मूल्यमापनाचे अभिलेखे learning outcomes
मूल्यमापन ही अध्ययन व अध्यापनाच्या बरोबरीने चालणारी नियोजित क्रिया असल्याने मूल्यमापना अभिलेखे अद्ययावत असणे आवश्यक आहे. या अभिलेख्यांवरून वर्गशिक्षकांशिवाय इतर शिक्षक, पालक विदयार्थी व शिक्षण यंत्रणेतील इतर घटकांना सुरू असलेल्या अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन प्रक्रिये मागोवा घेता येईल. मूल्यमापनाचे महत्त्वाचे अभिलेखे पुढीलप्रमाणे आहेत :
• सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही
• विदयार्थी संचयी नोंदपत्रक (Cumulative Record)
विद्यार्थी संचिका (Port Folio)
• स्वयंनिर्मित प्रश्नपेढी
• उद्दिष्टे, प्रश्न व तंत्रनिहाय भारांश निश्चिती तक्ता
• प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका
• साधन तंत्रनिहाय गुणदान निकष (रुब्रिक)
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही :
सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदी पुढीलप्रकारे करणे अपेक्षित आहे. अध्ययन निष्पत्तीनिहाय नोंदी, विशेष प्रगतीच्या नोंदी व गुणात्मक नोंदी. विदयार्थ्यांचे शिकणे सुरू असताना प्रत्येक टप्प्यावर संबंधित इयत्तांच्या, अध्ययन निष्पत्तींच्या आधारे नोंदी व व्यक्तिमत्त्व विकास, मूल्ये, गाभा घटक व एकविसाव्या शतकासाठीची
कौशल्ये यांच्या आधारे वर्णनात्मक नोंदी करणे आवश्यक आहे. यासाठी पुढील बाबींचा विचार करू. • अध्ययन निष्पत्तीनिहाय विदयार्थ्यांचा प्रगती स्तर लक्षात घेऊन एक ते चार स्तर रचनेत (1) असे चिन्ह नोंदवावे.
अध्ययन निष्पत्ती साध्य नसलेले विदयार्थी स्तर एकमध्ये असतील.
• मूलभूत स्वरूपातील अध्ययन निष्पत्ती साध्य असलेले विदयार्थी स्तर दोनमध्ये असतील. निष्पत्ती साध्य असलेले विद्यार्थी स्तर तीनमध्ये
अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुरूप अपेक्षित अध्ययन असतील.
• अध्ययन निष्पत्तीची प्रभुत्व पातळी साध्य केलेले विद्यार्थी स्तर चारमध्ये असतील.
• या सर्व नोंदी करताना विद्यार्थ्यांना दिलेले वेगवेगळे अध्ययन अनुभव, आकारिक मूल्यमापनाएँ
उपयोगात आणलेली साधनतंत्रे व त्याला विदयार्थ्याने दिलेला प्रतिसाद लक्षात घेणे अपेक्षित आहे. तथापि विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाची खात्री झाल्यावरच स्तराची नोंद करावी.
• कुशाग्र अथवा अती कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांची नोंद विशेष प्रगती सदरात घेणे अपेक्षित
आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बलस्थानांची नोंददेखील विशेष प्रगती या रकान्यात घेण्यात यावी. आवश्यक सुधारणा यामध्ये कच्चे दुवे जेथे सुधारण्यास वाव आहे अशा बाबींच्या नोंदी घेण्यात याव्यात.
आवड /छंद (कला/क्रीडा/साहित्य) या रकान्यात विशेष आवडी अथवा छंद यांच्या नोंदी घेण्यात याव्यात.
व्यक्तिमत्त्व गुणविशेष यामध्ये व्यक्तिमत्त्वाच्या जाणवणाऱ्या विविध पैलूंच्या नोंदी, मूल्ये, जीवन कौशल्ये, गाभा घटक यांच्या अनुषंगाने घेण्यात याव्यात.
गुणात्मक नोंदी विभागामध्ये आकारिक व संकलित मूल्यमापन प्रक्रियेतील भारांश निश्चिती,
साधननिहाय मिळणारे गुण, संकलित गुण व प्राप्त श्रेणी या बाबींच्या नोंदी असतील. गुणात्मक नोंदींसाठी भारांश निश्चिती व मूल्यमापन साधननिहाय संपादणुकीच्या नोंदींचे प्रचलित पद्धतीप्रमाणे रकाने असतील. वैशिष्ट्यपूर्ण नोंदी या भागात पुढील चार महत्त्वपूर्ण नोंदींचा सामावेश असेल. या नोंदी विदयार्थ्यांच्या संपूर्ण सत्रातील शैक्षणिक प्रगतिदर्शक प्रतिसादावर आधारित असणे अपेक्षित आहे.
१) विशेष नोंदी
२) आवश्यक सुधारणा
३) छंद/आवड
४) व्यक्तिमत्त्व गुणविशेष
तता (इयत्ता सहावी)
संचयी नोंदपत्रक (Cumulative Record)
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009 मधील कलम ९ कलम 29 (h) आणि कलम 30 (2) यात निर्देश केल्यानुसार व महाराष्ट्र बालकाचा व सक्तीचा शिक्षण अधिकार अधिनियम २००९ राज्य नियमावली २०११ मधील २३ (ख) नुसार प्रत्येक शाळेत विदयाथ्यर्थ्यांसंदर्भात संचयी नोंदपत्रक
ठेवणे आवश्यक आहे. या नोंदींसाठी बौद्धिक, भावनिक, शारीरिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, अभिरुची यांसारख्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच या सर्व बाबी एकत्रित व समग्र स्वरूपात जतन करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी संबंधित मूलभूत बाबींचे संकलन संचयी नोंदपत्रकात असणार आहे. या नोंदपत्रकाची शिक्षक, पालक, पर्यवेक्षकीय यंत्रणा या सर्वांना विदयार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यास
मदत होणार आहे. हे नोंदपत्रक पुढील नमुन्यात ठेवावे.
विदयार्थी संचयी नोंदपत्रकाचे स्वरूप :
• संचयी नोंदपत्रक प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असावे.
• विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेतल्यावर संचयी नोंदपत्रकात वर्गशिक्षकाने त्याची वैयक्तिक व कौटुंबिक
माहिती भरावी. •
विषयात संपादित केलेली श्रेणी, उपस्थिती, आरोग्य विषयक माहिती, विशेष प्रगती, आवड-छंद, आवश्यक सुधारणा, व्यक्तिमत्त्व गुणविशेष या नोंदी कराव्यात.
• विदयार्थी लाभाच्या योजना, विशेष गरजा असणाऱ्या, वंचित-दुर्बल घटकातील मुलांसाठी पुरविलेल्या विशेष शासकीय योजनांचा लाभ नोंदवावा.
• प्राथमिक शिक्षण पूर्ण होण्याअगोदर विदयार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत स्थलांतर झाल्यास मूळ प्रत संबंधित शाळेकडे हस्तांतरित करावी.
• प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी हे नोंदपत्रक आधार असेल.
• या अभिलेखाची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.