समग्र प्रगती पत्रक learning outcomes (Holistic Progress Card)

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समग्र प्रगती पत्रक learning outcomes (Holistic Progress Card)

अध्ययन निष्पत्ती :

• समग्र प्रगती पत्रकाची पार्श्वभूमी व गरज सांगतात.

• समग्र प्रगती पत्रकात समाविष्ट घटक सांगतात.

समग्र प्रगती पत्रक : संकल्पना

अभ्यासक्रमामधील क्षेत्रे, ध्येये, क्षमता, अध्ययन निष्पत्तींच्या अनुषंगाने विदयार्थ्यांच्या मूल्यांकनाविषयी सर्वकष माहिती देणारा दस्तऐवज होय.

समग्र प्रगती पत्रकाची निर्मिती करताना ३६०० दृष्टिकोनाचा अवलंब केला जाईल. हे पत्रक समग्र आणि बहुआयामी असेल. समग्र प्रगती पत्रकामध्ये विशिष्ट कालावधीत एखादया बालकाच्या कार्यक्षमतेचे सर्वकष वर्णन असेल, याबरोबरच विशिष्ट कालावधीत सामर्थ्य, संधी, अडथळे आणि कौशल्ये यांची नोंद असेल. समग्र, बालकेंद्रित ३६०० प्रगती पत्रक हे असे क्रांतिकारक साधन आहे की, ज्यात बालकांशी संबंधित भागधारकांना सुनियोजित अध्यापनशास्त्रीय पद्धती आणि अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी चांगली मदत होऊ शकेल. समग्र प्रगती पत्रकाची रचना करताना बालकांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक इ. विकासातील सर्व पैलूंमध्ये ठरावीक कालावधीत वाढ करण्याकडे समान लक्ष दिले जाईल. समग्र प्रगती पत्रक प्रत्येक मुलाच्या बोधात्मक, भावनिक आणि कारक कौशल्यांमधील प्रगती तसेच वेगळेपणाचे तपशील नमूद करते. हे प्रगती पत्रक बालकांना त्याच्या सामर्थ्याबद्दल, आवडीच्या क्षेत्राबद्दल तसेच स्वतःमधील सुधारण्याच्या संधीबद्दल जागरूक करेल. अशा प्रकारे या प्रगती पत्रकात प्रत्येक बालकाचे वेगळेपण प्रतिबिंबित होईल. हे पत्रक घर आणि शाळा यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा बनेल आणि पालक/ कुटुंबांना त्यांच्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षण आणि विकासामध्ये नियमित व सक्रियपणे सहभागी करून घेईल.

अर्दकष प्रगती पत्रक (HPC) पार्श्वभूमी व गरज :

पारंपरिकपणे मूल्यमापन हे वर्षाच्या शेवटी घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या आधारे करण्यात येते. वार्षिक परीक्षा विदयार्थ्यांना मिळणाऱ्या गुणांवर लक्ष केंद्रित करतात. यातून विदयार्थ्यांच्या प्रगतीचे समग्र चित्र स्पष्ट होत नाही. हे मूल्यमापन पाठांतरावर आधारित असते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक दडपण निर्माण होते. शिक्षण ही एक प्रक्रिया असून या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असते. वर्षाअखेरीस करण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापनामुळे केवळ विदयार्थ्यांच्या अंतिम संपादणुकीवर लक्ष केंद्रित होते बेट्यार्थ्यांच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासातील प्रगतीकडे लक्ष केंद्रित होण्यासाठी समग्र प्रगती पत्रकाची गरज आहे.

नवीन शैक्षणिक धोरण-२०२० नुसार सर्व मुलांचे शाळा आधारित मूल्यमापन करण्यासाठी प्रगती पत्रक तयार केले जाईल की, जे शाळांद्वारे पालकांना कळवले जाईल. त्याचे स्वरूप समग्र असेल.

समग्र प्रगती पत्रकाचे घटक :

प्रत्येक मुलाचे समग्र प्रगती पत्रक हे शिक्षक आणि पालकांना प्रत्येक मुलाला वर्गात आणि बाहेर कशी मदत करावी याबद्दल महत्त्वाची माहिती पुरवेल. समग्र प्रगती पत्रकामध्ये, मुलाच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू समाविष्ट केले जातील. त्याबरोबरच कच्चे दुवे ओळखण्यास मदत होईलच, पण मुले-शिक्षक आंतरक्रिया, अध्ययनातील प्रगती, गळती अध्ययनातील अडथळे तसेच यापासून कोणत्याही शाळेतील बहुआयामी समस्यांचे निराकरण करण्यास मदत होईल. समग्र प्रगती पत्रकात वेगवेगळे संदर्भ, वातावरण आणि नातेसंबंधांमध्ये मुलांच्या शिक्षण आणि विकासाच्या विविध पैलूंचा शोध घेणे आणि त्यांचे मूल्यांकन करणे समाविष्ट आहे.

१) भाग – अ (१) : विद्यार्थी सर्वसाधारण माहिती

यामध्ये विदयार्थी नाव, वर्ग, तुकडी, जन्मदिनांक, पत्ता, आई व वडिलांचे नाव व त्यांचे शिक्षण, भाऊ-बहिणीचे नाव, मातृभाषा, क्षेत्र, महिनानिहाय उपस्थिती, छंद इत्यादी.

२) भाग – अ (२) : मी व माझा परिसर

यामध्ये विदयार्थ्यांचा आय कार्ड साईज फोटो, कुटुंबाचा एकत्रित फोटो, जन्मदिनांक, विदयार्थ्यांच्या मित्रांची नावे, विद्यार्थ्यांचा आवडता रंग इत्यादी.

३) 4pi – 4

१) अभ्यासक्रमाचे क्षेत्र

२) अभ्यासक्रमाचे ध्येय/ध्येये

३) क्षमता

४) अध्ययन निष्पत्ती

५) उपक्रम

६) मूल्यमापन रुब्रिक

७) शिक्षक अभिप्राय

यामध्ये विदयार्थ्यांच्या अध्ययनाचे पुढीलप्रमाणे स्तर असतील :

(१) पायाभूत स्तर (Basic/Stream Level)

(२) मध्य स्तर (Middle/Mountain Level)

(३) प्रगत (Advance/Sky Level) तसेच संबंधित विद्याथ्यांच्या वर्तन निरीक्षणाच्या शिक्षकांनी ठेवलेल्या नोंदी (Notes) असतील.

८) स्वः मूल्यमापन

९) सहाध्यायी मूल्यमापन

१०) पालक/काळजीवाहू व्यक्ती यांचा अभिप्राय

४) भाग – क : शैक्षणिक वर्ष सारांश

समग्र प्रगती पत्रकाची वैशिष्ट्ये :

विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या विविधांगी पैलूंचा विचार समग्र प्रगती पत्रकात केला जातो. समग्र प्रगती पत्रकाची खालील वैशिष्ट्ये सांगता येतील :

१) सहभागी आणि अध्ययनार्थिकेंद्रित.

२) सर्वसमावेशक.

३) प्रगतीबद्दल गुणात्मक अभिप्राय.

४) कौशल्ये आणि क्षमतांचा सतत मागोवा.

५) स्व-जाणीव व आत्मसन्मान यावर आधारित.

६) केवळ संख्यात्मक बाबींऐवजी वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक,

७) विदयार्थ्यांचे सत्रनिहाय समग्र प्रगती पत्रक ठेवण्यात येईल.

सदयःस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांचे मार्फत समग्र प्रगती पत्रक विकसनाचे काम सुरू आहे. याबाबतचा पथदर्शी अभ्यास, NCERT, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत करण्यात आलेला आहे. याबाबतचे अभिप्राय घेऊन NCERT, नवी दिल्ली यांचे स्तरावर PARAKH, नवी दिल्ली या संस्थेमार्फत HPC अंतिम करण्याचे काम सुरू आहे. नवी दिल्ली यांचेकडून HPC अंतिम स्वरूपात प्राप्त होताच महाराष्ट्र राज्यासाठी ते समायोजित करण्यात येईल. याबाबत शासन अथवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत स्वतंत्रपणे शासन निर्णय/परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल.

 

Join Now

Leave a Comment