मुलांनी स्वतःची शिकण्याची गती वाढवणे learning outcomes
आदरणीय शिक्षक मित्रांनो आपण एकविसाव्या शतकात आहोत. आपली मुले एकविसाव्या शतकासाठी तयार करायची आहेत, एकविसाव्या शतकात माहिती आणि तंत्रज्ञानाचे उपयोजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकविसाव्या शतकात अधिक सक्षमपणे वावरायचे असेल तर, अधिकाधिक शिकावे लागणार त्याकरिता अध्ययन कौशल्य (Learning to Leum) हे कौशल्य मुलांना येणे अनिवार्य आहे. Learning to Leam हे मुलांना यायचे असेल तर अध्ययन कौशल्य (Learning Skills) विकसित होणे आवश्यक आहे. अध्ययन कौशल्य (Learning Skills) विकसित होण्यासाठी अधिकाधिक संधी मुलांना दयाव्या लागणार आहेत. भविष्यवेधी शिक्षण विचाराच्या प्रथमं पाच बाबी केल्या की मोठ्या प्रमाणात अध्ययन कौशल्य (Learning Skills) विकसित होण्याच्या संधी प्राप्त होतात.
वरील पाच बाबी कार्यान्वित केल्या की, त्याचा परिणाम आपल्याला सहाव्या बाबीमध्ये दिसतो. ती सहावी बाब म्हणजे मुलांच्या शिकण्याची गती वाढते. एकविसाव्या शतकात फक्त शिकता येणे एवढेच येऊन जमणार नाही, तर गतीने शिकता येणे हे महत्त्वाचे असणार आहे. मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती तिप्पट करणे आवश्यक आहे. मुलांना खूप साऱ्या बाबी सतत आणि गतीने शिकत राहावे लागणार आहे. सध्या शिकलेली एखादी बाब किती लवकर कालबाह्य (outdated) होईल ते सांगता येत नाही. अशा वेळी सतत गतीने शिकणे ही अत्यावश्यक गरज राहणार आहे. ही गरज पूर्ण करून घेण्याची इच्छा आणि पूर्तता होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मुलांना वरील पाच बाबी केल्या की येणार आहे.
मित्रांनो आपण मुलांच्या शिकण्याच्या बाबतीत कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचे आहे याचा विचार
होणे आवश्यक आहे.
१) शिक्षक शिकवितो पण मुले शिकत नाहीत.
२) मूल: मी शिकू शकतो
३) मूल: मी स्वतः शिकू शकतो.
४) मूल: मी गतीने शिकू शकतो.
५) मूल: मी तिप्पट गतीने शिकू शकतो.
६) मूल: मी कायम यापेक्षाही जास्त गतीने शिकत राहील…
आपल्या शिक्षण व्यवस्थेतील मूल सध्या पहिल्या बाबीवर जास्त आढळत आहेत. १०० टक्के मुले क्रमाक्रमाने सहाव्या बाबीवर जायला हवीत यासाठी काम होणे आवश्यक आहे.
शिकण्याची गती तिप्पट करणे म्हणजे काय? जशी आहे तशीच ठेवायला काय अडचण आहे? शिकण्याची गती वाढवायची आहे, स्मरणात ठेवण्याची नाही. मग शिकण्याची गती म्हणजे नेमके काय? प्रत्येक बाब शिकण्यासाठी संहिता बनवावी लागते. ती संहिता बनविणे आणि अमलात आणून शिकणे, ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. त्यासाठी नापण शिकतो म्हणजे काय हे समजून घेऊ.
एखादी नवीन बाब जेव्हा शिकायची असते तेव्हा ती बाब कशी शिकायची असा प्रश्न निर्माण होतो, या प्रश्नांची तरे शोधण्यासाठी पहिला पर्याय समोर येतो. शिक्षकांकडून शिकणे, यामध्ये स्वतः संहिता ठरविणे फार प्रकर्षाने
जाणवत नाही. शिक्षक सांगतील तसे ऐकू आणि विचार करू एवढाच भाग समोर येतो. त्यामध्ये स्वतःहून काही
strategy तयार केलेली नसते. याचा परिणाम असा होतो की, इतर कोणी शिकविणार नाही तोपर्यंत भी स्वतः काही पुढाकार घेणार नाही. याचा अर्थ काय शिकायचे आणि कसे शिकायचे हे पण इतर कुणी ठरविणार त्यामुळे त ठरवतील ते आणि तसे मी शिकणार अशी भूमिका तयार होते. असे होत असताना त्यांनी शिकविण्याचा ठरविलेला भाग आणि पद्धत मला समजली तर मी शिकणार, किती गतीने शिकणार हे योगायोग ठरवेल… ती बाब मला किती आवडली आणि ती धोरणे मला किती समजली. जी मुले
शिकली नाहीत किंवा त्यांना शिकायला त्रास होत आहे. त्याचे कारण तुम्ही ठरविलेला घटक आणि त्याही पेक्षा जास्त परिणाम करतो तुम्ही ठरविलेली शिकविण्याची पद्धत/संहिता. इथे एक बाब लक्षात येत असेल तुमची शिकण्याची धोरणे ही स्वतःची असतील तर त्यातून अधिक गतीने शिकता येईल.
आपण दोन बाबी सोबत शिकत असतो. एक शिकायचे कसे आणि दुसरी माहिती, संकल्पना इत्यादी. यामध्ये पहिल्या बाबीकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असते. ज्या strategies तयार केल्या आहेत त्यामध्ये कोणते बदल आणि कोणत्या बाबी नव्याने जोडण्याची गरज आहे हे लक्षात येते. (हे लक्षात येणे हेच खरे शिकणे आहे.) सोबतच शिकण्याचा ठरविलेला आशय (content) शिकला जातो, तो अधिक गतीने शिकला जातो.
आता प्रश्न पडतो इथे दोन बाबी शिकल्या गेल्या आहेत.
१) कसे शिकायचे आहे (strategies) या बद्दल शिकणे झाले. २) जो आशय शिकायचा ठरविलेला होता तो शिकलो.
वरील दोन्ही मध्ये सर्वांत महत्त्वाची कोणती बाब असेल कसे शिकायचे या पहिल्या बाबीला मुळीच महत्त्च
दिलेले नाही असे लक्षात येते. जेव्हा तो strategies वर काम करेल. तेव्हा कसे शिकायचे. गतीने कसे शिकायचे हे मुद्दे येतात. इतरांकडून शिकेल तेव्हाच शिकेल असे जेव्हा होते तेव्हा फक्त माहिती स्मरणात ठेवणे यावर जास्त भर असतो. त्यापुढे झालेच तर संकल्पना ज्ञात होते. ती संकल्पना समजते; परंतु strategies वर जेव्हा काम होते, तेव्हा अशा अनेक संकल्पना कशा शिकता येतील यावर काम होते. शिकण्याचे कौशल्य एकदा आले की तो स्वावलंबी होतो. शिकण्याच्या बाबतीत एकदा स्वावलंबी झालो की, हवे ते शिकता येणार आहे; परंतु स्वावलंबी व्हायचे असेल तर शिकण्याच्या strategies वर काम व्हायला हवे. Strategies वर काम करता आले की, गतीचा विचार आपण करू शकतो. त्यामुळे शिकायचे कसे हा भाग महत्त्वाचा मानला की, गतीचा मुद्दा येतो. एकविसाव्या शतकात फक्त शिकणे एवढेच महत्त्वाचे नाही तर, गतीने शिकणे तिप्पट गतीने शिकणे अनिवार्य आहे. त्याकरिता अध्ययन कौशल्य (Learning Skills) विकसित होणे आवश्यक आहे. अध्ययन कौशल्य (Leaming Skills) विकसित झाले
की गती वाढते.
शिक्षक म्हणून या पातळीवर आपली भूमिका असेल की, मुलांना तसा आत्मविश्वास देणे, तू खूप छान शिकतो आहेस, तू स्वतः शिकतो आहेस, तू अधिक गतीने शिकू शकतो, असे प्रोत्साहन आपण देऊ शकलो की, मुलांचा आत्मविश्वास वाढून ते गतीने शिकू शकणार आहेत. सध्या तर असे दिसते की, मी शिकविले तरी तू शिकत नाहीस असाच संदेश आमच्या वागण्यातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी मुले तिप्पट गतीने शिकू शकतात या दिशेने विचार करणे. मुले अधिक गतीने शिकतात याची वेगवेगळी उदाहरणे शोधीत राहणे. बऱ्याचदा आपल्या आवडीचे काम हे आपण अधिक उत्साहाने करतो. उत्साह असला की, गती वाढते.