महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 प्रसिद्धीपत्रक MAHATET ऑनलाईन अर्ज लिंक mahatet online application weblink 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 प्रसिद्धीपत्रक MAHATET ऑनलाईन अर्ज लिंक mahatet online application weblink 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – 4

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2024

प्रसिद्धीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे ४ या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ (MAHATET २०२४) घेण्याची जबाबदारी सोपविलेली असून ही परीक्षा दिनांक-१०/११/२०२४ रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे.

इ. १ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईट वर देण्यात आला आहे.

सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक – ०९/०९/२०२४ पासून सुरु होत असुन दिनांक ३०/०९/२०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी. ही विनंती.

👉MAHATET प्रसिद्धीपत्रक येथे पहा CLICK HERE 

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे पहा खालील वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता👉👉https://mahatet.in