मूल्यमापनासाठी तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर learning outcomes
१) प्रस्तावना
कोविड-१९ महामारीमुळे सर्व जग ठप्प झाले होते. जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केले होते. त्याचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला. यास शिक्षणक्षेत्रही अपवाद ठरले नाही. मार्च २०२० पासून भारतातही संपूर्ण लॉकडाऊन झाले. या काळात राज्यातील सर्वच शाळा बंद करण्यात आल्या. परिणामी अध्ययन-अध्यापन व मूल्यमापनाची प्रक्रिया ठप्प झाली; परंतु याच वेळी राज्यातील बहुतांश शिक्षकांनी अवगत माहिती तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्वक वापर केला. तंत्रज्ञान नसते तर संपूर्ण शिक्षण प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला असता. या काळात शिक्षकांनी वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमांचा कौशल्यपूर्ण वापर केला व शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. राज्यशासनाच्या शिक्षण विभागाने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दूरदर्शनवरील ज्ञानगंगा चॅनल, दीक्षा अॅप, आकाशवाणी, शिकू आनंदे, अभ्यासमाला, गोष्टींचा शनिवार, स्वाध्याय, विज्ञानाचा गुरुवार इत्यादी उपक्रमांद्वारे विदयार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. याकाळात शिक्षकांनी, क्वीझ, व्हिडिओ, ऑडिओ लिंक्स, पीडीएफ, व्हिडिओ/ऑडिओ कॉल यांसारख्या विविध स्वरूपातील माहिती तंत्रज्ञान साधनांचा मूल्यमापन करण्यासाठी उपयोग केला. या साधनांमुळे शाळा बंद असताना सुद्धा अध्ययन-अध्यापन सोबतच मूल्यमापनही सुरू राहिले. आधुनिक काळामध्ये व विपरीत परिस्थितीत मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञान माध्यमांची काही, प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. मूल्यमापनाच्या साधनतंत्रानुसार आपण साधारण कुठले तंत्रज्ञान, माध्यमाचा उपयोग करू शकतो
या संदर्भात माहिती जाणून घेऊ. ही माध्यमे वापरण्यासाठी कोणतीही सक्ती नाही. हे फक्त गरजेनुसार वापरावयाचे पर्याय आहेत, तसेच साधन तंत्रानुसार शिक्षक आपापल्या परीने त्यांना अवगत असलेले तंत्रज्ञान साधने वापरू शकतात.
२) तंत्रज्ञानाचा वापर मूल्यमापनासाठी कसा करावा याचा नमुना :
(शिक्षक मूल्यमापनाच्या साधनतंत्रानुसार माहिती / तंत्रज्ञानाची साधने उपयोगात आणू शकतात.)
साधनतंत्रे
दैनंदिन निरीक्षण
तंत्रज्ञान साधने
ध्वनिचित्रफीत
वापर कोठे करावा
प्रत्यक्ष वर्गात तसेच ऑनलाईन शिक्षण वर्गात
उदाहरण
मूकाभिनय नाट्यीकरण, गीतगायन, भाषण, प्रयोग इ. ध्वनिचित्रफीत चित्रीकरण करून त्याआधारे निरीक्षण नोंदी करता येतील.
तंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी
सायबर सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या मूलभूत बाबी :
ऑनलाईन माध्यमे ही कार्य सुलभ होण्यासाठी मदत करतात; परंतु ही माध्यमे वापरताना वापरकर्त्याला ती सुरक्षितपणे कशी वापरावी याविषयीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. शिक्षण व्यवस्थेत ऑनलाईन माध्यमे वापरत असताना त्यातील प्रत्येक घटकाला म्हणजे विदयार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, अधिकारी वहाँ, शिक्षणसंस्थेचे व्यवस्थापक यांना सजग राहणे अत्यंत गरजेचे असते. त्यासाठीच येथे ऑनलाईन माध्यमे बापरताना कोणती काळजी घ्यावी हे समजून घेऊ या.
सायबर सुरक्षा आणि सुरक्षितता म्हणजे काय? माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर म्हणजे ‘सायबर सुरक्षा’ होय. यात माहिती सुरक्षित ठेवणे, माहितीविषयी जबाबदार असणे, इतर ऑनलाईन असणाऱ्या व्यक्तींविषयी आदर बाळगणे व इंटरनेट आचारसंहितेचा चांगल्या प्रकारे वापर करणे तसेच नेटवर्क, संगणक, प्रोग्राम व माहिती इत्यादींवर होणारे हल्ले, नुकसान व अनधिकृत वापर यांपासून सुरक्षित राहण्यासाठीच्या तंत्रज्ञान, प्रक्रिया व सरावांचा समावेश सायबर सुरक्षेत होतो.
संगणक सुरक्षा
• संगणक वापरात नसताना संगणकाला लॉग ऑफ करावे.
• संगणक थेट वीज पुरवठा स्वीच बोर्डाला जोडू नये.
• विजेच्या दाबाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी स्टॅबिलायझर UPS वापरावे.
• पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर करू नये.
• आपल्या संगणकास अज्ञात डिव्हाईस कनेक्ट करू नये. त्याच्यामध्ये व्हायरसचा धोका असू शकतो.
* केवळ योग्य अशी मुक्त स्रोत (Open Resource) किंवा परवानाकृत (Licensed) सॉफ्टवेअर ऑपरेटिंग
सिस्टीम वापरावी.
प्रत्येक सिस्टीममधील अॅन्टिव्हायरस सॉफ्टवेअर अदद्ययावत असल्याचे नियमितपणे तपासावे.
मजबूत फायरवॉलचा वापर करावा.
* bat, cmd, exe, pif यांसारख्या फाईल फॉरमॅट सामग्री फिल्टरिंग सॉफ्टवेअर अनावश्यक फाईल्सचे (extension) अवरोधित करण्यासाठी वापरावे.
* विशिष्ट व स्ट्राँग पासवर्डचा वापर करावा.
* वारंवार आपले पासवर्ड बदलावेत.
* जुन्या पासवर्डचा पुन्हा वापर करू नये.
• आपली संगणक प्रणाली आणि लॅब अधिकृत व्यक्तीच वापरत असल्याची खात्री करावी.
• वैयक्तिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करावी. उदा., वैयक्तिक यूएसबी किंवा हार्ड ड्राइव्ह
आंतरजाल (इंटरनेट) सुरक्षितता व शिष्टाचार
• इतरांच्या गोपनीयतेचा आदर करा.
• ब्लॉगिंग आणि ई-मेल चॅटिंग करताना भाषेच्या वापरामधील योग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करा.
दुसऱ्याच्या ई-मेल खात्यात लॉग इन करू नका.
• कॉपीराईट केलेली सामग्री डाऊनलोड करू नका.
• धोकादायक साईटपासून वाचण्यासाठी ब्राउजर ऑटो अपडेट मोडवर ठेवा.
ई-मेल सुरक्षितता
• अनोळखी व फसव्या ई-मेलला प्रत्युत्तर देऊ नये.
• नाव, जन्मतारीख, शाळेचे नाव, पत्ता, पालकांची नावे यांसारखी वैयक्तिक माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही देऊ नये.
• फसव्या जाहिरातींच्या आमिषाला बळी पडू नये.
अज्ञात स्रोतांकडून आलेल्या ई-मेलकडे दुर्लक्ष करावे.
• अज्ञात स्रोतांकडून आलेले ई-मेल अटॅचमेंट उघडू नये किंवा त्यावरील दुव्यांवर क्लिक करू नये.
अज्ञात फाईल्स कदाचित आपले डिव्हाईस हॅक करू शकतात.
• फिशिंग वेबसाईटपासून सावध रहावे. पुष्टी करण्यासाठी URL तपासावे.
• इतरांना स्पॅम किंवा संशयास्पद ई-मेल पाठवू नये.
सुरक्षित सामाजिक नेटवर्किंग
आपली वैयक्तिक माहिती उघड करणे टाळावे. जसे आपले वय, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, शाळेचे नाइ इत्यार्दीमुळे ओळख चोरी होऊ शकते.
• नेटवर्किंग साईटवर आपले गोपनीयता सेटिंग्ज काळजीपूर्वक बदलावे.
• आपला संकेतशब्द (पासवर्ड) आपल्या व्यतिरिक्त कोणासही उघड करू नये.
• केवळ ज्ञात लोकांशी संवाद साधा आणि त्यांच्याशी सहयोग करावा.
इतरांच्या भावना दुखावणारे सावधगिरी बाळगावी. असे काहीही पोस्ट करू नये, छायाचित्रे, व्हिडिओ पोस्ट करताना नेहमी
• सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो, व्हिडिओ किंवा संवेदनशील माहिती पोस्ट करताना योग्य ती काळजी घ्यावी कारण ही माहिती कायमस्वरूपी ऑनलाईन राहते.
• नेटवर्किंग साईटवर आपल्या मित्रांची माहिती पोस्ट करू नये, ज्यामुळे त्यांना धोका पोहचू शकेल. आपल्या मित्रांचे त्यापासून रक्षण करावे.
• सोशल नेटवर्किंगवर आपल्या भविष्यकालीन योजना पोस्ट करणे टाळावे.
कोणत्याही सोशल साईटवर स्वतःसाठी बनावट प्रोफाईल तयार करू नये.
• आपण सोशल मीडियावर वाचलेल्या कोणत्याही गोष्टी विश्वसनीय स्रोतावरून आल्याची तपासणी न करता अग्रेषित (फॉरवर्ड) करू नये.
• सोशल नेटवर्किंग साईटवर लॉग इन नये. केल्यानंतर त्याचा वापर संपल्यानंतर लॉग आऊट व्हायला विसरू
पर धमकी (Cyber bullying)
एखादया व्यक्तीबद्दल नकारात्मक, हानिकारक, खोटी किंवा खरी माहिती इतरांना पाठविणे, पोस्ट अथवा शेअर करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. ती व्यक्ती सायबर कायदयानुसार शिक्षेस पात्र आहे.
सत्वर बुलिंगमध्ये याचा समावेश होतो.
* तुमच्यावर किंवा तुमच्याविषयी इतर कोणी टिपण्णी करणे.
• कोणीतरी तुमच्या नावावर बनावट प्रोफाईल तयार करून तुम्हांला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे.
• ऑनलाईन किंवा मोबाईल फोनवर धमकी किंवा अपमानजनक संदेश पाठविणे.
* ऑनलाईन ग्रुप्समधून आणि फोरममधून वगळणे.
• आपल्या परवानगीशिवाय आपले छायाचित्र ऑनलाईन अपलोड करणे.
* एखादया साईटवर आपल्याबद्दल अफवा पसरविणे.
• आपल्या खात्याचा पासवर्ड चोरणे आणि अयोग्य संदेश पाठविणे.
* आक्षेपार्ह चॅट.
प्रखर बुलिंग (Cyber bullying) झाल्यास खालील गोष्टी कराव्यात.
‘ प्रतिसाद देऊ नये :
जर कोणी तुमच्यासोबत सायबर बुलिंग करीत असेल, तर त्याला प्रतिसाद किंवा उत्तर देऊ नये. यामुळे आपली समस्या आणखी बिघडू शकते किंवा आपणास अडचणीत आणू शकते.
• स्क्रीन शॉट :
सायबर बुलिंग होत आहे असे वाटल्यास त्या गोष्टींचा स्क्रीन शॉट घ्यावा व रेकॉर्ड बनवावे.
• ब्लॉक आणि रिपोर्ट :
बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचे हे वैशिष्ट्य असते, जर कोणी तुम्हांला त्रास देत असेल तर, आपण सोशल मीडियावर त्याला ब्लॉक करून तसा रिपोर्ट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दयावा.
• सायबर बुलिंगबद्दल बोला :
सायबर बुलिंग आपल्यावर बऱ्याच मार्गांनी परिणाम करते. अशा वेळी आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि वरिष्ठांना त्याबद्दल सांगावे.
• खाजगीपण जपा :
नेहमी आपली सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग बदलावी व ती किती मर्यादेपर्यंत सार्वजनिक करायची ते सायबर बुलिंग झाल्यास खालील गोष्टी कराव्या.
• सावध व्हा :
सायबर जगतामधील सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षा उपायांसह अपडेट रहावे.
• निश्चित करा :
अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नये. आपण ज्याला ओळखत नाही अशा लोकांसोबत ऑनलाईन बोलू नये.
• स्क्रीन शॉट :
सायबर बुलिंग होत आहे असे वाटल्यास त्या गोष्टींचा स्क्रीन शॉट घ्यावा व रेकॉर्ड बनवावे.
• ब्लॉक आणि रिपोर्ट :
बऱ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचे हे वैशिष्ट्य असते, जर कोणी तुम्हांला त्रास देत असेल तर, आपण सोशल मीडियावर त्याला ब्लॉक करून तसा रिपोर्ट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला दयावा.
• सायबर बुलिंगबद्दल बोला :
सायबर बुलिंग आपल्यावर बऱ्याच मार्गांनी परिणाम करते. अशा वेळी आपल्या पालकांना, शिक्षकांना आणि वरिष्ठांना त्याबद्दल सांगावे.
• खाजगीपण जपा :
नेहमी आपली सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग बदलावी व ती किती मर्यादेपर्यंत सार्वजनिक करायची ते सायबर बुलिंग झाल्यास खालील गोष्टी कराव्या.
• सावध व्हा :
सायबर जगतामधील सर्व प्रतिबंधात्मक आणि सुरक्षा उपायांसह अपडेट रहावे.
• निश्चित करा :
अनोळखी व्यक्तींशी संवाद साधू नये. आपण ज्याला ओळखत नाही अशा लोकांसोबत ऑनलाईन बोलू नये.