लोकसभा निवडणूक-२०२४ च्या निवडणूक आचार संहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करणेबाबत loksabha election
संदर्भ:- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे क्र.437/MH-HP/2024 (eVigil)/ WS-II, Dt. 01 May, 2024 चे पत्र.
महोदय/महोदया,
लोकसभा निवडणूक-२०२४ च्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करण्यास अनुमती देण्याची विनंती भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांना करण्यात आली होती. त्यास अनुसरुन भारत निवडणूक आयोगाने संदर्भाधीन दि.०१.०५.२०२४ च्या पत्रान्वये निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करण्यास निवडणूक आयोगाची काही अटींसह हरकत नसल्याचे कळविले आहे. सदर पत्राची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी यासोबत पाठविण्यात येत आहे.