महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन २०२४-२५ महत्त्वाचा शासन निर्णय mahatma fule health scheme
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील २२१० जी २५१ (सर्वसाधारण) या लेखाशिर्षाखाली रु. ६५.०० कोटी इतका निधी
वितरीत करणेबाबत – शुध्दीपत्र
वाचा :-१) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मफुयो-२०२३/प्र.क्र.१६०/आरोग्य-६, दिनांक २८ जुलै, २०२३
२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक अर्थसं २०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि. ०१.०४.२०२४ व क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि. २५.०७. २०२४
३) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. मफुयो-२०२४/प्र.क्र.१२९/आरोग्य-६, दिनांक २९ ऑगस्ट, २०२४
४) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. लेखाप्र-२०२४/प्र.क्र.२१७/IB/आरोग्य-६, दि. २०
फेब्रुवारी, २०२५
प्रस्तावना :-
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भाधीन १ येथील दि. २८.७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजना विस्तारित स्वरूपात राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. सदर योजना विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत होती. योजनेअंतर्गत राज्य संन्नियंत्रण समितीच्या दि.२६.०८.२०२४ च्या बैठकीत निर्णय झाल्यानुसार व शासनमान्यतेनुसार आता सदर योजना दि. ०१.०७.२०२४ पासून राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत हमी तत्वावर राबविण्यात येत आहे, म्हणजेच उपचाराचा जो खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत थेट अंगीकृत रूग्णालयांना प्रदान करण्यात येतो. त्याच प्रमाणे सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संन्नियत्रणासाठी संदर्भाधीन शासन निर्णय वित्त विभाग दि. १४.२.२०२४ नुसार राज्य आरोग्य हमी सोसायटीस आभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account) ही व्यवस्था व कार्यपद्धती लागू केली असल्याने या अनुषंगानेही संदर्भ क्र. ३ शासन निर्णय क्र. मफुयो-२०२४/प्र.क्र.१२९/आरोग्य-६, दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ मध्ये बदल करणे आवश्यक आहे.
शासन शुध्दीपत्रः-
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संदर्भ क्र. ३ च्या शासन निर्णयामधील खालील मजकूर-
“महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी आरोग्य सोसायटीमार्फत होत असल्यामुळे संदर्भ क्र. २ येथील दिनांक २८.०७.२०२३ च्या शासन निर्णयान्वये
योजनेंतर्गत प्रति लाभार्थी कुटुंब रु.५००/- प्रमाणे हमी तत्वावरील दाव्यांच्या अदयागीसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीतून खाली दर्शविलेल्या लेखाशिर्षातंर्गत रु.६५,००,००,०००/- (रुपये पासष्ट कोटी मात्र) एवढा सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी नियंत्रक अधिकाऱ्याकडे सुपुर्द करण्यात येत आहे.”
या ऐवजी
“महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी राज्य आरोग्य हमी आरोग्य सोसायटीमार्फत होत असल्यामुळे योजनेंतर्गत हमी तत्वावरील दावे अदा करण्यासाठी, म्हणजेच उपचाराचा जो खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई यांच्या मार्फत थेट अंगीकृत रुग्णालयांना अदा करण्यासाठी रु.६५,००,००,०००/- (रुपये पासष्ट कोटी मात्र एवढा सशर्त निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या ८४४३- नागरी ठेवी, १०६ वैयक्तिक लेखा, (००) (०२) आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते यामध्ये, आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांच्या नावे सुपुर्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे” असा वाचावा.
२. सदर निधी, संदर्भातील अ.क्र.३ येथील सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक २९.०८.२०२४ मधील परिच्छेद १ नमूद लेखाशिर्षांतर्गत खर्ची टाकण्यात यावा.
३. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्र. मुंविनि-२०२२/प्र.क्र.२७/२०२२/विनियम, दिनांक १२.०१.२०२३ मधील खालील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून निधी वितरीत करण्यात येत आहे.
१) सदरचा निधी हा विस्तारीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या आरोग्य संरक्षणापोटी रुग्णालयांच्या दाव्यांची अदायगी करण्यासाठी करण्यात यावा.
२) सदरचा निधी योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांचे दावे अदा केल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र विहीत नमुन्यात आहरण व संवितरण अधिकारी तसेच सहसंचालक (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई यांना सादर करावे,
४. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी, मुंबई या कार्यालयास निधीचा विनियोग करण्यासाठी “आभासी वैयक्तिक ठेव लेखा (Virtual Personal Deposit Account)” ही व्यवस्था संदर्भ क्र. ०४ येथील दिनांक २०.०२.२०२५ च्या शासन निर्णयान्वये लागू केलेली आहे. आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक यांनी वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५, दिनांक १४.०२.२०२४ व विभागाच्या संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २०.०२.२०२५ मधील तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. सदर अनुदानाचे देयक अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी तसेच सहसंचालक (अर्थ व प्रशासन), आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई हे नियंत्रक अधिकारी असतील.
५. वित्त विभागाने परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१ एप्रिल, २०२४ सोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनु. क्र. ८ मधील मुद्दा क्र. १ ते १० मधील अटी व शर्तीची पूर्तता केली असल्याचे राज्य आरोग्य हमी सोसायटीने शासनास कळविले असून यापूर्वी शासनाकडून वितरीत केलेल्या निधीचा विनियोग ज्या कारणासाठी निधी मंजूर केला होता त्याच प्रयोजनासाठी केल्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे. शासनाच्या धोरणानुसार सदर प्रस्तावावरील निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अंतर्गत नव्याने उघडण्यात आलेल्या आभासी वैयक्तिक ठेव लेखा खाते (Virtual Personal Deposit Account) मध्ये जमा करुन खर्च करण्यात येत असल्याचे त्याचप्रमाणे वित्त विभागाच्या दिनांक
०१.०४.२०२४ व दिनांक १४.०२.२०२४ च्या शासन निर्णयातील संबंधित असलेल्या सर्व तरतूदींचे / अटी व शर्तीचे पालन झाल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.
६. सदर शुध्दीपत्र वित्त विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५, दिनांक १४.०२.२०२४ व सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र. लेखाप्र-२०२४/प्र.क्र.२१७/LB/आरोग्य-६, दिनांक २० फेब्रुवारी, २०२५ मधील तरतुदींना अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
19. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेताक २०२५०३१२१७३७५२४०१७ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,