहिष्णु आणि दयाळू असावं याची जाणीव कस्वून देतो.
14.सोन्याची कुदळ
एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,’ आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी मी तुम्हाला काही सामू छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी माझ्यासमोरव पैशाची विभागणी करू चिकतो, माझ्याकडे एक कसमती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुठळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही सांगा की कोण काय येणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुवळीला कोणी चोस्ले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्धारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताव मोठ्या गुलाने पैसा पाण्यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. कडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का सांगितले मग त्याच्या आत्म्याने म्हटले.” नाही, वडील खोटे बोलू, शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.” असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. तात्पर्य – संपन्नतेची सारी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख्ख अवश्य येते.
15.निर्मळता
एकदा गुरु शिष्य भ्रमंतीला नियाले होते. फिरता फिस्ता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक डारा वाहत होता. मुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य अन्या पाशी गेला आणि त्याला असे दिसते कि तेथून नुकतेच बैल भाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे धाण झालेले पाणी गुरुसाठी लेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरुकडे गेला आणि म्हणाला, “गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे. आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल.” मुरुजी म्हणाले,” अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या अन्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर.” शिष्य गेला. त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, मुरुळी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहन्यावर जाराजीचे आणि कंटाळलेले भाग दिसू लागले पण शिष्य गुरुझा मोडायला तयार नव्हता. मुरुजी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आधर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भस्ले आणि गुरुसाती येवून आला. गुरुजी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले, ‘वत्सा आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल चिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पाण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या अन्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, वांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये.”
तात्पर्य :- भावनेच्या भरात निर्णय न घेता शांत विचाराने निर्णय घ्यावे.
16.गाढव आणि लांडगा
एकदा एक माळव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काळता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडमा येताना त्याला दिसला. माळव अम्रपणे त्याला म्हणाले, वैद्यबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून या. लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट माहवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मास्ती आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बयत ते मजेनेनिघून गेले.
तात्पर्य- काठी माणसे तकी कृतघ्ज असतत, की ज्याने आपल्याला संकटातून वाचविले त्याच्याशीसुद्धा ते शिष्टपणे वागतात.
17.संगत
एक गोसावी रानातून आपल्या मुळेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वत कण्डताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, “महाराज मला वेठवेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेती संधी था. गोसावी म्हणाला, “अरे मी काठी उपकार केले नाहीत, माड्या धर्मव आहे तो. तरीही अस्वल आपला दह सोडेजा. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर मुहेत घेऊज मेला. गोसावी विश्रांतीसाती झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माझा बसत होत्या, मोसात्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माजांना मारू लागले, डाकलू लागले. पण एक धटींगण माझी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माझीला एवढ्या जोराने मास्ला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रुप झाला!
तात्पर्य :- शहाण्याचे सेवक व्हावे, पाण मूर्खाचे मालक दोऊ जये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.
18.मदत
वीस्मडचा राजा सूर्यप्रताप दयाळू आणि परोपकारी होता. त्याच्या राज्यातील एका भावात एकेवर्षी पाऊस पडला
नाही. दुष्काळाची स्थिती निर्माण झाली. त्या गावात रामचरण नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. दुष्काळामुळे त्याच्या घशत खाण्यासाठी काठीही शिल्लक नव्हते, राजाने मदत पाठविली पण भावातील मुखियाने आपल्याव लौकाना त्या मदतीचा लाभ दिला. जैच्छा रामवरण मदत मागण्यासाठी बेला तेंव्हा मुखिया त्याला रागावला, आणि त्याला ठाकलून दिले. रामवरणची पत्नी आणि मुलाने मुकेने तडफडून जीव टाकला. तेव्हा समचरणने वैसम्य स्वीकास्ते आणि एका साधूच्या उलासोबत तो निघून गेला. साधू दिवसभर मिक्षा मागत असत आणि रात्री मादक पदार्थ स्वादूलपिवून चोन्या करीत असत. चुकीच्या संमतीमुळे रामचरणही नकली ज्योतिषी वनून पैसा जमा करीत असे. त्याने दिवसभर फिरून लोकांविषयी माहिती गोळा करत असे व त्या माहितीचा वापर करत रात्री ज्योतिषाचा वेष धारण करून लोकाला मूर्ख बनवीत असे. जेव्हा तो ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध झाला तेंव्हा राजा सूर्यप्रताप त्याला भेटण्यासाठी आला. परंतु त्याने येण्याआधी त्याची सत्यता पडताळून पाहिली, रामवरणचे खरे रूप राजाला समजले, सैनिकांनी समचरणला पकडून राजापुढे उभे केले, राजाने त्याला या त्याच्या खोट्या वागण्याचे कारण विचारले, तेंव्हा रामवरण म्हणाला, “मठाराज। गावाच्या मुखीयाने तुमच्या पाठविलेल्या मठतीतून जर फक्त दोन भाकरी आणि पाणी जर मला दिले असते तर माझी चायको आणि मुलगा मरण्यापासून वाचले असते. तुमची मदत मिळाली नाही आणि ते दोये मुवेले तडफडून मेले, ते दोघे जगले असते तर मी असा खोटारडेपणाने कधीच वागलो असतो. लोकांचे ज्योतिष मी काय बघणार! मला माझे कुटुंब सांभाळता आले जाठी, माझी व्यथा समजून घ्या महाराज तुम्ही मदत पाठविली पण आमच्यापर्यंत ती आलीच नाही. आता तुम्ही यात ती शिक्षा मला मान्य आहे.” त्याचे हे खरे बोलणे पाहता राजाने त्याचे
गुन्हे लक्षात घेता त्याला सौम्य शिक्षा दिली व त्यानंतर त्याला त्या गावाचा मुखिया बनविले व जुन्या मुखीयाला कडक
शिक्षा केली.
तात्पर्य :- संकटग्रस्त व्यक्तीला योग्यवेळी पोहोचलेली मदत योग्य ते कार्य साध्य करते, अन्यथा संकटात सापडलेल्या जीवांचा जीव जाण्याची शक्यता असते. जर कुणी संकटात असेल तर आपण त्याला मदत केली
19.कष्टाचे फळ
एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण, त्याची पाव मुले ही खूप आळशी होती कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या मुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार जाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल, म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि गी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण, शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्दा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्द्धा निघाले त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप थन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीमत त्या गुलांजी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन
तात्पर्य :- खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यन्न नक्कीच मिळते.
20.अतृप्त मन
हिवाळ्याचे दिवस होते. एक माढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेव दिवस बरे होते. हवाही उबदार होती व मवतही ताजे मिळत होते. मालवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे भवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जामेवरच ताजे भवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला. लवकरच पावसाळा तोंडावर आला. मुभाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिले
शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला, तेव्हा त्या माढवाला वाटले, हिवाळाच बस होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलात ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.
तात्पर्य:- कुठलेही कसलेही दिवस आले तरी. अतूम मनाच्या मानसाचे समाधान कधीच होत नाही.
21.आयुष्यभरावी प्रतिष्ठा
महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारुणान्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात? कृष्णाने उत्तर दिले… ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून
आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनमसत्या सत्यमार्गावर पाणी फिरले. रुक्मिणीने विवास्ते.. कोणते पाप?
कृष्ण म्हणाला, जेव्हा भर दरबारात दौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही वस्वासत उपस्थित होते. दस्वारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच भुन्हा त्यांच्या समल्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. रुक्मिणीने विवास्तै…. मन कर्णाचे काय.”
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मामितले तर त्याच्या तोडून कचीठी ‘नाही’ असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला. व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते. पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाचे मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.
तात्पर्य तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य
होवून जाते.!! चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.
22.प्रेरणा
संत सबिया रोज पक्ष्यांना धान्याने दाणे टाकीत असत. हा त्यांना रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियाजी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य वेत्रले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते हे त्या तरुणांना कळते नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विवास्ले असता ती म्हणाली, “मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासास्येचे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवापती आभारावे आहेत.” हे ऐकूल ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात गम्ज होत्या. गम काही वेळाने त्या स्टू लागल्या. तरुणांजा कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुज्छा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या.” आधी मी हसले होते धस्तीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या च्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बताचा वापर जर सृजनासाठी केला तर जभाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले.” तरुणांना आपली चूक लक्षात आली. सबियाले त्यांना प्रेरित केले. त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, मुकेलेल्याना अन्ज आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले.
तात्पर्य :- प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.
23.करढोक व मासे
कस्बोक नावाचा एक पक्षी नदीकाठी सहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ वालवण्याचा त्याने विचार केला. ‘तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा कस्लोक त्याला म्हणाला, ‘अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.’ हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भस्वून तो कस्लोकाचा निरोप त्याने सांगितला.
तो ऐकताच आपल्यावर येणाऱ्या संकटाची सूचना देणाऱ्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या कस्ढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणाऱ्या माझावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने कस्टोकास जाऊन आपला ठसव त्याला कळविला. तो ऐकताच कस्लोक त्याला म्हणाला, ‘या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठमामावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजाख्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माझांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडते व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.
तात्पर्य – शत्रुत्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.
24.करढोक व मासे
कस्ढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी होंम करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, ‘तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातास कस्ढोक त्याला म्हणाला, ‘अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबहल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे. याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा. हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि समळ्या माशांती सभा भस्वून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला
तो ऐकताच आपल्यावर येणाऱ्या संकटाची सूचना देणाऱ्या त्या कस्बोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या कस्ढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणाऱ्या माझावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठसव त्याला कळविला. तो ऐकताव कस्ढोक त्याला म्हणाला, ‘या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पौठचवीन, ती गोष्ट माशांनी कबूल केली. मन कस्लोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडते व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.
तात्पर्य – शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.
25.आयुष्यभरावी प्रतिष्ठा
महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म यांना ठार मारुणान्याच्या बाजुने तुम्ही कसे काय उभे राहिलात? कृष्णाने उत्तर दिले… ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून
आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनमसत्या सत्यमार्गावर पाणी फिरले. रुक्मिणीने विवास्ते.. कोणते पाप?
कृष्ण म्हणाला, जेव्हा भर दरबारात दौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही वस्वासत उपस्थित होते. दस्वारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यांचा हा एकच भुन्हा त्यांच्या समल्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. रुक्मिणीने विवास्तै…. मन कर्णाचे काय.”
कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मामितले तर त्याच्या तोडून कचीठी ‘नाही’ असा शब्द बाहेर पडला नाही.
पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला. व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले. तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते. पण अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाचे मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही नंतर त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.
तात्पर्य तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य
होवून जाते.!! चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही
26.ईश्वर
एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक माव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की स्क्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो, पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकोतर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाळतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो.
तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो, देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, ” मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकोमर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस.” पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या.
तात्पर्यः- तुमच्या आयुष्यात अज्ञा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.
27.आत्मनियंत्रणाचे महत्व
एक जिज्ञासूबुतीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. जाव बनवणा-यांकडून जाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्या तका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकासबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अभी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते मिक्षापात्र येऊन त्यात्याकडे गेले. मुलाने विचारले. तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले, “भी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.” मुलानेले यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले, “जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो जाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो झाजी आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो,” मुलाने विचारते, ते कसे काय बुद्ध म्हणाले, ” जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य : ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूत परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
28.सुंदर काय ?
एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, “अहाहा, ही माझी शिंगे किती छानदार आहेत! ही किती शोभिवंत दिसतात! अशी चांगली शिंगे देवाने कोणालाही दिली नाहीत! पण हे पाय बरीक फारच वाईट आहेतः किती रोडके आणि घाणेरडे आहेत! अरेरे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर किती बरे झाले असते!” सांबर असा विचार करीत आहे तोच काही शिकारी तेथे आले! पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले व पास्थी मागे पाठलाग करू लागले. पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली. सांबराने बरीच खटपट केली तरी शिंगे काही निरोजातः अस्वेर शिकारी लोकांनी येऊन सांबराता ठार मारले मस्ताने ते बोलते, ‘अरेरे, उगीच मी या पायाला नावे ठेवली तेच बिचारे मला पछताना उपयोगी पडले! पण या शिंगांनी बरीक माझा जीव घेतला!”
तात्पर्य:- जे वरून चांगले दिसते तेच चांगले नसते, जे उपयोगी पडते तेच खरोखर चांगले.
29.अंतरंगाची परीक्षा
एका उंदिरावे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिलातून बाहेर पडले होते. ते कडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, “आई, ज्या या लहानशा जागेत लहानाचे मोठे केले, ती जागा सोडून आज भी अमल बाहेर जाऊन आलो. तेथे भी जी फौज पाहिली, ती काठी विलक्षणव. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले, त्यापैकी एक प्राणी फार मडबड्या स्वरुपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबड्या रंगाचा तुरा आहे. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली माज हालवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात आहे. तवयात त्याने आपले दोन्ही हातही हालविले आणि असा काही कर्कश्न शब्ठ केला, की त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या आणि दुसऱ्या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याव्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून त्याचे एकंदर वर्तन असे होते, की मला त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे वाटल्याशिवाय राहिले नाही’ हे भाषण ऐकूल उदरी त्यास म्हणाली, “वेड्या पोस! तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिला आहे तो लबाड व क्रूर मांजर आहे. उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव.
तात्पर्य:-बाहा देखावा आणि सौंदर्य यावरुन माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.
30.धैर्याचे महत्व
धैर्यधर नावाचे एक व्यापारी होते. व्यापार उत्तम चालत होता. आमदानी उत्तम होती. अर्थातच धैर्यधसंजी पामाणिकपणे ही संपती कमावली होती. लोक त्यांना गमतीनं म्हागायचे, तुमचं नाव थैर्यथर आहे, पण तुम्ही आहात लक्ष्मीधर.” “होय, मी लक्ष्मीधर आहे; पण मूळचा मी धैर्यथस्य खरा. धैर्यधर म्हणाले. बरीच वर्षे व्यापार केला. संसार सुख्खावा झाला. आता जरा स्वास्थ्य आलं. धैर्यधरांनी विचार केला. आता जरा हिंडावं. फिरावं, देश बधावा. तीर्थयात्रा करावी, जीवनाचा आनंद लुटावा, मग आपले सेवक आणि आपला एक पुतण्या यांच्यावर कारभार सोपवून धैर्यधर तीर्थयात्रेला गेले. काशी-रामेश्वर, हिमालयात गेले. दोन महिने ते बाहेर होते. आता परत आलो की, पेठीवर बसायचं या उद्देशाने ते पस्तीच्या वाटेला लागले. पण परत येऊन बसतात तो काय? पुतण्या आणि सेवक घरात हताशपणे बसले होते. “काय झालं धैर्यधरांनी विचारलं आपलं दुकान, पेली सर्व आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. काही सहिलं नाही. आम्हीच कसेतरी वाचलो. आग कशी लागली समजलं नाही.” पुतण्या म्हणाला, पैर्यधरांनाही क्षणभर अस्वस्थ वाटलं. पण ते म्हणाले, “ठीक आहे. आता पुढे काय करायतं ते ठरवू” बट्याच लोकांना वाटलं, ‘आता काय होणार? सभळी रा४ख झाली. आता चैर्यधर पुन्हा व्यवसाय सुरू करणार नाहीत. दुसर्याच दिवशी त्या जळालेल्या दुकानावर लोकांना एक फलक दिसला. “दुकान जळलं. पेली जळली, सार काही जळल; पण धैर्य नाही जळलं! उद्यापासून दुकान पुन्दा सुरू करीत आहोत’ लोकांना पटतं की, धैर्यधर है नुसतेच लक्ष्मीधर नसून खरेच धैर्यधर आहेत.
तात्पर्य :- संकटाना धैर्याने तोंड दिलं तर मार्ग सापडतो.
31.माणुसकी
साप हा एक गुलाम होता, पण आपल्या विद्वतेच्या जोरावर त्याने समाजात अत्युत्व स्थान निर्माण केले होते, ज्या धनाढ्याने सापला विकत घेतले होते त्याचे नाव होते झेनथस, साप आपल्या आवरणातून डौनथसला सतत शिकवण देत असे. ज्या काळी रोममध्ये सार्वजनिक स्नानगृहे असत, सज्जन लोक सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करत असत. एकदा क्रोनथसने सापला स्नानगृहात गर्दी आहे की रिकामे आहे हे पाहून येण्यास सांगितले. सापने जाऊन पाहिले तर तेथे बरेच लोक आंघोळीसाठी जमा झाले होते. तेवळयात त्याचे लक्ष स्नानगृहाच्या दारासमोर पडलेल्या एका मोठ्या दगडाकडे गेले. अनेक लोक त्या दगडाला अडखळून पडत होते, दमड स्स्त्यात कसा म्हणून शिव्या देत होते. तेवढ्यात एक माणूस आला तोही त्या दगडाला अडखळून पडला, त्यानेही शिवी हासडली पण तो दमड त्याने उचलून दूर फेकला आणि मगच तो स्नानगृहात गेला. हे सर्व पाहून साप घरी गेला व मालकाला सांगितले की, स्नानगृहात फक्त एकच माणूस आंघोळीसाठी आला आहे. आआंघोळीच्या पूर्ण तयारीनिशी क्झेनथस स्नानगृहात पोहोचला आणि पाहतो तर काय, तेथे तर प्रचंड गर्दी आहे. डोनथसने सापला विचारले तू तर म्हणाला ये फक्त एक माणूस आहे पण थे तर प्रचंड गर्दी दिसते. साप उत्तस्ला,” थे रस्त्यात एक दगड पडला होता, येथे येणारा प्रत्येकजण दमडाला अडखळून पडत होता, शिव्या देत होता पण दमड उचलून टाकण्याचे शहाणपण फक्त एकानेच दाखविले. त्यामुळे फक्त एकच माणूस असल्याचे भी आपणास सांगितले.” कोनथस निरुत्तर झाला.
तात्पर्य:- फक्त जीवत असणे ही ओळख नसून जीवनाचा सदुपयोगच तुम्हाला स्वतंत्र ओळख देऊ शकते. आपल्या जीवनाचा तरांनाही उपयोग व्हावा हेच खरे.
32.विश्वासघात
एका जंगलात हरिणीचे एक पाडस चरत होते. त्याला पाहून एका वाघाच्या तोंडाला पाणी सुटले. तो पाडसाला पकडणार एवढ्यात चपळाईने ते दाट वेर्लीच्या जाळीत घुसले आणि पळून गेले. त्याच्यापाठोपाठ वाघही त्यात घुसला. वाघ मात्र त्यातच अडकून पडला. त्याला एक वाटसरू येताना दिसला. वाघाने त्याला आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केली. पण वाटसरू घाबरून तसे करण्यास कचरू लागला. वाघाने त्याला आश्वासन दिले की तो वाटसरूला खाणार नाही. वाटसरूने बाधाला सोडवले. जाळीतून बाहेर पडल्यावर भूक लागल्याचे निमित्त करून वाघ वाटसरूला खायची गोष्ट करू लागला. वाटसरू म्हणाला, मी तुझ्यावर उपकार केले आणि तू त्याची अशी परफेड करणार आहेस ? वाघ ऐकायला तयार नव्हता. हा सगळा प्रकार एक कोल्हा पाहत होता. तो पुढे आला आणि वाटसरूला म्हणाला, हा वाम किती मोठा आहे. तो जाळीत अडकेलच कसा? तो कसा अडकला हे दाखव बघू, वाघही घमेंडीत जाळीत घुसला आणि पुन्हा अडकला. कोल्हा वाटसरूला म्हणाला आता तरी येथून पळ काढ. नाहीतर तो पुन्हा तुला फसवेल. तात्पर्य : विश्वासघातकी लोकांवर कधीही विश्वास ठेवणे योग्य नाही.
33.एकाग्रता
एका आश्रमात एक ऋषी त्यांच्या शिष्यांसह राहत होते. शिष्यांना ते धनुर्विद्या शिकवत होते. एकदा त्यांनी शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि त्यांना घेऊन नदीच्या पुलावर आले. नदीतून एक घागर हेलकावत जात असलेली त्यांना दिसली. त्यांनी शिष्यांना त्या घागरीवर नेम धरून बाण मारायला सांगितले. पण ती घागर पाण्यावर इतकी हेलकावे खात होती की कुणाचाही नेम तिच्यावर बसेना. ऋषींनी बराच वेळ हा सगळा प्रकार पाहिला. ते पुढे आले. एका शिष्याच्या हातून धनुष्य बाण घेतला. काही क्षण निश्चल उभे राहिले आणि अचूक नेम साधत घागरीवर बाण सोडला. बाण घागरीवर बसून ती फुटली. ऋषींनी शिष्यांकडे पाहिले. शिष्यांनी माना खाली घातल्या. ऋषी म्हणाले, तुमच्यापैकी अचूक लक्ष्य सगळ्यांना गाठता आले असते. पण तुम्ही तुमच्या कार्यावर मन एकाग्र करू शकला नाहीत. एकाग्रता नसेल तर तुमच्याकडे कितीही कौशल्य असले तरी त्याचा उपयोग होणार नाही. तात्पर्य : मनाच्या एकाग्रतेमुळे कठिणातील कठीण
कामही साध्य करता येते.
34.समाधान
एका लहान माशाच्या मागे एक भला मोठा मासा लागला होता. ते दोघे वेगाने पाणी कापत चालले होते. शेवटी मोठ्या माशाने त्या लहान माशाला जवळजवळ गाठलेच. लहान माशाला खूप वाईट वाटले. आपण इतका प्रयत्न करूनही आता मृत्यूच्या दाढेत सापडणारच. काय करावे त्याला सुचेना. शेवटी अखेरची धडपड म्हणून त्याने एक मोठी झेप घेतली, ती तो किनाऱ्यावरील वाळूत जाऊन पडला. त्याचा पाठलाग करण्याच्या भरात मोठा मासाही त्याच्या मागोमाग गेला आणि ते दोघेही पाण्याविना तेथे तडफडू लागले. आपला शत्रूही आपल्यासारखाच शेजारी तडफडतो आहे, हे पाहून लहान मासा स्वतःशीच म्हणाला, ‘मला आता मरण आले तरी हरकत नाही. कारण माझ्या मृत्यूला कारणीभूत असणारा शत्रूही मरणाच्या पंथाला लागला आहे.’
तात्पर्य : शेवटच्या क्षणापर्यंत लढा देणे कधीही शौर्याचेच.
35.दुष्टपणा
एका कोल्हीची आणि गरुडीणीची मैत्री जमली. मैत्री आणखी घट्ट होण्याकरीता दोघींनी एका जागीच राहण्याचे ठरविले. गरुडीणीने एका उंच झाडावर घर केले आणि त्यात अंडी घातली. कोल्हीणीनेही त्याच झाडाच्या बुंध्यापाशी आपल्या पिलांना जन्म दिला. एकदा कोल्हीण बाहेर गेली असता गरुडीणीने कोल्हीचीच पिल्ले मटकावली. कोल्हीने परत येऊन तो सर्व प्रकार पाहिला. पण ती काही करू शकत नव्हती. थोड्याच दिवसात काही माणसे एका मैदानात एका बोकडाला बळी देत होते. गरुडीणीने तेथल्या वेदीवर एक झेप घेतली आणि मांसाचा जळता तुकडा घेऊन ती आपल्या घरट्यात गेली. त्याच वेळी जोराचा वारा सुटून त्या सुक्या काटक्यांचे घरटे पेटले. त्यामुळे उडता न येणारी तिची पिल्ले भाजून खाली पडली. टपून बसलेली कोल्ही पुढे आली आणि तिने गरुडीणीच्या डोळ्यासमोर तिच्या पिल्लांची मेजवानी झोडली.
तात्पर्य जो मित्रद्रोह करतो, त्याला मित्रद्रोहाची शिक्षा मिळतेच.
36.गाढवाचे शहाणपण
एकदा एक गाढव फिरत फिरत चुकून जंगलात गेले. आधी ते घाबरले. मग धीर धरून जंगलातून बाहेर पडण्याची वाट शोधू लागले. चालता चालता त्याच्या पायात काटा बोचला. तो त्याला काढता येईना. मग ते तसेच लंगडत लंगडत चालत राहिले. तेवढ्यात समोरून एक लांडगा आला. गाढवाला पाहून लांडगा खुश झाला. आयतीच शिकार तावडीत येणार असे त्याला वाटले. मोठ्या मानभावीपणे तो पुढे झाला आणि गाढवाला म्हणाला, काय भाऊ, लंगडताय? काय झालं? गाढव विव्हळत म्हणाले, होय, पायात काटा बोचलाय, तो काढता येत नाहीये. लांडगा साळसूदपणाचा आव आणत म्हणाला, मग मी देऊ का काढून? गाढवाने लांडग्याचा कावा ओळखला. पण वरकरणी तसे न दाखवता म्हणाले, उपकार होतील. लांडगा पुढे झाला. त्याने गाढवाचा पाय धरला, त्यातला काटा काढला आणि त्याचा चावा घेणार इतक्यात सावध असलेल्या गाढवाने त्याच्या तोंडावर सणसणीत लाथ मारली आणि धूम ठोकली. लांडगा तिथेच विव्हळत पडला.
तात्पर्य : अडचणीत असताना ती दूर होईपर्यंत संयम राखणे आणि संधी मिळाल्यावर आक्रमण करणे हिताचे असते.
37.लोभाचे बळी
रामपूरमध्ये राहणाऱ्या रामूकडे एक कार्यक्रम होता. स्वयंपाक करण्यासाठी त्याने गावातील सगळ्यांकडून मिळतील ती भांडी उसनी आणली होती. कार्यक्रम झाल्यावर त्याने सगळ्यांना त्यांची भांडी परत केली आणि प्रत्येकाला त्या भांड्यांबरोबर एक छोटे भांडे दिले. गावकऱ्यांनी त्याचे कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की तुमच्या भांड्यांनी काल रात्री या छोट्या भांड्याला जन्म दिला. ते ऐकून गावकरी हसले. पण त्यांना नवे भांडे मिळाल्याने कुणी काही बोलले नाही. काही दिवसांनी रामूने आणखी एकदा गावजेवण घातले. तेव्हाही त्याने गावकऱ्यांकडून भांडी आणली. गावकऱ्यांनीही आनंदाने दिली. कारण त्यांना माहित होते आपल्याला नवी भांडी मिळणार आहेत. पण कार्यक्रम झाल्यावर रामूने भांडी काही परत केली नाहीत. गावकरी त्याला विचारायला गेले तर तो म्हणाला, काल तुमची सगळी भांडी मरण पावली आणि ईश्वराकडे गेली.
सगळेजण डोक्याला हात लावून बसले. तात्पर्य : लोभाला बळी पडून चुकीच्या गोष्टीला
प्रोत्साहन दिले तर पश्चात्तापाची वेळ येते.
38.गुन्हयाची कबुली
एका गावात धोंडीराम नावाचा शेतकरी राहात होता. त्याला काही कारणाने शहरात जायचे होते. म्हणून त्याने आपली मौल्यवान संपत्ती गावातील चतुरसिंग नावाच्या सावकाराकडे ठेवली. महिना लोटला असेल. शहरातील काम आटोपून तो गावी आला आणि चतुरसिंग सावकाराकडे आला. चतुरसिंगने धोंडीरामला मौल्यवान संपत्ती परत करणे तर सोडाच पण चक्क त्याला ओळखतच नसल्याचे सांगितले. हा खटला न्यायालयात चालला. काही केल्या चतुरसिंग काही वठेना. मग न्यायाधीशांनी धोंडीराम शेतकऱ्याला विचारले, तुझ्याकडे काही पुराना आहे काय की जेणेकरून ते तू सादर करशील. धोंडीराम म्हणाला, होय साहेब. एक झाड आहे. त्या झाडाखाली मी संपत्ती या सावकाराला दिली. मग न्यायाधीश म्हणाले, जा तू आता ते झाड घेऊन ये. विचार करतच धोंडीराम न्यायालयातून बाहेर पडला. तास झाला. दोन तास झाले. तरी तो आलाच नाही. यावर चतुरसिंग म्हणाला, साहेब, मला आता भूक लागलीय. मला जाऊ द्या. न्यायाधीश म्हणाले, धोंडीराम येऊ देत मग जा. यावर सावकार म्हणाला, कसा येणार तो लवकर ? खरे तर ते झाड इथून तीन तासाच्या अंतरावर आहे… असे म्हणत तो थांबला. त्याने गुन्हा कबूल केला आणि धोंडीरामला त्याची संपत्ती परत मिळाली. तात्पर्य : सत्य कितीही लपवले तर ते केव्हाही बाहेर येतेच.
39.आरोग्यम् धनसंपदा…!
सतत पैशाची हाव असणारे रतनलाल शेठजी एकदा म्हणाले. माझ्यापेक्षा हा मगनलाल किती श्रीमंत आहे. किती पैसा आहे त्याच्याकडे? मी दिवसभर देव देव करतो. पण सगळी संपत्ती मात्र त्या मगनलालकडे एकवटलेली आहे. हा संवाद त्याचे म्हातारे वडीला ऐकत असतात. यावर ते रतनलाल शेठजीना म्हणतात, परवा मी देवळात गेलो होतो, तेव्हा मगनलाल भेटला होता, तो म्हणत होता, देवा मला स्वास्थ्य दे. शांती दे…. दुसरा एक श्रीमंत माणूस तेथे आला. त्याला डोळे नव्हते. तो आंधळा होता. तो त्याचे डोळे परत येण्यासाठी लाखो रुपये मोजायला तयार आहे, पण त्याला त्याची दृष्टीपरत मिळत नाही. जर तू तुझे दोन्ही डोळे त्याला दिलेस तर तुलादेखील लाखो रुपये मिळतील. यावर रतनलालशेठ म्हणाला, मी काय वेडा आहे की काय ? डोळे द्यायला. मग त्याच्या वडिलांनी डोळे, कान, हात, पाय प्रत्येक अवयवाबद्दल विचारले. पण रतनलाल काहीच मी देणारनाही, असे म्हणत राहिला. मग त्याचे म्हातारे वडील म्हणाले, बघ. नाही नाही म्हणत तुझ्या प्रत्येक अवयवाची किती किंमत झाली. लाखमोलाचे हे तुझे शरीर आहे. आता संपत्ती म्हणशील तर ती तुला पुरेशी अशी आहेच. पण अजून हाव कशासाठी करतोस? ज्यांच्याकडे पैसा आहे. पण असे तुझ्यासारखे निरोगी शरीर नाही. तर त्यांना तो पैसा कितपत उपयोगी पडत असेल? विचार कर. शरीरच मोठी धनसंपत्ती आहे. तात्पर्य : शरीरसंपदा लाखमोलाची असते.
40.ससा आणि चिमणी
एकदा एक गरूड एका सशाच्या मागावर टपून बसला होता. सशाला त्याची कल्पना आली. म्हणून घाबरून तो विळाबाहेर येईनासा झाला. बिळाच्या तोंडाशी जे काही गवत उगवले होते, तेच खाऊन तो कशीबशी गुजराण करत होता. त्याच्या बिळाशेजारी एक झाड होते. झाडावर एक चिमणी सशाची ही सगळी त्रेधातिरपीट पाहत होती. एकदा सशाने बिळाबाहेर तोंड काढलेले पाहताच ती त्याला म्हणाली, तू तर फारच घाबरट आहेस. तू इतका जोरात पळू शकतोस, मग तुला गरूडाची भीती बाळगण्याचे कारणच काय ? जरा प्रयत्न केलास तर गरूडाच्या तावडीतून सहज सुटू शकशील. ती हे बोलत असतानाच एका ससाण्याने तिच्यावर झडप घातली. तेव्हा ती केविलवाणे ओरडू लागली. ते पाहून ससा तिला म्हणाला, मला मारे धीटपणाचा आव आणून हिणवत होतीस, आता तू आपला जीव कसा वाचवतेस ते पाहू!
तात्पर्य : दुसऱ्याला शहाणपण शिकवणारे लोक स्वतः संकटात पडले की शहाणपण विसरतात.
41.राजा आणि गुराखी
एकदा राजा सूर्यसिंग आपल्या प्रधानासह वेषांतर करून गावोगाव फिरत होता. फिरता फिरता ते गावाबाहेर वडाच्या झाडाखाली आले. तेथे एक गुराखी धनुष्यबाण घेऊन नेमबाजीचा सराव करीत होता. राजाने पाहिले की, झाडाच्या बुंध्यावर खडूने अनेक वर्तुळे काढली होती आणि त्या वर्तुळांच्या बरोबर मध्यावर बाण रुतून बसले होते. राजा सूर्यसिगला त्या गुराख्याचे कौतुक वाटले. असा उत्तम नेमबाज आपल्या सैन्यात हवाच म्हणून राजाने त्याची पाठ थोपटीत म्हटले, बाळ, इतक्या लहान वयात तू फारच कौशल्य मिळविले आहेस. अरे या वर्तुळांच्या बरोबर मध्ये तू कसे बाण मारतोस? गुराखी म्हणाला, त्यात काय विशेष? अहो, अगदी सोपं आहे. मी आधी बाण मारतो आणि मग त्या बाणाभोवती वर्तुळ काढतो. या मुलाच्या चाणाक्षपणाला हसावे की आपल्या चुकीच्या निष्कर्षाबद्दल रडावे, हेच राजाला कळेना. त्याला वाटले की आपण आताच या गुराख्याची आपल्या सैन्यात निवड करून चूक करत होतो. याच्या वरवरच्या कला गुणांना फसून आपण
आपले आणि प्रजेचे नुकसान करत होतो. तात्पर्य : कोणाचेही कौतुक करण्यापूर्वी चिकित्सक वृत्ती असावी.
42.लांडग्याचे नशीब
एकदा एक गाडीवान आपल्या गाडीतून मासे घेऊन चालला होता. जंगलातून भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या कोल्ह्याने ते पाहिले. मासे पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. मासे मिळवायचे कसे याचा विचार तो करू लागला. त्याला एक युक्ती सुचली. गाडीवान आपल्याच नादात गाडी चालवत पुढे निघाला होता. वाटेत त्याला हा कोल्हा मरून पडलेला दिसला. त्याने विचार केला, या कोल्ह्याचे कातडे विकून चार पैसे तरी मिळतील, त्याने कोल्ह्याच्या शेपटीला धरले आणि त्याला मागे टाकले. कोल्ह्याने गाडीवानाचे लक्ष नाही असे पाहून मनसोक्त मासे खाल्ले आणि गाडीतून उडी मारून निघून गेला. त्याला गाडीतून उडी मारताना एका लांडग्याने पाहिले. लांडग्याने त्याला विचारले की तु गाडीत काय करत होतास. कोल्ह्याने काय ते सांगितले. मग लांडगाही मेल्याचे सोंग घेऊन गाडीपुढे पडला. गाडीवानाला खूप आनंद झाला. त्याला वाटले, चला लांडग्याचेही कातडे विकून आपल्याला आणखी पैसे मिळतील. तो लांडग्याला उचलायला गेला तर तो खूप जड वाटला. गाडीवानाला लांडगा उचलता येईना. म्हणून मग त्याने एक पोते आणले, त्यात लांडग्याला घातले आणि ते पोते आपल्या गाडीला घट्ट बांधले आणि गाडीबरोबर फरफटत नेले. तात्पर्य : एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरलेली गोष्ट दुसऱ्यासाठीही तशीच ठरेल, असे नाही.
43.कटू सत्य
एका जमीनदाराला तीन मुली होत्या. सुस्वरूप, गृहकर्तव्यदक्ष अशा त्या मुलींमध्ये एकच व्यंग होते. तिघीही बोबड्या होत्या. यांचे विवाह कसे होणार, या एका चिंतेने जमीनदाराला अस्वस्थ केले होते. एकदा त्या तिघींना पाहायला तीन मुले येणार होती. म्हणून जमीनदाराने त्या तिघींना ताकीद दिलेली होती की, पाहुण्यांसमोर कुणीही बोलायचे नाही. ठरल्याप्रमाणे पाहुणे आले. चहा फराळाचे पदार्थ दिले गेले. त्यांचा आस्वाद घेत वधूपरीक्षा सुरू झाली. काहीतरी बोलायचे म्हणून मुलांबरोबर आलेले वयस्कर गृहस्थ म्हणाले, वा! फारच छान फराळ झालाय. कुणी केलेत ? यावर मोठ्या मुलीने लाजत लाजत बोबड्या भाषेत सांगितले की हे फराळ आईन केलेत म्हणून. इतक्यात दुसरी मुलगीही तिला बोबड्या भाषेत ओरडली. तिसरी मुलगी तर बोबडेच बोलली. हा सारा प्रकार पाहताचा पाहुणे उठून गेले. जाताना म्हणाले, तुमच्या मुली खूपच सुंदर आहेत. पण त्यांच्यातील व्यंग तुम्ही लपवून ठेवले. पण सत्य कधीतरी बाहेर येतेच आणि ते कटू असते. तात्पर्य सत्य लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अशीच फजिती होते.
44.ई-मेल
राजेश हुशार होता, पण गरीब होता. स्वतःच्या हुशारीवर तो शिकला होता. एके ठिकाणी त्याला नोकरीसाठी बोलावण्यात आले. त्याची निवड झाली. तेथील अधिकाऱ्यांनी त्याला सांगितले, तुमचा ईमेल आयडी देऊन जा. आम्ही तुम्हाला तुमच्या नेमणुकीची तारीख त्यावर कळवू. राजेशकडे ईमेल आयडी नव्हता. त्याला ही नोकरी नाकारण्यात आली. त्याच्या खिशात फक्त दहा रुपये होते. त्याने दहा रुपयांचे बटाटे विकत घेतले आणि तेथेच ते बटाटे विकायला बसला. ते विकल्यावर त्याच्याजवळ वीस रुपये आले. मग तो भाजी घरोघरी जाऊन विकू लागला. हळूहळू त्याने दुकान थाटले, मग एक ट्रक खरेदी करून गावोगाव भाजी पोचवू लागला. असे होता होता तो श्रीमंत झाला. एके दिवशी त्याच्याकडे एक पॉलिसी एजंट आला. त्याच्याकडे विमा उतरवत असताना एजंटने राजेशला ईमेल आयडी विचारला. राजेश म्हणाला, माझा ईमेल आयडी नाही. एजंट म्हणाला, ईमेल आयडीशिवाय तुम्ही इतके श्रीमंत झालात, तो असतात तर आणखी किती श्रीमंत झाला असतात. राजेश म्हणाला, तो असता तर एका कंपनीत मी कारकून म्हणून राहिलो असतो. तात्पर्य : व्यक्तीकडे आत्मविश्वास असेल तर त्याचे
कोणत्याही कमतरतेमुळे अडत नाही.
45.कल्पवृक्ष
एकदा रामराव परगावी निघाले होते. वाटेत विश्रांतीसाठी एका झाडाखाली थांबले. त्यांना खूप तहान लागली होती. झाडाखाली लवंडताना त्यांच्या मनात आले, इथे कुठे थंड पाणी मिळाले तर किती बरे होईल. हा विचार त्यांच्या मनात येतो न येतो तोच त्यांच्यासमोर थंड पाण्याचा झरा अवतीर्ण झाला. त्यांनी यथेच्छ पाणी प्याले. मग मनात आले गरमागरम जेवण मिळाले तर कित्ती बरे होईल. रामरावांच्या समोर लगेच गरमागरम जेवणाचे ताट हजर झाले. आता रामराव गडबडले. त्यांना कळेना, की काय होतेय? झाडावर भूत बित तर बसलेले नाही ना, अशी शंका त्यांना आली. हे त्यांच्या मनात येते न येते तोच मूत त्यांच्यासमोर हजर झाले. ते पाहिल्यावर रामरावांची भीतीने बोबडीच वळली. त्यांच्या मनात आले, या भुताने आपल्याला खाल्ले तर? आणि त्या भुताने लगेच त्यांना खाऊन टाकले. आता असे खरेच घडले असेल का? कल्पवृक्ष अस्तित्वात असल्याचा पुरावा नाही. त्यामुळे असे खरेच काही घडले असल्याची शक्यताही नाही. पण आपले मन कल्पवृक्षासारखे असते हे मात्र खरे. आपल्या मनात जसे विचार असतात तशी कृती आपल्या हातून घडते. चांगले विचार आले तर चांगली कृती घडते आणि वाईट विचार आले तर वाईट कृती घडते. तात्पर्य : मनात कायम चांगले विचार आणणे गरजेचे असते.
46.जशी दृष्टी तशी सृष्टी
भगवान श्रीकृष्णाने एकदा एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले. त्यांनी युधिष्ठिाराला बोलावून सांगितले, ‘या यज्ञात आपल्याला एका माणसाचा बळी द्यावयाचा आहे. त्यासाठी एखादा दुष्ट-दुर्जन माणूस शोधून काढ. आपण त्याचा बळी देऊ.’ त्यानंतर त्यांनी दुर्योधनाला बोलावले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, ‘मी एक यज्ञ करू घातला आहे. या यज्ञात आपल्याला एका सज्जनाचा यथोचित सत्कार करायचा आहे. तेव्हा एखादा पवित्र सज्जन माणूस शोधून आण. आपण त्याचा सत्कार करू.’ युधिष्ठीर एका दुष्ट माणसाच्या शोधात निघाला आणि दुर्योधन एका सज्जन माणसाच्या शोधात निघाला. युधिष्ठीराला एकही दुष्ट माणूस सापडला नाही. त्याला प्रत्येक मनुष्य चांगलाच वाटत होता. तो श्रीकृष्णाकडे परत आला आणि म्हणाला, ‘भगवान! आपल्या राज्यात कुणीही दुष्ट नाही आणि आपल्याला यज्ञात बळी देण्यासाठी माणूस हवा आहे तर तुम्ही मलाच बळी द्या. तुमचा यज्ञ तरी पार पडेल. थोड्या वेळाने दुर्योधन आला आणि श्रीकृष्णाला म्हणाला, ‘देवा! मी खूप शोध घेतला पण आपल्या राज्यात मी सोडता एकही सज्जन माणूस आढळला नाही. तेव्हा देवा, एक सज्जन व्यक्ती म्हणून माझाच सत्कार करावा. तात्पर्य : जशी आपली दृष्टी असते तसेच जग आपल्याला
दिसते.
47.परीस
मनूने परीस शोधायचे ठरवले होते, पण हा परीस शोधायचा कसा हे त्याला माहित नव्हते. त्याने ठरवले हातात एक लोखंडाची साखळी घ्यायची आणि प्रत्येक दगड त्या साखळीला लावून पहायचा. ज्या दगडाने ती सोन्याची होईल तो परीस. त्याला परीस शोधणे खूपच सोपे वाटले. रस्त्यात येईल तो दगड घेऊन हातातील साखळीला तो लावायचा आणि फेकून द्यायचा. त्याचा हाच दिनक्रम सुरू झाला. दिवस गेले… महिने गेले… वर्षे लोटली. होता होता मनू म्हातारा झाला. एके दिवशी असाच तो दगड हातात घेऊन साखळीला लावत असताना एक तरुण तेथे आला. त्याने विचारले, काय आजोबा, काय करताय? मनू म्हणाला, परीस शोधतोय. तरुणाने विचारले. परीस कसा ओळखणार? मनू म्हणाला, ज्या दगडाने ही साखळी सोन्याची होईल तो दगड म्हणजे परीस. तो तरुण म्हणाला, आजोबा, तुमचे लक्ष कुठे आहे. तुमच्या हातातील साखळी तर सोन्याचीच आहे! तेव्हा मनूचे लक्ष त्या साखळीकडे गेले. दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले
नव्हते. आणि त्याने परीस गमावला होता. तात्पर्य : प्रत्येकाच्या जीवनात असा परीस कधी ना कधी येत असतो. पण त्याची ओळख फार थोड्या लोकांना होते.
48.सत्याचा शोध
एका गावात एका झाडाखाली एक भिकारी भीक मागत बसत होता. तो त्या ठराविक जागीच बसून वर्षानुवर्षे भीक मागत होता. पैसे साठवून खूप श्रीमंत व्हायची त्याची इच्छा होती. असे करत करत त्याने कित्येक वर्षे भीक मागितली. अखेर तो मरण पावला. पण श्रीमंत झाला नाही. तो जगला भिकारी म्हणून आणि मेलाही भिकारी म्हणूनच. मेल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी त्याच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. अखेर तेथील दुकानदारांनी त्याचे क्रियाकर्म केले. पुढे तो जिथे ज्या झाडाखाली बसून भीक मागत होता. त्याच्या बाजूला त्याची झोपडी होती ती तेथील नगरपालिकेने पाडली. ती जागा स्वच्छ करून तेथे वृक्षारोपण करण्यासाठी खड्डा खोदला गेला. खड्डा खोदताना तिथे गुप्तधनाची पेटी सापडली. साऱ्यांनाच नवल वाटले. जिथे गुप्तधनाची पेटी सापडली त्याच्याशेजारच्या झाडाखाली बसून तो भिकारी भीक मागत होता. गुप्तधनाच्या पेटीच्या जागेवरच त्याने आपली झोपडी बांधली होती. आणि त्या झोपडीत तो वर्षानुवर्षे श्रीमंत व्हायची स्वप्ने बघत होता. पण त्याला काही श्रीमंत होता आले नाही. तात्पर्य जे आपल्याजवळ असते, त्याचा शोध मात्र
आपण बाहेर घेत असतो.
49.प्रेरणा
संत राबिया रोज कबुतरांना धान्याचे दाणे टाकत असत. एके दिवशी सकाळी त्या कबुतरांना दाणे टाकत असताना पाचसहा तरुण बाजूला उभे असलेले त्यांना दिसले. त्यांच्याकडे पाहून त्या जोरात हसू लागल्या. त्या तरुणांनी त्यांना हसण्याचे कारण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, या धरतीवर तुमच्यासारखे सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. देवाचे आभार मानण्यासाठी मी हसले. ते तरुण स्वतःवर खूश झाले. ते तेथेच टिवल्याबावल्या करत उभे राहिले. थोड्या वेळाने राबिया रडू लागल्या. त्या तरुणांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, या धरतीवर किती बलशाली तरुण आहेत म्हणून मला आनंद झाला होता. पण हे तरुण आपल्या बलाचा इच्छेचा वापर जगाच्या कल्याणासाठी करत नाहीत हे पाहून मला आता रडू येत आहे. हे ऐकल्यावर त्या तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबिया यांनी त्यांना जनसेवेसाठी प्रेरित केले होते. तात्पर्य : प्रत्येकाने थोडे सत्कार्य केले तर हे जग सुंदर होण्यास वेळ लागणार नाही.
50.वीरमरण
थोर क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांना काकोरी प्रकरणात न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या दोन दिवस आधी त्यांची आई त्यांना भेटायला कारागृहात आली. बिस्मिल यांना आईसमोर आणण्यात आले. आईला पाहून बिस्मिल यांचे मन भरून आले. डोळ्यांत पाणी आले. लहानपणापासूनच्या आईच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. आईचे प्रेम आणि वात्सल्य आठवून त्यांना रडू आवरेना. बिस्मिल यांना रडताना पाहून त्यांची आई मनातल्या मनात काय समजायचे ते समजली. पण या परिस्थितीत आपला मुलगा कमजोर बनलेला तिला पहायचे नव्हते. स्वतःच्या भावनांना आवर घालत ती म्हणाली, मला तर वाटत होते की तू स्वतःच्या भावनांवर विजय मिळवला आहेस. पण इथे तर वेगळेच चित्र दिसते आहे. आयुष्यभर देशाशी लढून तू आता आईसाठी अश्रू ढाळणार आहेस का? हा कमकुवतपणा योग्य नाही. तू. वीराप्रमाणे फासावर चढलास तर मी स्वतःला धन्य समजेन. आईचे बोलणे ऐकून बिस्मिल यांनी आपल्या भावनांना आवर घातला आणि म्हणाले, आई, मला माझ्या मृत्यूबद्दल जराही दुःख नाही. विश्वास ठेव. फाशीवर चढताना बिस्मिल यांचे शब्द होते,
मालिक तेरी रजा रहे और तू हि तू रहे, बाकी में रहन रह मेरी आरजू रहे, जब तक की तन में जान, रगो लहू रहे तेराही जिक्र या तेरी जुस्तज् तात्पर्य : बलिदान महान आदर्श आहे. बलिदान करणारे इतिहासात अजरामर होतात.