मूल्यमापनाचे प्रकार व साधनतंत्रे learning outcomes

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

मूल्यमापनाचे प्रकार व साधनतंत्रे learning outcomes

 

अध्ययन निष्पत्ती :

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील साधनतंत्राच्या वापरातील बदल सांगतात. • शाळा आधारित मूल्यांकनाची संकल्पना व कार्यपद्धती स्पष्ट करतात.

• क्षमता आधारित मूल्यांकनाची संकल्पना व कार्यपद्धती स्पष्ट करतात.

• अध्ययन निष्पत्ती आधारित मूल्यमापन प्रक्रिया स्पष्ट करतात.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन :

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ देशात १ एप्रिल, २०१० पासून लागू करण्यात आला. कायदयातील कलम २९ प्रमाणे वर्गावर्गात ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सूचित केली आहे. वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ज्ञानरचनावादी असणार असेल, तर मूल्यमापन प्रक्रियेत बदल करणे अनिवार्य आहे ही बाब लक्षात घेऊन कलम २९ चे उपकलम २ प्रमाणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची (CCE) प्रक्रिया सूचित करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने २० ऑगस्ट, २०१० ला शासन निर्णय निर्गमित केला आहे. शासन नियमाप्रमाणे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीकरिता

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन निर्धारित केले आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात आकारिक व संकलित मूल्यमापनाचा समावेश करण्यात आला आहे. १) आकारिक मूल्यमापन : आकारिक मूल्यमापनासाठी एकूण ८ साधनांची निश्चिती करण्यात आली. प्रत्येक साधनामध्ये विविध तंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या तंत्राच्या आधारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या समग्र मूल्यमापनाचा विचार करण्यात आला आहे. निम्न प्राथमिक स्तरावर आकारिक मूल्यमापनावर अधिक भर दिला आहे. आकारिक मूल्यमापन प्रक्रिया ही लवचीक स्वरूपाची आहे. NCERT ने 2019 मध्ये मूल्यमापनाबाबत मार्गदर्शक सूचना व नवीन शिक्षण धोरण-२०२० नुसार शाळा

आधारित मूल्यमापन, अध्ययन निष्पत्ती व क्षमता आधारित मूल्यमापन यानुसार आकारिक मूल्यमापन

करणे आवश्यक आहे. आकारिक मूल्यमापनाची साधनतंत्रे ही केवळ मूल्यमापनाची साधनतंत्रे नाहीत, तर ती अध्ययन- अध्यापनाचीही तंत्रे आहेत. ही बाब लक्षात घेऊन वर्गात मूल्यमापनाची साधनतंत्रे निवडली गेली असतील, त्याचा पुन्हापुन्हा वापर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विद्याथ्यांचे शिकणे हे समग्र व सातत्याने होण्यासाठी निश्चित स्वरूपात मदत झाली आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक व भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व साकल्याने आकाराला येत आहे हे

नियमितपणे पडताळून पाहणे आवश्यक आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना ते आपल्या अपेक्षेप्रमाणे आणि अभ्यासक्रमाच्या उ‌द्दिष्टानुसार घडते आहे किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठीच आकारिक मूल्यमापनाचे महत्त्व आहे.

आजपर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामधील आठ साधनतंत्रांपैकी आपण आपापल्या विषयांच्या अनुषंगाने किमान ५ साधनतंत्राचा वापर करीत आलो आहोत. मात्र जेव्हा सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या अंमलबजावणी संदर्भात राज्यातील काही शिक्षकांशी चर्चा केली तेव्हा पुढील बाबी लक्षात आल्या

१) शिक्षक या साधनतंत्रांचा वापर करीत असताना काही निकष स्वतःच्या स्तरावर निश्चित करीत होते.

२) काही शिक्षकांना मात्र काही साधनांसाठी निकष लावताना अडचणी येत होत्या. ३) निकषांच्या आधारे दिलेल्या गुणांची कारणमीमांसा काही शिक्षकांना करता येत नव्हती म्हणजेच या

निकषासाठी गुणदान पद्धती सांगता येत नव्हती. ४) बहुतांश शिक्षकांनी सात साधनांपैकी पहिली पाच साधने वापरण्यास प्राधान्य दिले होते. इतर साधनांचा वापर करण्याकडे शिक्षकांचा कल दिसला नाही.

या सर्व बाबी लक्षात घेता, शिक्षकांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची साधने वापरण्याचे तंत्र अधिक

स्पष्ट होण्याची गरज आहे. यासाठी आपण पुढील तक्ता समजून घेऊ या.

कसे वापरावे

पदनिश्चयन श्रेणी रुब्रिक

पडताळा सूची

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची साधनतंत्रे

काम (प्रश्नोत्तरे, प्रकटवाचन, भाषण-संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत,

गटचर्चा इत्यादी)

अ.क्र.

१. दैनंदिन निरीक्षण

२. तोंडी

३. प्रात्यक्षिके /प्रयोग

४. उपक्रम/कृती (वैयक्तिक, गटात, स्वयं-अध्ययनाद्वारे)

५. प्रकल्प ६. चाचणी

लेखी : (वेळापत्रक जाहीर न करता अनौपचारिक स्वरूपात घ्यावयाची छोट्या कालावधीची

लेखी चाचणी/पुस्तकासह) (Open book test)

७. स्वाध्याय/वर्गकार्य (माहितीलेखन/वर्णनलेखन/निबंधलेखन/अह्वाललेखन/

कथालेखन/पत्रलेखन/संवादलेखन/कल्पनाविस्तार इत्यादी)

(संदर्भ – सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका, सप्टेंबर २०१०)

८. इतर साधने

प्रश्नावली, स्वयंमूल्यमापन, सहाध्यायी मूल्यमापन, गटकार्य

(संदर्भ – सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका, सप्टेंबर २०१०)

भाग ३ व ४)

विदयार्थी संचिका (संदर्भ – सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका,

उपरोक्त तक्त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की,

१) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे कोणतेही साधन प्रभावीपणे वापरण्यासाठी स्तंभ ३ मध्ये दिलेला तंत्रांपैकी कोणत्याही तंत्राचा मूल्यमापनाच्या उद्देशानुसार वापर करता येतो.

२) या तंत्रामुळे विदद्यार्थांच्या मूल्यमापनात अधिक स्पष्टता व वस्तुनिष्ठता येण्यास मदत होते. ३) विदद्यार्थी प्रगतीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे हे समजण्यास मदत होते, ज्यामुळे विदयाध्याला

पुढील प्रगती करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे सोपे होते. मूल्यमापनाच्या साधनतंत्रांचा समर्पक ताळमेळ साधण्यासाठी आपण मूल्यमापनाच्या तंत्रामधील फरक

समजून घेऊ या.

यापूर्वीच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन-शिक्षक मार्गदर्शिका भाग ३ व ४ मध्ये पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या तंत्राचा वापर केला आहे ते आपण सोदाहरण समजून घेणार आहोत. उदा.

पडताळा सूची :

पडताळा सूची या तंत्रात एखादी बाब उपलब्ध आहे किंवा नाही याचा पडताळा घेतला जातो.

विदद्याथ्यर्थ्यांनी एखादे कौशल्य प्राप्त केले आहे किंवा नाही, निश्चित केलेला निकष विद्यार्थ्यांमध्ये दिसतो आहे किंवा नाही याचा पडताळा घेण्याची सुविधा या तंत्रात असते. या तंत्राची मांडणी ही निकषांची शब्द, वाक्य स्वरूपातील यादी व त्यापुढे प्रतिसाद स्वरूपात होय/नाही हे पर्याय दिलेले असतात.

उदा.

निकष

प्रतिसाद

होय

नाही

दोन अक्षरी शब्दांचे वाचन करता येते,

जोडाक्षरांचे वाचन करता येते.

योग्य गतीने वाचन करतो.

पडताळा सूचीमध्ये दोन अत्यंत टोकाचे प्रतिसाद घेण्याची सुविधा असते. याठिकाणी शिक्षकांना निकषांची

योग्य निश्चिती व मांडणी करणे आवश्यक असते.

पदनिश्चयन श्रेणी :

पदनिश्चयन श्रेणी या तंत्राचा वापर करणे

पडताळा सूची या तंत्रात अगदी टोकाच्या दोन प्रतिसादांचा विचार केला जातो. मात्र याऐवजी एखादया शिक्षकाला विदद्यार्थ्यांचा प्रतिसाद दोन टोकाकडील प्रतिसादाऐवजी त्यामध्ये नेमका कोठे आहे हे समजून घ्यायचे असेल, विदद्यार्थ्याने एखादया निकषात कितपत प्रगती केली आहे याची निश्चिती करायची असल्यास

क्रमप्राप्त ठरते.

उपरोक्त तक्त्याचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की,

१) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे कोणतेही साधन प्रभावीपणे वापरण्यासाठी स्तंभ ३ मध्ये दिलेला तंत्रांपैकी कोणत्याही तंत्राचा मूल्यमापनाच्या उद्देशानुसार वापर करता येतो.

२) या तंत्रामुळे विदद्यार्थांच्या मूल्यमापनात अधिक स्पष्टता व वस्तुनिष्ठता येण्यास मदत होते. ३) विदद्यार्थी प्रगतीच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहे हे समजण्यास मदत होते, ज्यामुळे विदयाध्याला

पुढील प्रगती करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे सोपे होते. मूल्यमापनाच्या साधनतंत्रांचा समर्पक ताळमेळ साधण्यासाठी आपण मूल्यमापनाच्या तंत्रामधील फरक

समजून घेऊ या.

यापूर्वीच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन-शिक्षक मार्गदर्शिका भाग ३ व ४ मध्ये पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी देण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या तंत्राचा वापर केला आहे ते आपण सोदाहरण समजून घेणार आहोत. उदा.

पडताळा सूची :

पडताळा सूची या तंत्रात एखादी बाब उपलब्ध आहे किंवा नाही याचा पडताळा घेतला जातो.

विदद्याथ्यर्थ्यांनी एखादे कौशल्य प्राप्त केले आहे किंवा नाही, निश्चित केलेला निकष विद्यार्थ्यांमध्ये दिसतो आहे किंवा नाही याचा पडताळा घेण्याची सुविधा या तंत्रात असते. या तंत्राची मांडणी ही निकषांची शब्द, वाक्य स्वरूपातील यादी व त्यापुढे प्रतिसाद स्वरूपात होय/नाही हे पर्याय दिलेले असतात.

उदा.

निकष

प्रतिसाद

होय

नाही

दोन अक्षरी शब्दांचे वाचन करता येते,

जोडाक्षरांचे वाचन करता येते.

योग्य गतीने वाचन करतो.

पडताळा सूचीमध्ये दोन अत्यंत टोकाचे प्रतिसाद घेण्याची सुविधा असते. याठिकाणी शिक्षकांना निकषांची

योग्य निश्चिती व मांडणी करणे आवश्यक असते.

पदनिश्चयन श्रेणी :

पदनिश्चयन श्रेणी या तंत्राचा वापर करणे

पडताळा सूची या तंत्रात अगदी टोकाच्या दोन प्रतिसादांचा विचार केला जातो. मात्र याऐवजी एखादया शिक्षकाला विदद्यार्थ्यांचा प्रतिसाद दोन टोकाकडील प्रतिसादाऐवजी त्यामध्ये नेमका कोठे आहे हे समजून घ्यायचे असेल, विदद्यार्थ्याने एखादया निकषात कितपत प्रगती केली आहे याची निश्चिती करायची असल्यास

पदनिश्चयन श्रेणी: संकल्पना

पद म्हणजे पाऊल, निश्चयन म्हणजे निश्चित करणे, श्रेणी म्हणजे स्तर म्हणजेच एखादा विद्यार्थी

प्रगतीच्या कोणत्या स्तरावर आहे हे निश्चित करणे होय. पदनिश्चयन या तंत्रामध्ये निकषांच्या आधारे काही ठरावीक स्तर निश्चित केले जातात. या निकषांच्या स्वरूपानुसार प्रगतीचे स्तर गुण/शब्द/विधान स्वरूपात मांडणी करता येते. विद्यार्थ्यांचे पुरेसे निरीक्षण करून त्यांच्या प्रगतीचा स्तर निश्चित करणे आवश्यक असते. शिक्षक वर्गात विषयातील घटकांच्या अध्ययनाकरिता विविध कृती/उपक्रम/प्रकल्प/गटचर्चा राबवीत असतात. या दरम्यान विदयार्थ्यांनी परस्परांशी त्या घटकांच्या अंगाने चर्चा करणे, आपले मत विश्वासपूर्वक मांडणे, इतरांच्या मतांचा स्वीकार करणे, चर्चेत सक्रिय भाग घेणे अपेक्षित असते. विद्यार्थ्याने गटचर्चेत / कृतीत कितपत भाग घेतला याचे मूल्यमापन करावयाचे असल्यास त्या विद्यार्थ्यांचा चर्चेत भाग घेण्याच्या बाबतीतील दर्जा पुढीलप्रमाणे ठरविता येईल.

पदनिश्चयन श्रेणी ही तीन, चार, पाच किंवा सात स्तरानुसार असू शकते या स्तराला बिंदू असे देखील

म्हणतात.

पदनिश्चयन श्रेणीचे प्रकार :

१) अंकात्मक पदनिश्चयन श्रेणी :

निश्चित केलेल्या निकषासंदर्भात ज्या प्रमाणात निरीक्षण होत आहे, त्या प्रमाणात या श्रेणीद्वारे नोंद करता येते. अंकात्मक क्रमांकांना निकषांचा स्तर दर्शविण्यासाठी शाब्दिक वर्णनाऐवजी अंक दिले जातात. उदा. पाच बिंदू पदनिश्चयन श्रेणीमध्ये निम्नप्रतीच्या स्तराचा क्रमांक एक व उच्च प्रतीच्या स्तराचा क्रमांक पाच असतो. मधले दोन, तीन व चार क्रमांक निकषांच्या प्रमाणात असतात आणि तीन हा क्रमांक सरासरी किंवा मध्यम प्रमाणाच्या निकषांचा असतो.

निकषाचे विधान

विदयार्थी इंग्रजी वाक्यांचे अचूक वाचन करतो.

निकषाच्या विधानासमोर अंक लिहिलेले असल्यामुळे प्रतिसाद देणाऱ्यास त्या विधानाच्या समोर व अंकांच्या खाली (✔) अशी खूण करण्यास सांगितले जाते. निकषाचे स्तर दर्शक अंकांना गुणात्मक किंवा गुणांचे प्रमाण दिल्यास मूल्यमापन साधनाच्या संदर्भातील निकषांचे गुण एकत्र करता येतात.

२) आरेखित पदनिश्चयन श्रेणी :

आरेखित पदनिश्चयन श्रेणीचे प्रमुख लक्षण म्हणजे अंकांऐवजी मूल्यमापनाच्या निकषासंदभनि स्तर शाब्दिक स्वरूपात दर्शविलेले असतात. मूल्यमापनाच्या निकषासंदर्भाने स्तर शाब्दिक स्थान निश्चित

पदनिश्चयन श्रेणी तयार करताना व वापरताना घ्यावयाची काळजी

१) विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांमध्ये कोणताही पूर्वग्रह असू नये. २) पुरेशा प्रमाणात निरीक्षण करूनच पदनिश्चयन श्रेणी भरावी.

३) ज्या गुणांची/निकषांची श्रेणी ठरवायची आहे. त्या गुणांचा निश्चित अर्थ निरीक्षक/शिक्षकाला समजला पाहिजे.

४) ज्या गुणांची/निकषांची श्रेणी ठरवायची आहे. त्या संदर्भात चढत्याक्रमाने आवश्यकतेनुसार स्तर/बिंदू मध्ये शाब्दिक स्वरूपात/विधाने निश्चित करता येणे आवश्यक आहे.

होय. रुब्रिक्स हे असे मूल्यांकनाचे साधन आहे जे स्पष्टपणे लिखित, मौखिक व दृश्य अशा कामाच्या सर्व घटकांमधील उपलब्धतेचे निकष स्पष्टपणे विधान स्वरूपात सूचित करते.

रुब्रिक्सचे महत्त्व, गरज आणि आवश्यकता :

रुब्रिक्समध्ये लवचिकता व सुधारणेला वाव आहे. रुब्रिक्समुळे विदयार्थी प्रगतीच्या स्तरावर कुठे आहे ते समजते. रुब्रिक्सद्वारा प्रत्याभरण देता येते. अध्ययन-अध्यापन पद्धती सुधारता येते.

१) आकारिक मूल्यमापन यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनतंत्राच्या सुलभ व शास्त्रीय वापरासाठी रुब्रिक्सची निर्मिती करावी. रुब्रिक्स हे निरीक्षण असून ते पुराव्यावर आधारित असते.

२ ) रुब्रिक्स द्वारा मापन करावयाचे उ‌द्दिष्ट हे स्पष्ट असावे.

३) जेव्हा रुब्रिक्स हे स्वयं-मूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन यासाठी वापरले जाणार असेल तेव्हा रुब्रिक्स हे विद्यार्थ्यांना आकलन होण्यास सोपे असावे.

उदाहरणार्थ..

इयत्ता – पाचवी, विषय – विज्ञान

घटक – सूर्यमाला

अध्ययन निष्पत्ती : निरीक्षणे, अनुभव, माहिती सुनियोजित पद्धतीने नोंद करतो.

उपरोक्त अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी शिक्षकाने वर्गात उपक्रमाच्या माध्यमातून भित्तिपत्रक तयार करून त्याचे सादरीकरण करण्याचा पुरेसा अध्ययन अनुभव दिल्यांनतर पुढील मूल्यमापन साधनतंत्र वापरू शकतात.

सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन : शिक्षक मार्गदर्शिका (भाग-५): (४७)

रुब्रिक्स :

रुब्रिक्स म्हणजे काय?

विशिष्ट कार्यानुसार विदद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी निकषांचा वर्णनात्मक संच म्हणजे रुबिक्स

Leave a Comment