मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांचे मानधन जमा होणार; प्रशासनाकडून ३१ मार्चचा मुहूर्त maratha sarvekshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षणाचे काम करणाऱ्यांचे मानधन जमा होणार; प्रशासनाकडून ३१ मार्चचा मुहूर्त maratha sarvekshan 

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती तपासण्यासाठी २४ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. परंतु, सर्वेक्षण करणारे प्रगणक व पर्यवेक्षकांना मानधन देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत होता.

प्रशासनाकडून मानधन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या ३१ मार्चपर्यंत प्रगणकांचे मानधन बँक खात्यावर टाकण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले. गोखले इन्स्टिट्यूट या संस्थेकडून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील

नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण सिद्ध करण्यासाठी युजर फ्रेंडली मोबाइल अॅप्लिकेशन प्रणालीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्ह्यात ३ हजार 40 प्रगणक, १९४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले.

प्रस्तावाला वरिष्ठस्तरावरून मिळाली मान्यता

फेब्रुवारी रोजी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक आणि सुपरवायझर यांना प्रति दिवस भत्ता आणि मानधन देण्याचे सांगण्यात आले होते. यासाठी सरकारकडून विशेष तरतूद करण्यात आली. मात्र, सर्वेक्षण पूर्ण होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप मानधनाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले नव्हते. स्थानिक प्रशासनाने सर्वेक्षणात काम केलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून, येत्या ३१ मार्चपर्यंत मानधन आणि भत्त्याचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

३१ मार्चपर्यंत पैसे मिळतील

मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत बँक खात्यात पैसे जमा होतील. -सोहम वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना.

Maratha sarvekshan
Maratha sarvekshan

 

Leave a Comment