02 ऑक्टोबर 2024 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जबरदस्त मराठी भाषण mahatma gandhi jayanti marathi bhashan
Mahatma Gandhi Jayanti 2024: देशात दरवर्षी 2ऑक्टोबर ही गांधी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे महात्मा गांधी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबत असत. त्यांनी कोणतेही शस्त्र न उचलता इंग्रजांना नमवले. या शुभ मुहूर्तावर देशातील विविध शैक्षणिक संस्था, सोसायटीमध्ये वादविवाद, भाषण आणि निबंध लेखन अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. या खास दिवशी विद्यार्थ्यांनी पुढे देण्यात आल्याप्रमाणे भाषण केले तर सर्वजण कौतुक करतील आणि टाळ्या वाजतच राहतील.
आदरणीय प्राचार्य, माझे शिक्षक, माझ्या प्रिय मित्रांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण गांधी जयंती निमित्त एकत्र आलो आहोत आणि या पवित्र प्रसंगी मी एक छोटेसे भाषण आपल्या सर्वांसमोर करीत आहे. आशा आहे की आपण सर्व या शांतचित्ताने संपूर्ण भाषण ऐकाल ही नम्र विनंती.
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते आणि नंतर त्यांना बापू म्हणून संबोधण्यात आले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबून इंग्रजांना अनेक वेळा गुडघे टेकण्यास भाग पाडले. यामुळेच संपूर्ण जग त्यांना आदराने स्मरण करते. महात्मा गांधींच्या विचारांपासून तरुणच नव्हे तर नेतेही प्रेरणा घेत असतात.
महात्मा गांधींच्या विचार आणि कृतीमुळे त्यांच्या जन्मदिनाला राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळाला आहे. त्यांनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले पण लंडनमधून बॅरिस्टरची पदवी मिळवल्यानंतरही त्यांनी खादी परिधान करून देशाचा दौरा केला आणि स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले. आज गांधींसारख्या नेत्यांची देशाला गरज आहे. त्यांच्या मार्गाचा अवलंब करून आपण आपले जीवन चांगले बनवू शकतो. मला आशा आहे की तुम्हाला माझे भाषण आवडेल. या शब्दांनी मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय भारत
धन्यवाद !