राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन learning outcomes 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन learning outcomes 

 

१) NCERT, नवी दिल्ली व SCERT महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचलित मूल्यमापन

प्रक्रियेमध्ये योग्य बदल करण्याची पार्श्वभूमी सांगतात.

२) अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, आपत्कालीन परिस्थितीच्या (जसे कोविड १९) निमित्ताने मूल्यमापन पद्धतीविषयी माहिती सांगतात.

३) विविध शिक्षण मंडळांच्या मूल्यमापन पद्धती, प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा योग्यप्रकारे समन्वय साधतात.

४) विदयार्थ्यांचे समग्र प्रगतिपत्रक HPC (३६० अंशात्मक) याविषयीची माहिती सांगतात.

१.२ प्रस्तावना: केंद्र शासनाद्वारे पारित

झालेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २९(२) च्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने, दिनांक २० ऑगस्ट, २०१० च्या शासन निर्णयाद्वारे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू केली. सन २०१० पासून ते आजपर्यंत आपल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनात बदल झालेले आहेत. यात शैक्षणिक प्रक्रियेच्या अनुषंगाने अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, विविध शिक्षण मंडळांच्या मूल्यमापन पद्धती व कोविड-१९ यांसारख्या वैश्विक आपत्ती व महामारी यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाताना उपयोगात आणलेल्या मूल्यमापनासाठीची माहिती तंत्रज्ञानाची विविध साधने यांचा विचार करण्यात आलेला आहे. देशभरात कोविड-१९ काळात शाळा बंद असल्या, तरी काही शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील विविध साधनतंत्राद्वारे विदयाथ्यांचे ऑनलाईन / ऑफलाईन मूल्यमापन केले.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमधील संकलित मूल्यमापनाद्वारे आकारिक मूल्यमापन किती प्रमाणात विश्वासार्ह झाले आहे हे पडताळून पाहिले जाते. विद्यार्थ्यांची विचारप्रक्रिया जाणून घेणे. तसेच आकारिक मूल्यमापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सर्वंकष प्रगतीचा सर्वसमावेशक आढावा घेणे अपेक्षित आहे. मूल्यमापन हे विद्याथ्यर्थ्यांसाठी अध्ययन आणि विकासाला

मूल्यमापन

१.१ अध्ययन निष्पत्ती

प्रोत्साहन देणारे, उच्चस्तरावरील कौशल्यांची पारख करणारे असेल. उदा., विश्लेषण, तार्किक विचार आणि भोत्साहन देकर सुस्पष्टता यांसारख्या बाबींचा मूल्यमापनाचा प्रमुख उद्देश अध्ययन हाच असेल. त्याच उपयोग विदयार्थी, शिक्षक व शालेय शिक्षण व्यवस्थेला अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सतत बदल करण्यास साहाय्यभूत ठरेल. जेणेकरून सर्व विदयार्थ्यांच्या शिक्षण व सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. सर्व स्तरांवरील मूल्यमापनाचे हेच मूलभूत तत्त्व असेल.

मूल्यमापन प्रक्रियेअंतर्गत दद्यावयाचे विदयार्थी समग्र प्रगतिपत्रक याची रचना राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मध्ये मूल्यमापनाच्या संदर्भाने खालील अपेक्षा व्यक्त केली आहे.

सदर प्रगतिपत्रक हे सर्वांगीण, व्यापक (३६० अंशात्मक), बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक प्रगती दर्शविणारा तपशीलवार अहवाल असेल. समग्र प्रगतिपत्रक हे घर आणि शाळा यातील महत्त्वाचा दुवा असेल.

जेणेकरून शाळा व पालक विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा व अनुभवांची उपलब्धता करतील. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअर विकसित करता येईल. विदयार्थ्यांची शालेय शैक्षणिक माहिती, विदयार्थी, पालक व शिक्षक यांच्याकडून प्रश्नावल्यांमार्फत माहिती उपलब्ध होईल. या सर्व माहितीचे विश्लेषण करून विदयार्थ्यांची बलस्थाने, उणिवा, आवडीनिवडी, क्षमता, छंद यांचा विचार करून भविष्यातील व्यावसायिक संधीबाबत भाष्य करेल. यामुळे विदयार्थ्यांना सर्वोत्कृष्ट व्यावसायिक क्षेत्र निवडण्यास मदत होईल. मूल्यमापन प्रणालीमध्ये सदर बदल करून त्याच्या वापरासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करणे अपेक्षित

आहे. संपूर्ण शालेय शिक्षणादरम्यान प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी इयत्ता तिसरी, पाचवी आणि आठवीमधील सर्व विदयार्थ्यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत चाचणी घ्यावी. त्यामुळे शाळा आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत सुधारणा करण्याकरिता विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संपूर्ण शालेय यंत्रणेला साहाय्य होईल, असे सांगण्यात आलेले आहे. मूल्यमापन हे घोकंपट्टीवर भर न देता अध्ययन निष्पत्ती (LO’s) साध्य झाल्या, की नाही याची पडताळणी करण्यासाठी अपेक्षित आहे. विशेषतः इयत्ता तिसरीच्या चाचण्या प्राथमिक साक्षरता, संख्याज्ञान आणि पायाभूत कौशल्यांची पडताळणी करतील. तसेच शालेय परीक्षांच्या निकालाचा वापर (विद्यार्थ्याचे नाव गुप्त ठेवून) केवळ शालेय शिक्षण व्यवस्थेच्या

विकासासाठी, शालेय व्यवस्थेवर देखरेख व सुधारणा करण्याकरिता केला जाईल. (NEP 4.40)

१.३ मार्गदर्शिकेची उ‌द्दिष्टे :

मार्गदर्शिकेची उ‌द्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

१) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रचलित मूल्यमापन प्रक्रियेमध्ये योग्य बदल करणे.

२) अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, आपत्कालीन परिस्थितीच्या निमित्ताने मूल्यमापन

पद्धतीसह विविध शिक्षण मंडळांची मूल्यमापन पद्धती यांच्याशी सध्या वापरात असलेली सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची योग्यप्रकारे जोडणी करणे.

३) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाबाबत राज्यातील सर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांचे सक्षमीकरण करणे.

४) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती अधिक सक्षम करून क्षेत्रीय यंत्रणेचे सक्षर्मीकरण करणे.

२. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे स्वरूप (NCERT मार्गदर्शिका, 2019) कोविड-१९ च्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरात शाळा प्रत्यक्षात बंद असल्या, तरी अनेक ठिकाणी

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील विविध साधन तंत्रे वापरून विदयार्थ्यांचे ऑनलाईन / ऑफलाईन मूल्यमापन करण्यात आले. यात शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपात साधन तंत्रे वापरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, विविध शिक्षण मंडळाची मूल्यमापन पद्धती यांचा साकल्याने अभ्यास करून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती योग्यप्रकारे जोडणेही गरजेचे आहे. शैक्षणिक घडामोडींचा विचार करून NCERT नवी दिल्ली यांनी सध्या वापरात असलेली सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीत पुनर्रचना करण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहेत. यात अध्ययनासाठी मूल्यमापन (Assessment for Learning), अध्ययन हेच

evaluation

मूल्यमापन (Assessment as Learning) व अध्ययनाचे मूल्यमापन (Assessment of Learning) या संकल्पनांवर विशेष भर देण्यात आलेला आहे.

२.१ अध्ययनासाठी मूल्यमापन (Assessment for Learning) :

शिकणे व शिकण्याच्या प्रक्रियेतील मूल्यमापन हा अविभाज्य भाग आहे. समग्र मूल्यमापन होण्यासाठी

ते पूर्वग्रह मुक्त, एकाधिक पुराव्यांवर आधारित असणे आवश्यक आहे. विदयार्थ्यांनी वर्गामध्ये आणि वर्गाबाहेर दोन्ही कृतींमध्ये भाग घेण्यासाठी माहिती गोळा करणे व साद आवश्यक आहे. यातून ज्ञान, आकलन, कौशल्य, रुची, दृष्टिकोन आणि प्रेरणा इत्यादी, यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी समजतात शिक्षकांना अभिप्राय देणे आणि प्रत्याभरण (feedback) देणे सुलभ होते.

२.२ अध्ययन हेच मूल्यमापन (Assessment as Learning):

शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांची अध्ययन स्थिती समजणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने अध्ययनशैली बदलण्यास मदत होते. तसेच याबाबतचे अध्ययनाचे विश्लेषण करण्यासाठी उत्साह निर्माण होतो. विद्यार्थ्यांची कार्यक्षमता आणि शिकण्याच्या अडचणी त्यांना स्वतःचे मूल्यांकन करण्यास व सहकार्यांसह तसेच गटकार्याबद्दल विचार करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. शिकण्याच्या

प्रक्रियेचे मूल्यमापन केल्यास विदयाथ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्यभर शिकण्याची क्षमता विकसित होते.

२.३ अध्ययनाचे मूल्यमापन (Assessment of Learning):

अध्ययनाच्या विशिष्ट टप्प्यावर ठरावीक कालावधीनंतर अपेक्षित अध्ययन निष्पत्ती संबंधाचे एकत्रितपणे केलेले मूल्यमापन म्हणजे अध्ययनाचे मूल्यमापन होय. यामध्ये उद्दिष्टासंबंधाचे निकष आधारित मूल्यमापन

केले जाते. या मूल्यमापनातून विदयार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रमाणाविषयीची सर्वंकष माहिती पुरवता येते. जसे, अभ्यासक्रमाची क्षेत्रे आणि अध्ययन निष्पत्ती, कौशल्ये, अभिरुची इ. चे एकत्रित मूल्यमापन अपेक्षित आहे. येथे असा अभ्यासक्रम अभिप्रेत आहे, जो विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची दखल घेईल.

२.४ ‘Hands on and Minds on’ एक दृष्टिकोन :

अध्ययनाचा संबंध कारककौशल्यांबरोबर असतो. बालके कृतिद्वारे शिकत असतात. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये यांच्याद्वारे विविध अध्ययन अनुभव घेत असतात. कृती करताना अनेकदा चुका होतात, मात्र त्यांना सुधारण्याची संधी असते. ‘चुका आणि शिका’ या सिद्धांतानुसार मूल आपली शिकण्याची प्रक्रिया सुरू ठेवत असते. चुका सुधारताना मानसिक पातळीवर विचार करत चुकांचे निराकरण करणे सुरू असते. हे निराकरण म्हणजे एका अर्थाने विद्यार्थ्यांचे मानसिक पातळीवरील शिकणे असते. विदयार्थी त्याच्या Hand (इंद्रिये) आणि Mind (मन) अर्थातच शारीरिक व मानसिक समतोल

समन्वयातून शिकते. मनाने जी संकल्पना समजून घेतली जाते ती कृतीतून अचूकपणे प्रतिबिंबित होत असते. विदयार्थी करत असलेल्या प्रत्येक कृतीला त्याच्या स्वतःच्या वैचारिक अंगाची किंवा भूमिकेची जोड असल्याने कृतीही अर्थपूर्ण होते. ‘Hands on and Minds on’ या दृष्टिकोनामुळे पाठ्यांशाची

उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली आहेत, हे दृश्य स्वरूपात दिसतात. एका अर्थी यातून विद्यार्थ्यांचे कृतिशील अध्ययन होत असते. अध्ययन प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या कृती करताना विद्यार्थी मानसिकरीत्या सहभागी होतात. त्यामधील कृती समजून घेताना त्यातील संकल्पना, संज्ञा, संबोध समजून घेतात. जेणेकरून त्याला ती कृती स्वतः अचूकरीत्या करता येईल. मानसिक व शारीरिक पातळीवरील गुंतवणूक अध्ययनाच्या

प्रक्रियेत विदयार्थ्यांना अधिक गतिमान करते.

सोप्या भाषेत ‘Hands on and Minds on’ दृष्टिकोन (Activity) सक्रिय अध्ययनासाठी साहाय्यभूत आहे. विद्यार्थी अध्ययन करत असताना त्याचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय समन्वय होत असतो. विदयार्थी शिकत असताना शारीरिक व मानसिकरीत्या गुंतून राहण्यासाठी व प्रोत्साहित करण्यावर लक्ष केंद्रित करताना ‘Hands on and Minds on’ हा दृष्टिकोन खूप प्रभावी पडतो. त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा पाया मजबूत होताना दिसून येतो. सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी हा कसा फायदेशीर आहे, ते आपण पुढील उपयुक्त उपक्रमासह पाहूया.

गणिती क्रियांचा सराव : बेरीज आणि वजाबाकी शिकवताना वि‌द्याथ्यांना हातळण्यास योग्य अशा वस्तू वापरल्यास संज्ञानात्मक अध्ययन प्रक्रियेवर खूप प्रभाव पडतो. उदाहरणार्थ, असे समजा की, विद्यार्थी 8 + 8 = angle2 बेरीज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यासमोर १६ ठोकळे आहेत आणि ते पहिल्या गटामध्ये ४, दुसऱ्या गटामध्ये ४ आणि तिसऱ्या गटामध्ये ८ बनवण्यासाठी ठोकळ्यांचा वापर करतात. विद्यार्थ्यांला दृश्यस्वरूप माहीत आहे आणि ते ४ च्या दोन रचना एकत्र हलवून त्यांना ८ ची एक रचना करतात. हीच रचना हाताच्या बोटाच्या साहाय्याने करू शकतो. ४ आणि ४ यांची गणना शारीरिक व मानसिक प्रक्रियेशी निगडित आहे. अशा प्रक्रियेमधून गणनांची क्रिया अधिक सुलभ होते. अध्ययन ही मानसिक प्रक्रिया आहे विचार आणि कल्पना लक्षात घेणे हे देखील ‘Hands on and Minds on’ या दृष्टिकोनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विद्याथ्यर्थ्यांनी केलेल्या विचारावर चर्चा केली तर आकलन क्षमतेचा विकास होतो आणि आकलन सहज सुलभ होते. कृतियुक्त सहभागाने विदयार्थी अधिक क्रियाशील होतो. अध्ययन परिणामकारक होते.

दृश्य पैलूला चर्चेच्या कृतीसह जोडणे हे मानसिक क्रिया प्रज्वलित करण्याबरोबरच क्रियाशील करण्याचा आणखी एक मार्ग आहे. शिकण्याच्या वातावरणात शरीर सक्रिय केल्याने विद्यार्थ्यांना कृतीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. एखादया गोष्टीवर चर्चा करण्यासाठी विदयार्थ्यांना उभे राहण्यास आणि गटामध्ये जाण्यास सांगणे ही प्रेरणा त्यांना पुढील कार्याची दिशा मिळू शकते. जेणेकरून ते पुन्हा शिकू शकतील आणि लक्ष केंद्रित करू शकतील. उदाहरणार्थ :

१) शिक्षक जेव्हा वर्ग अध्यापनाच्या वेळी मार्गदर्शन करतात त्या वेळी विदयार्थी दिग्दर्शित कृती स्वतःच्या जीवनाशी जोडत कृतीचा अचूक क्रम लावत सहभागी होतो.

२) चित्रे काढण्याच्या कृतीमध्ये विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या अधिक सहभागी होताना दिसतात, मात्र त्यांच्या प्रकटीकरणासाठी आवश्यक असणारी विचारांची प्रक्रिया अप्रत्यक्षरीत्या मानसिक व भावनिक पातळीवर सुरू असते. अशा प्रकारे शारीरिक, मानसिक व भावनिक समन्वयातून

विद्यार्थी चित्र साकारतात.

३. राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०

३.१ पार्श्वभूमी :

केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार अधिनियम २००९ दिनांक १ एप्रिल, २०१० पासून भारतात लागू केला. कायदयातील तरतुदींनुसार इयत्ता आठवीपर्यंत पुढील वर्गातील प्रवेशासाठी विदद्याथ्यांना कोणत्याही बोर्डाची परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. सदर अधिनियमामधील कलम २९ (१) व (२) नुसार राज्यामध्ये सन २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू करण्यात

आलेली आहे. सन २०१०-११ पासून आजपर्यंत कालानुरूप आपल्या समाज जीवनात बरेच बदल झाले. त्यानंतर अध्ययन निष्पत्ती, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०, विविध शिक्षण मंडळांच्या मूल्यमापन पद्धती अस्तित्वात आल्या, कोविड-१९ या वैश्विक आपत्ती काळातदेखील शिक्षकांनी नवतंत्रज्ञानाचा उपयोग करीत अध्ययन-अध्यापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा वापर केलेला आहे.

३.२ अध्ययन निष्पत्ती आधारित मूल्यमापन : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,

नवी दिल्ली यांनी २०१७ मध्ये अध्ययन निष्पत्ती इयत्ता व विषयनिहाय निश्चित करून प्रसिद्ध केल्या. विद्यार्थ्यांना निर्धारित कालावधीत काय साध्य करायचे आहे? हे दर्शविणारी विधाने अध्ययन निष्पत्तीच्या रूपाने दिसून येतात. २०२१ मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) हे अध्ययन निष्पत्तीवर आधारित करण्यात आले. कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकामध्ये (PGI) अध्ययन निष्पत्तीचा विचार करण्यात आला आहे. यासोबत दैनंदिन अध्ययन- अध्यापन प्रक्रियादेखील अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत असणे अपेक्षित आहे. त्यामुळे अध्ययन निष्पत्तींवर आधारित अध्ययन-अध्यापन आणि मूल्यमापन होणे आवश्यक आहे. या अध्ययन निष्पत्ती क्षमतांशी निगडित आहेत. त्यामुळे क्षमता आधारित मूल्यमापनाचा विचार करताना प्रामुख्याने अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? अध्ययन निष्पत्ती नमूद करण्याची गरज काय? अध्ययन निष्पत्ती शब्दांचा संदर्भ, अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न निर्मिती या गोष्टींचा प्राधान्याने विचार करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० आणि अध्ययन निष्पत्ती :

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?

अध्ययनास उपयुक्त प्रक्रियांच्या आधारे अध्ययन घडवून आल्यानंतर विदयार्थ्यांमध्ये दिसणारे अपेक्षित बदल म्हणजे अध्ययन निष्पत्ती (Learning Outcome) होय.

अध्ययन निष्पत्तीची गरज :

अध्ययन निष्पत्तीमुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेस सुयोग्य दिशा मिळते व अध्ययन निष्पत्तीचे नियोजन करता येते. अपेक्षित बदलासाठी कोणते अध्ययन अनुभव दयायचे हे निश्चित करून, कोणती अध्यापन पद्धती वापरायची हे ठरविता येते. अध्ययन निष्पत्तीच्या बोधावरून उद्दिष्ट कोणते आहे? हे निश्चित होते. अध्ययन निष्पत्तीच्या आधारे शिक्षक मूल्यमापन करू शकतात व त्यामध्ये त्यांना कशाप्रकारे

मूल्यमापन करावयाचे (लेखी/तोंडी/प्रात्यक्षिक) याची दिशा मिळते. धोरण (१९६८)

३.३ शाळा आधारित मूल्यांकन (School Based Assessment) : राष्ट्रीय शैक्षणिक मध्ये भारतातील शिक्षणपद्धतीत लोकांची गरज आणि अपेक्षा

यानुसार सुधारणा करून परीक्षांमध्ये सर्वंकष मूल्यांकनावर भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

(१९८६) ने विद्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासामध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील मूल्यमापनाचे महत्त्व विशद केले आहे की, मूल्यमापन हे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील अविभाज्य घटक आहे.

विदद्यार्थ्यांची वाढ आणि विकासासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अतिशय महत्त्वाचे आहे. शालेय

शिक्षणात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही संकल्पना वापरली जात आहे. शाळा आधारित मूल्यांकन हे शाळासंबंधित सर्व घटकांसाठी विशेषतः शिक्षकांसाठी महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा क्रियात्मक, बोधात्मक व भावात्मक विकास घडवून आणणे अपेक्षित

४ समग्र प्रगती पत्रक (Holistic Progress Card):

आहे. याकरिता अभ्यासक्रम आधारित अध्ययन निष्पत्ती, मूल्ये, गाभाघटक, जीवन कौशल्ये, एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजणे गरजेचे आहे. शिक्षक म्हणून आपणास पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन अध्ययन अनुभव देणे गरजेचे आहे.

अध्ययन अनुभवाचे नियोजन करताना आकारिक व संकलित मूल्यमापनाच्या साधनतंत्रांचा विचार करणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मध्ये विदयार्थ्यांचे मूल्यमापन करताना ३६० अंशात्मक समग्र प्रगतिपत्रक सूचित केले आहे. अभ्यासक्रम आराखड्यामध्ये पायाभूत घटक म्हणून शारीरिक, सामाजिक, भावनिक, नैतिक, बोधात्मक, भाषा व साक्षरता, सौंदर्यात्मक व सांस्कृतिक विकास आणि सकारात्मक अध्ययन सवयी या बाबी नमूद केल्या आहेत. यासाठी मूल्यमापनात शिक्षक, पालक, स्वयं-मूल्यमापन, सहाध्यायी मूल्यमापन या अपेक्षा केल्या आहेत. यासाठीचे प्रगतिपत्रक कुटुंब आणि शाळा यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा ठरेल. ज्यातून विद्यार्थ्याला कोणत्या स्वरूपाची मदत आवश्यक आहे व ती मदत कशी देता येईल याचा विचार नेमकेपणाने होणार आहे.

५ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मूल्यमापन :

या संकल्पनेत अशी अपेक्षा आहे की, आधुनिक तंत्रज्ञानाचा मुलाच्या अध्ययन-अध्यापनात व मूल्यमापनात वापर केला जावा. जसे, विदयार्थ्याला संगणक आधारित (सोफ्टवेअरच्या मदतीने) शिकण्याची सोय व्हावी, विदयार्थ्याने दिलेला प्रतिसाद संग्रही व्हावा, संगणकामार्फतच या प्रतिसादाचे विश्लेषण होण्याची सोय असेल आणि योग्य मार्गदर्शन उपलब्ध होईल. एकंदरीत मुलाचे शिकणे वैयक्तिक (Individual) असेल. उताऱ्याचे आकलन म्हणून विदयार्थी संगणकावर दिसलेला उतारा वाचेल, त्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देईल, संगणक त्याच्या प्रतिसादाचे विश्लेषण करून मूल्यमापन करेल व योग्य उत्तरसूची पुरवेल. अशा कृती अनेक विषय, त्याअंतर्गत समाविष्ट घटक या संबंधाने विदयार्थी वेळोवेळी करेल. या सर्व प्रतिसादांची नोंद संगणकात घेतली जाईल, वेळोवेळी निदानात्मक विश्लेषण होऊन नेमकेपणाने विद्यार्थ्याला आवश्यक प्रत्याभरणाची सोय असेल. या सोफ्टवेअरमध्ये विदयार्थ्याच्या अभिरुची व अभिवृत्ती ओळखता येतील अशी रचना असेल. ज्यावरून भविष्यातील व्यावसायिक संधींचा मागोवा घेता येईल. सत्र अखेरीस अपेक्षित श्रेयांक/गुणदान/वर्णनात्मक अभिप्राय नोंदवला जाईल.

एकदा का सर्व घरे किंवा शाळांमध्ये आंतरजाल जोडनियुक्त भ्रमणध्वनी किंवा टॅबलेट उपलब्ध झाले की, योग्य देखरेखीखाली विदयार्थ्यांसाठी गटांचे उपक्रम म्हणून प्रश्नमंजूषा, स्पर्धा, मूल्यांकन, समृद्धी साहित्य असलेले ऑनलाईन अॅप आणि समान आवडी असलेल्यांसाठी ऑनलाईन कम्युनिटीज विकसित केल्या जातील. उपरोक्त सर्व उपक्रम अधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. डिजिटल अध्यापनशास्त्र उपयोगात आणण्यासाठी शाळा टप्याटप्याने स्मार्ट क्लासरूम विकसित करतील.

३.६ आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य :

माध्यमिक शाळेच्या परीक्षांचे विदयमान स्वरूप आणि त्यापुढील प्रवेश परीक्षा लक्षात घेता खाजगी शिकवणी वर्ग संस्कृतीने हानी होत आहे. विशेषतः माध्यमिक स्तरावर विदयार्थ्यांचा अध्ययनासाठी असलेला वेळ, परीक्षांसाठी लागणारे अतिरिक्त शिकवणी वर्ग आणि त्यासाठीची तयारी यामध्ये खर्च होतो. परीक्षा पद्धतीमुळे विद्याथ्यांना एकाच शाखेतील मर्यादित माहितीचा अभ्यास करण्यास भाग पाडले जाते. भविष्यासाठी विदयार्थ्यांना वेगवेगळे पर्याय आणि त्यात निवड करण्याची लवचिकता शिक्षण व्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीसाठी असणाऱ्या परीक्षा मंडळाच्या परीक्षा सुरू राहणार असल्या तरी, परीक्षा मंडळ आणि प्रवेश परीक्षांच्या स्वरूपात बदल करण्यात येईल. खाजगी शिकवणी वर्गाला जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या वैयक्तिक आवडीनुसार विद्यार्थ्यांना या विषयासाठी परीक्षा मंडळाची परीक्षा दयायची आहे त्यांना आवडीप्रमाणे विषय निवडता येतील. परीक्षा मंडळाच्या परीक्षा अधिक सुलभ केल्या जातील, त्यामुळे शिकवणी वर्ग, घोकंपट्टीऐवजी मुख्य क्षमता व योग्यता जाणून घेता येईल. विदयार्थ्याला अतिरिक्त ताण न घेता परीक्षा मंडळ परीक्षेच्या तत्सम विषयात चांगली कामगिरी करता येईल. परीक्षा मंडळ परीक्षेशी संबंधित धोके दूर करण्यासाठी सर्व विदयार्थ्यांना, त्यांची इच्छा असल्यास एका शैक्षणिक वर्षांमध्ये दोन वेळा परीक्षा मंडळाच्या परीक्षेला प्रविष्ट होता येईल. एक मुख्य परीक्षा आणि एक सुधारणा करण्यासाठी परीक्षा असेल. या परीक्षांचे स्वरूप हे घोकंपट्टीचे न राहता मूलभूत अध्ययन निष्पत्ती प्राप्त झाली, की नाही हे

पाहणारे असेल. राष्ट्रीय व स्थानिक ज्ञान तसेच प्रसंगोचित उच्चस्तरीय कौशल्य व उपयोजन यावरून पडताळणी केली जाईल.

३.७ कुशाग्रबुद्धीच्या/विशेष प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांना विशेष उत्तेजन देण्याची व्यवस्था : शोधल्या पाहिजेत. त्यांचे संगोपन केले पाहिजे.

विदयार्थ्यांमध्ये काही अंगभूत प्रतिभा असतात त्या त्यांना उत्तेजन दिले पाहिजे, त्या विकसित केल्या पाहिजेत. विविध अभिरुची, कल आणि क्षमतांच्या रूपात प्रतिभांची अभिव्यक्ती होऊ शकते. जे विद्यार्थी एखादया क्षेत्रात विशेष अभिरुची आणि क्षमता दर्शवितात त्यांना सामान्य शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडेदेखील त्या क्षेत्राच्या अभ्यासासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. शिक्षकांच्या सेवापूर्व प्रशिक्षणामध्ये विद्याथ्यांच्या प्रतिभा आणि अभिरुची

ओळखण्याच्या आणि उत्तेजन देण्याच्या पद्धतींचा समावेश असेल एनसीईआरटी (NCERT) आणि

एनसीटीई (NCTE) कुशाग्रबुद्धीच्या मुलांच्या शिक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे विकसित करेल. वर्गातील एकाच विषयात विशेष रुची किंवा प्रतिभा असलेल्या विद्यार्थ्यांना पूरक साहित्य आणि मार्गदर्शन करून आणि प्रोत्साहन देऊन प्रोत्साहित करणे हे शिक्षकांचे ध्येय असेल. विषय केंद्रित आणि प्रकल्प आधारित शिकण्याची सोय असेल, शाळासंकुल, जिल्हा पातळीवर आणि त्याही पलीकडे प्रोत्साहन आणि साहाय्य केले जाईल. माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या उच्च गुणवत्तेच्या राष्ट्रीय निवासी दीर्घ सुट्ट्यांच्या कालावधीतील कार्यक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाईल. ज्यात सामाजिक व आर्थिकदृष्ट्या वंचित गटांसह देशातील उत्कृष्ट विदयार्थ्यांना आणि शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी गुणवत्ता आधारित; परंतु न्याय्य प्रवेश प्रक्रिया असेल. देशभरात विविध विषयांमधील ऑलिम्पियाड आणि स्पर्धा परीक्षा घेण्यात येतील, ज्यामध्ये व्यवस्थित समन्वयाने स्थानिक ते राज्य व राष्ट्रीय पातळी अशी प्रगती होईल, जेणेकरून सर्व विदयार्थी ते ज्या स्तरासाठी पात्र ठरतील त्यानुसार सहभाग घेऊ शकतील. मोठ्या प्रमाणावर सहभाग सुनिश्चित करण्यासाठी या स्पर्धा ग्रामीण भागात आणि प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचे प्रयत्न केले जातील. आय.आय.टी. आणि एन.आय.टी. सारख्या प्रमुख संस्थांसह सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमधील गुणवत्ता आधारित निकाल आणि इतर संबंधित राष्ट्रीय कार्यक्रमांचे निकाल, त्यांच्या पदवीपूर्व कार्यक्रमांमध्ये प्रवेशाच्या निकषाचा भाग म्हणून वापरण्यास प्रोत्साहीत केले जाईल.

३.८ एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये:

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मध्ये विद्यार्थ्याला एकविसाव्या शतकात जीवन जगण्यासाठी आवश्यक

कौशल्ये प्राप्त व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. ‘एकविसाव्या शतकासाठी कौशल्ये’ हा

शब्दसमूह ज्ञान, कौशल्ये, कामाच्या सवयी आणि चारित्र्य यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण व्यापक संच आहे.

ज्याला शिक्षक, पालक व विदयार्थी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये’ ही एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी व्यक्तीला सक्षम करणारी कौशल्ये आहेत. आज सारेच विश्व डिजिटल रूपात बदलत आहे, परस्पर सहकार्याने समाज पुढे जात आहे, कल्पकतेने प्रगती करत आहे, आधुनिक सक्षम होण्यासाठी मानव संसाधने शोधून त्वरित बदल स्वीकारत आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये यावर विस्तृत विवेचनासह पुस्तिका मे-२०२० मध्ये प्रकाशित केलेली आहे. यामध्ये अनेक संस्थांनी जीवन कौशल्यांवर केलेल्या संशोधनांचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. या पुस्तिकेत एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये विशद केलेली आहेत. त्याची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे.

 

Leave a Comment