महागाई भत्त्याच्या दरात दि.१ जानेवारी २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत mahagai bhatta
सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन संरचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्त्याच्या दरात दि. १ जानेवारी २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबत
संदर्भ :-१. शासन पत्र क्र. संकीर्ण-२४१९/(४२/१९)/ अर्थसंकल्प दि.१२ जुलै, २०२४ २.मा.आयुक्त, शिक्षण यांचे कं. अंदाज-१८४/मभ/२४/४३४७ दि.१५.७.२०२४
उपरोक्त संदर्भ क्रमांक १ व २ चे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. (प्रत संलग्न) उपरोक्त विषयी संदर्भिय शासन पत्रान्वये व मा. आयुक्त, शिक्षण कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे.