सप्टेबर २०२४ चे नियमित वेतन,महागाई भत्ता,थकबाकी फरक व सातवा वेतन पाचवा हप्ता अदा करणेबाबत mahe September payments grant
उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे.
अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यत्तिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही.
आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांने लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा, तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा.
इ) वेतन अनुदानाची थकबाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९ (ब) टिप ४ अनुक्रमाक ५नियम ३९(ब) टिप-५ तसेच अनुक्रमांक ६ नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे.
हे ही वाचा
👉थकीत वेतन बिले ऑनलाईन काढणे बाबत
👉विद्यार्थी सुरक्षा काटेकोर अंमलबजावणी करणे बाबत
👉बीएलओ या कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करणे बाबत
👉तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन वेळापत्रक
👉तक्रारपेटी सखी सावित्री समिती सीसीटीव्ही बसविल्याशिवाय वेतन आदान न करणे बाबत
👉अदानी समूहाकडे शाळा हस्तांतरित शासन निर्णय
वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.
टिप : वितरीत केलेले अनुदानामधून प्रथम केवळ सप्टेबर २०२४ चे नियमित वेतन, निवृत्तीवेतन, तसेच शिल्लक राहत असल्यास त्यामधून महागाई भत्ता थकबाकी फरक व सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता अदा करण्यात यावा, अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये.
माहे सप्टेंबर 2024 वेतन तसेच थकबाकी फरक सातवा वेतन आयोग हप्ता अनुदानाबाबत शासन निर्णय