लोकसमा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ टपाली मतपत्रिका जतन करण्याबाबत loksabha election tapali matapatrica
संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे पत्र क. ४६४/MH-HP/२०२४/WS-II, दिनांक २२ एप्रिल २०२४.
महोदय,
भारत निवडणूक आयोगाचे दिनांक २२ एप्रिल २०२४ चे पत्र सोबत जोडले आहे. भारत निवडणूक आयोगाने टपाली मतदान प्रक्रियेबाबत त्यांच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रान्वये सविस्तर सुचना दिल्या आहेत. त्यानुसार टपाली मतदान संपन्न झाल्यानंतर दररोज टपाली मतपत्रिका लिफाफा/ कापडी पिशवीत विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळ्या करून संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे हस्तांतरीत कराव्यात असे आयोगाचे निर्देश आहेत.
२. तथापि, विधानसभा मतदारसंघातील काही गावे मुख्यालयापासून दूर तसेच डोंगराळ भागात असुन त्यांचे संबंधित लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मुख्यालयापासुनचे अंतर फार दुरचे आहे. त्यामुळे टपाली मतदान झालेल्या टपाली मतपत्रीका व इतर गोपनिय कागदपत्रे त्याच दिवशी मुख्यालयाच्या ठिकाणी पोहच करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. करीता, सदरच्या टपाली मतपत्रीका व संबंधित कागदपत्रे संबंधित विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी असलेल्या कोषागार कार्यालयातील सुरक्षा कक्षात ठेवण्याची परवानगी मिळण्याची विनंती काही जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी यांचेकडून प्राप्त झाली होती. तद्नुषंगाने, भारत निवडणूक आयोगास मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली होती.
3. भारत निवडणूक आयोगाने संदर्भीय पत्रान्वये खालील अटी व शर्तीच्या अधिन प्रस्तावित विनंतीस सहमती दर्शविली आहे.
1. The safe and secure storage of the Postal Ballots as per the Commission’s guidelines in the strong room.
2. Political Parties and contesting candidates shall be informed about the process.
3. The packets of polled postal ballots are to be sealed in the presence of contesting candidates/agents of the concerned political parties in the large envelop/cotton bag meant for that assembly constituency.
4. Videography should be done during the process of packing of the packets containing polled postal ballots.
5. The DEOs concerned should ensure that proper security arrangements and CCTV surveillance is provided at the Strong Room as per the guidelines of the Commission regarding storage of Postal Ballots.
५. लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय स्थापन केलेल्या सुविधा केंद्रातील टपाली मतदान व वरिष्ठ नागरी व दिव्यांग यांचे घरी जावून प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रीका सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे अभिरक्षेत संबंधित विधानसमा क्षेत्राच्या मुख्यालयी असलेल्या कोषागार कार्यालयातील सुरक्षा कक्षात ठेवण्यास भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त अटी व शर्तीच्या अधिन राहून सहमती दर्शविली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, ही विनंती.