अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन काय आहे ? learning outcomes (Management of Learning Intervention)

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन काय आहे ? learning outcomes (Management of Learning Intervention)

 

जगातील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभाग कार्यरत आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळा व वर्ग विकसित होणे गरजेचे आहे. भविष्यवेधी शिक्षणाचे चार आयाम आहेत. या चार आयामांची पूर्तता करणाऱ्या शिक्षण प्रक्रियेला जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण म्हणता येईल.

१) जागतिक दर्जाची स्वीकार्यता असेल असे मूल विकसित करणे :

एक व्यक्ती म्हणून सर्व जगाने बालकाला स्वीकारावे. असे करताना त्याला जात, धर्म, पंथ, भाषा, देश, संस्कृती या मर्यादा न ठरता जमेच्या बाजू ठराव्यात. स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान बाळगत इतरांना

स्वीकारण्याची क्षमता विकसित होते.

जागतिक स्वीकार्यता असणारे मूल विकसित करणे हे एकविसाव्या शतकातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. एकविसाव्या शतकात उत्तमप्रकारे आयुष्य जगायचे असेल तर जागतिक स्वीकार्यता महत्त्वाची आहे. संपूर्ण विश्व घराप्रमाणे जवळ येत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये म्हणून ठेवले आहे ‘हे विश्वची माझे घर.’ तंत्रज्ञान विकसनामुळे हा विचार प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. अशा वेळेस ‘लोकल टू ग्लोबल’ विचार करणारी मुले विकसित करणे हेच आपले उ‌द्दिष्ट आहे. वैश्विक विचार करणे आवश्यक का आहे? यावर विचार होणे गरजेचे आहे. काही समस्या अशा आहेत की, ज्याची उत्तरे जागतिक स्वीकार्यता असणारी व विचार करणारी पिढीच सोडवू शकते.

• वातावरण बदल : जागतिक तापमान वाढ ही एक जागतिक समस्या आहे सदर समस्या सोडविण्यासाठी फक्त स्थानिक विचार पुरेसा ठरणार नाही. केवळ राज्य व देशापुरता विचार करून ही समस्या सुटणार नाही. जागतिक पातळीवरील स्वीकार्यता असणारी मुलेच या प्रश्नाची सोडवणूक करतील.

• आतंकवाद : कुठलाही एक देश ही समस्या सोडवू शकणार नाही. जागतिक शांततेचा विचार या समस्येचे उत्तर असेल. यासाठी सुद्धा जागतिक स्वीकार्यता आवश्यक आहे.

• तंत्रज्ञान : तंत्रज्ञानामुळे जशा संधी निर्माण झाल्या आहेत तशाच समस्या पण निर्माण झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या समस्या जागतिक स्वरूपाच्या आहेत. या समस्यांची सोडवणूक जागतिक पातळीवर होऊ शकते.

• आपत्ती : आपत्तीच्या काळात टाळेबंदी केली जाते. उदा. कोरोना काळात ती केली गेली, परंतु त्या काळात संपूर्ण जग जवळ आले होते. अशा संकटांना सामोरे जाताना जागतिक स्वरूपात पुढे जाणे गरजेचे असते. त्यामुळे जगाने एखादा विचार आपत्ती काळात स्वीकारावा असे वाटत असेल, तर जागतिक विचार करणारे व जागतिक स्वीकार्यता असणारे मूल विकसित करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आपल्याला जागतिक विचार करणारे व जागतिक स्वीकार्यता असणारे मूल विकसित करणे क्रमप्राप्त आहे.

जागतिक स्वीकार्यता म्हणजे काय आणि ती कशी येईल? प्रत्येक व्यक्तीला आपणास सर्वांनी स्वीकारावे

अशी अपेक्षा असते. स्वीकार्यता ही घरातून किंवा आपल्या व्यक्तीपासून सुरू होते. आपले विचार विस्तृत असतील, आपण इतरांना स्वीकारत असू तर आपली स्वीकार्यता वाढेल. स्वतःची स्वीकार्यता केल्यास अधिक स्वीकार्यता वाढते. इतर स्वीकार याचा अर्थ आपल्या संस्कृती, भाषा, धर्म, प्रांत यासह इतरांच्याही संस्कृती, भाषा, धर्म यांचा आदर करणे. उदा. स्वामी विवेकानंद यांनी स्वतःच्या धर्म आणि संस्कृतीचा आदर करीत असतानाच इतर धर्म आणि संस्कृतींचाही आदर केला. त्यामुळे स्वामी विवेकानंद फक्त विशिष्ट धर्मापुरते मर्यादित न राहता सर्व विश्वाने त्यांना स्वीकारले. विविध भाषा मुलांनी शिकायला हव्यात. त्यामुळे इतर भाषिकांमध्ये स्वीकार्यता वाढते. इतर धर्म, संस्कृती समजून घेतल्याने इतरांमध्ये आपली स्वीकार्यता वाढण्यास मदत

होते.

२) भविष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्त्व तयार करणे : जगाच्या बदलाची गती प्रचंड आहे. त्या बदलाच्या गतीशी जुळवून घेतल्यास व्यक्ती उपयोगी ठरेल. कायम

उपयोगी राहणे म्हणजे कायम सक्षम राहणे होय. कायम सक्षम राहायचे असेल तर कायम शिकत रहावे लागेल. कायम शिकत राहायचे असेल तर सतत शिकता आले पाहिजे. त्यामुळे शाळांनी ‘learning to learn’ यावर काम

करून मुलांनी शिकायचे कसे ? हे अवगत करायला हवे. त्यासाठी मुलांची अध्ययन कौशल्ये (learning skills) विकसित व्हायला हवीत.

भविष्य काय असेल हे कधीच कोणी सांगू शकले नाही, मात्र आमचे शिक्षण हे मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आहे हे सांगायचे कोणीच विसरले नाही. जर भविष्य माहीत नसेल तर भविष्य घडणार कसे? आणि घडविणारा घडविणार कसे? या प्रश्नांची उत्तरे मात्र शोधावी लागतील.

जगाच्या बदलाची गती : पूर्वी एखादया क्षेत्रात बदल घडण्यास खूप जास्त कालावधी लागत होता. एका

पिढीचा व्यवसाय पुढे अनेक पिढ्या करू शकत होते. तो व्यवसाय किंवा त्यासाठीची कौशल्ये लवकर बदलत नसत.

परंतु आता व्यवसाय किंवा त्यासाठीची आवश्यक कौशल्ये वेगाने बदलत आहेत. फक्त कौशल्ये बदलत आहेत असेच नाही, तर त्यासाठी लागणारी तंत्रे, माहिती आणि व्यवस्थापन पण बदलत आहे. जगात असणारी माहिती दुप्पट होण्याचा कालावधी हजारो वर्षांचा होता तो आता अल्पावधीवर आला आहे. जग झपाट्याने बदलत आहे.

उपयोगी आणि अनुपयोगी : जगविख्यात तत्त्ववेत्ता युवल नोवा हरारी यांनी आपल्या एकविसाव्या शतकासाठी २१ धडे व Homodeus या पुस्तकात ही संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मते औदयोगिक क्रांती झाली तेव्हा दोन वर्ग अस्तित्वात आले. (१) कामगार, (२) भांडवलदार, युवल यांच्या मते संगणक क्रांती जेव्हा परमोच्चस्थानी असेल तेव्हा नव्याने दोन वर्ग अस्तिवात येतील. (१) उपयोगी (२) अनुपयोगी

उपयोगी : जो कामाचा आहे त्याच्यामध्ये कामासाठीची आवश्यक कौशल्ये अवगत आहेत असा. अनुपयोगी : जो कामाचा नाही त्याच्यामध्ये कामासाठीची आवश्यक कौशल्ये अवगत नाहीत असा.

जेव्हा संगणक क्रांती परमोच्चस्थानी असेल, तेव्हा सध्या जी कौशल्ये अस्तित्वात आहेत ती अनुपयोगी झालेली असतील. उदा. आपण जर शेतीचे उदाहरण घेतले तर शेतीची मशागत करताना सर्वांत आधी शेतीची

नांगरणी करतो. पंधरा वर्षांपूर्वी नांगरणी करण्यासाठी बैलांचा नांगर वापरत होते. एक एकर शेत नांगरायला

बैलांचा नांगर वापरल्यास दोन दिवसांचा कालावधी व आठ माणसे लागत असत. (तीन आगुल हाणण्यासाठी व एक नांगर धरण्यासाठी असे एक दिवसासाठी चार व दोन दिवसासाठी आठ) चार बैलांचा नांगर असेल तर दोन दिवसांचा कालावधी व सहा माणसे लागत. सध्या होणाऱ्या शेत नांगरणीचा विचार केला तर एक एकर शेत नांगरणीला एक ते दोन तास लागतात व एकच माणूस (ट्रॅक्टर ड्रायव्हर) ते काम करतो. मग आता त्या आठ माणसांचे काय झाले असेल? जे पूर्वी नांगरणी करायचे? त्यांना कोणी कामाला या असे सांगायला येत असतील का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. युवल नोवा हरारी यांच्या भाषेत ते नांगरणी या कौशल्याच्या बाबतीत अनुपयोगी झाले आहेत. सध्या ट्रॅक्टरचा ड्रायव्हर उपयोगी आहे. पुढील पंधरा वर्षांत शेत नांगरणीच्या क्षेत्रात काय बदल होईल असे वाटते? शक्यता आहे की, शेत नांगरणी करायला ड्रायव्हर लागणार नाही. कदाचित रिमोटवर चालणारा ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरचा मालक घरीच बसून ट्रॅक्टर चालवेल. एका वेळेस अनेक ट्रॅक्टर चालतील आणि शे-पाचशे एकर जमीन नांगरून येतील. सध्या असणारा ट्रॅक्टर ड्रायव्हर उदया अनुपयोगी झालेला असेल. भविष्य

कसे असेल? : २०३०-२०४० मध्ये भविष्य काय असेल? हे कुणालाही माहीत नाही. त्यामुळे भविष्यासाठी तयार होता येणार नाही. भविष्य काय असेल? हे कुणालाही सांगता येणार नाही. परंतु भविष्याचा दोन तीन वर्षाचा अंदाज मात्र घेता येतो. जग झपाट्याने बदलत आहे. बदलत्या प्रवाहात बदलत्या काळाचा अंदाज घेऊन स्वतःला बदलत राहावे लागणार आहे. बदलत्या काळात स्वतःला बदलवत ठेवणे याला अद्ययावत होणे ही परिभाषा आहे. आपल्याला आपले भविष्य घडवायचे असेल तर कायम अदद्ययावत रहावे लागणार आहे. कायम अद्ययावत रहायचे असेल तर त्यासाठी कायम शिकावे लागणार आहे. फक्त शाळा, कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले म्हणजे आपण अद्ययावत असू अशा भ्रमात राहता येणार नाही. आपल्याला कायम शिकत रहावे लागणार आहे, त्यासाठी शिकता येणे फार महत्त्वाचे आहे. कोणीतरी शिकविणारा असल्यावरच मी शिकेन या परंपरागत प्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल. यासाठी मुलांना शालेय जीवनातच शिकायचे कसे? हे कौशल्य शिकवावे लागेल. युनेस्कोने सांगितल्याप्रमाणे शिक्षण म्हणजे ‘learning to learn’. कायम शिकत राहणे म्हणजेच कायम अद्ययावत होणे. भविष्याच्या अंदाज घेऊन सतत शिकत राहणारी, स्वतःला कायम अद्ययावत ठेवणारी मुले हीच भविष्यासाठी तयार झालेली मुले असतील.

३) १०० टक्के मुलांच्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग करणे :

हावर्ड गार्डनर यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीमध्ये १० प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. आपल्या शाळेमध्ये केवळ दोन बुद्धिमत्तांवर विशेष भर दिला जातो. त्या म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता आणि तार्किक बुद्धिमत्ता; परंतु या पलीकडे वेगवेगळ्या बु‌द्धिमत्ता असणारी मुले असतात ज्यांच्यावर अन्याय होतो. आपल्याला असे शिक्षण देणारी प्रक्रिया हवी ज्यामध्ये १०० टक्के मुलांच्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग होईल.

आपल्याला काय वाटते?

प्रचलित शिक्षण व्यवस्था मुलांचा १०० टक्के क्षमतांचा १०० टक्के उपयोग करून घेत आहे का? उपयोग करून घेऊ शकते का? उपयोग करून घेऊ शकत असेल तर तो कसा?

बुद्धिमत्ता विकसन : हावर्ड गार्डनर यांनी १० बुद्धिमत्ता संदर्भातील सिद्धांत मांडला आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये १० प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. त्यातील काही बुद्धिमत्ता विशेष तर काही सामान्य असतात. प्रत्येक मुलाच्या विशेष बुद्धिमत्तेचा आदर करून त्याला संधी दिल्यास त्याची विशेष बुद्धिमत्ता विकसित होतेच;

पण इतर सामान्य बुद्धिमत्तादेखील विकसित व्हायला मदत होते. उदा., एखादया मुलाची सांगीतिक बुद्धिमत्ता

विशेष असेल तर त्या बुद्धिमत्तेपासून सुरुवात करीत त्याची तार्किक बुद्धिमत्ता सामान्य असेल तर सांगीतिक बुदायम सचेत उपया तया बुराधाणत विषयाकडे जाऊन त्याची सामान्य असणारी तार्किक बुद्धिमत्ता विकसित करता येते. उदा. १ ते १० अंक शिकण्यासाठी अंकांचे गाणे मुलांकडून म्हणवून घेणे. वरील प्रमाणे प्रत्येक मुलाच्या विशेष बुद्धिमत्ता ओळखून त्या बुद्धिमत्तेच्या मदतीने इतर सामान्य बुद्धिमत्ता विकसित करणे. सोबतच मुलाच्या विशेष बुद्धिमत्तेची तुलना त्या क्षेत्रातील विशेष बुद्धिमत्ता असणाऱ्या विशेष लोकांशी

करून विशेष बुद्धिमत्ता अधिक विकसित करण्याच्या संधी देणे.

वेळेचा उपयोग : वेळ अमूल्य आहे. विदयार्थिदशेतच नव्हे तर आयुष्यभर सतत शिकत राहणे आवश्यक आहे. जीवन सत्कर्मी लागणे याचा अर्थ सतत शिकत राहणे, बऱ्याचदा असे लक्षात येते की, मुले थोडा वेळ झाला की अभ्यासाला कंटाळतात. कंटाळा करण्याच्या कारणांचा शोध घेतला तर असे लक्षात येते की, मुलांना केवळ अभ्यास आवडत नाही. कोणत्याही एका कामात त्यांचे जास्त वेळ मन लागत नाही. परंतु काही विशेष प्रयोगशील शाळेची मुले सतत न थकता, न थांबता शिकत राहतात. याचे कारण स्वतः शिकण्यातील आनंद ते अनुभवत आहेत. त्यामुळे थकवा किंवा कंटाळा न येता ती मुले केव्हाही शिकण्यास तयार असतात. आपली मुले पूर्ण वेळ आनंदात शिकत राहावी म्हणजे त्यांच्या १०० टक्के क्षमतांचा उपयोग होईल.

४) ‘PISA ready’ मूल तयार करणे : आपल्याला एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाणारी मुले तयार करायची आहेत. यासाठी

एकविसाव्या शतकात अनिवार्य असणारी कौशल्ये अवगत असणारी मुले हवी आहेत. PISA परीक्षा एकविसाव्या

शतकातील कौशल्ये मुलांमध्ये विकसित झाली आहेत का? हे पाहण्याचे काम करते. चिकित्सक विचार (Critical thinking), सर्जनशीलता (Creative thinking), सहयोग (Collaboration), संवाद (Communication), आत्मविश्वास (Confidence), करुणा (Compassion) हे 6-C मुलांमध्ये विकसित करण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे.

PISA – Programme for International Student Assessment – OECD या श्रीमंत देशांच्या संघटनेमार्फत PISA परीक्षा घेतली जाते. इयत्ता नववीत शिकणारे विदयार्थी सदर परीक्षा देत असतात. सन २००० पासून PISA परीक्षा सुरू झाली असून २००९ साली भारत देश यामध्ये सहभागी झाला होता. PISA परीक्षा शिक्षणाचा दर्जा ठरविण्याचे सर्वांत उपयुक्त असे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानक मानले जाते.

जगातील सहभागी देशांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा तुलनात्मक दर्जा ठरविण्याचे काम PISA करते. PISA फक्त परीक्षा नसून शैक्षणिक यंत्रणेकडून एकविसाव्या शतकातील अपेक्षा समजून घेण्याचे माध्यम आहे. PISA मध्ये मुलांकडून एकविसाव्या शतकातील अपेक्षित कौशल्यांची पडताळणी केली जाते. PISA फक्त परीक्षा घेत नाही, तर एकविसाव्या शतकातील शिक्षण कसे असावे यासाठी मार्गदर्शन करीत असते. 6-C असणारी मुले : आपल्याला PISA साठी मुले तयार करायची हे आपले उद्दिष्ट आहे. यासाठी आपण काम करणे अपेक्षित आहे.

वरील चारही आयामांची पूर्तता करण्यासाठी मुलांसमवेत वर्ग आणि शाळा पातळीवर काम करण्याची गरज आहे. शाळा हे भविष्यवेधी शिक्षण देणारे जागतिक दर्जाचे केंद्र तयार व्हायचे असेल तर क्रमिक विचार करण्याची आवश्यकता

आहे. अशा जागतिक दर्जाचे शिक्षण देणाऱ्या शाळा विकसित करायच्या असतील तर खालील बाबींचा विचार करावा लागेल. १) विकासाचे चार टप्पे कोणतेही मोठे काम शक्य करायचे असेल तर त्या कामाला छोट्या छोट्या कामात

विभाजित करावे लागते. त्याचे विभाजन झाले की, त्या कामांच्या टप्प्यांना क्रमाने लावायचे. तो क्रम खालीलप्रमाणे असावा.

अ) स्व-पातळी : अशा कामापासून सुरुवात करावी की जेणेकरून इतरांची मदत लागणार नाही. स्वतः च्या पातळीवरील कामापासून सुरुवात केली की, बाहेरील अडचण येत नाही. एकदा यश मिळायला लागले की पुढे जाता येते.

ब) स्व+समाज : स्व-पातळी पूर्ण झाली की, पुढची पातळी आहे समाज. अशी कामे जे करण्यासाठी समाजाची आवश्यकता असते.

क) स्व+समाज+भौतिक सुविधा: समाज सोबत असेल तर, तिसरा टप्पा सहज होतो. समाजाने ठरविले की, अपेक्षेपेक्षा जास्त भौतिक बाबी उपलब्ध होतात. त्यामुळे अवघड वाटणारा टप्पाही सहज पूर्ण होतो.

ड) स्व+समाज+भौतिक सुविधा+प्रशासन : वरील तीन टप्पे पूर्ण केले की, शासन सोबतीला येते, किंबहुना ते प्रत्येक पातळीवर सोबत असतेच, परंतु वरील तीन टप्पे पूर्ण केले की प्रशासन अधिक प्रभावीपणे सोबत येते.

यशस्वी व्यक्ती एक ते चार अशा क्रमाने विचार करते, तर इतरांवर बोट ठेवणारी व्यक्ती चार ते एक असा विचार करते. तिच्यामते आधी शासनाने ठरवावे, मग भौतिक सुविधा दयाव्या, त्यानंतर समाज सोबत यावा, मग मी काम करेल. जागतिक दर्जाचे शिक्षण देणारी शाळा विकसित करायची असेल, तर विकासाचे वरील चार टप्पे लक्षात घ्यावे लागतील.

मुलांच्या शिकण्याच्या पातळीवर विचार केला तर प्रत्येक मूल वेगळे आहे. त्याची शिकण्याची गती वेगळी आहे. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती वाढवणे हे भविष्यवेधी शिक्षण आहे. त्यासाठी वेगवेगळी गती असणाऱ्या मुलांचा विचार करून अध्ययन अनुभव व चिंतन आणि मननाचे नियोजन अपेक्षित आहे. त्यासाठी मुलांच्या शिकण्याच्या तीन पातळ्या लक्षात घ्याव्या लागतील. २)

अध्ययन गती पातळी :

अ) ASER पातळी : ज्या मुलांची अध्ययन गती कमी आहे. ज्यांना मूलभूत क्षमता प्राप्त नाहीत अशा मुलांसाठी काय करावे लागेल? आणि कसे करावे लागेल? यासाठी नियोजन करणे. तसेच या पातळीवरील मुलांच्या काय गरजा असतात? हे समजून घेणे.

ब) NAS पातळी : मध्यम गतीने शिकणारी मुले. ज्या मुलांनी मूलभूत क्षमता प्राप्त केल्या आहेत आणि वर्ग पातळीवरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त करत आहेत. अशा मुलांसाठी काय करावे लागेल? आणि कसे करावे लागेल? यासाठी नियोजन करणे. तसेच या पातळीवरील मुलांच्या काय गरजा असतात ? हे समजून घेणे.

88

8

क) PISA पातळी : जास्त गतीने शिकणारी मुले. ज्या मुलांनी अध्ययन निष्पत्ती पूर्ण केल्या आहेत आणि त्यांना अधिक बौद‌धिक खादद्याची गरज आहे. अशा मुलांसाठी काय करावे लागेल? आणि कसे करावे लागेल? यासाठी नियोजन करणे, तसेच या पातळी वरील मुलांच्या काय गरजा असतात ? हे समजून

घेणे,

अध्ययन गती लक्षात घेऊन मुलांची एकेमकांना मदत उपलब्ध करून दिल्यास शिकण्यास पूरक वातावरण तयार होते. प्रत्येक मूल अधिक गतीने शिकायचे झाल्यास शाळा पातळीवर तशी संस्कृती विकसित करावी लागेल. त्यासाठी ‘एकूण सतरा बाबी’ कराव्या लागणार आहेत. त्यामधील ‘सहा बाबी’ या स्व-पातळीवरील आहेत. ‘भविष्यवेधी शिक्षण विचार’ च्या सहा पायऱ्यांचा उपयोग केल्यास प्रत्येक मुलाच्या शिकण्याची गती वाढते. एखादया मुलाला मूलभूत क्षमता विकसित करायच्या असोत अथवा एखादया मुलाचे 6-C विकसित करायचे असो,

प्रत्येक बाब शिकताना या सहा पायऱ्यांचा उपयोग मुलांना होणार आहे. मुलांच्या शिकण्याची गती वाढवायची असेल

तर शिक्षक या सहा पायऱ्यांचा उपयोग करू शकतात.

३ ) भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या :

१) मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.

२) मुलांना शिकण्यास आव्हान देणे.

3) Learning intervention (Peer learning, गट अध्ययन, विषयमित्र)

४) मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे.

५) मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.

६) मुलांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे.

वरील सहा पायऱ्या उपयोगात आणल्या की, तीन महिन्यात मुलांना वरील बाबींची सवय होऊन तसे वातावरण तयार होते. एकदा असे वातावरण तयार झाले की मुलांचे अध्ययन कौशल्य विकसित होतात. मुले स्वतः शिकायला लागतात. मुलांच्या शिकण्याची गती वाढते. याचा परिणाम ‘शिक्षकाचे काम अर्ध्यावर येते, परिणाम दुप्पट मिळतो आणि आनंद तिप्पट मिळतो.’

‘आता शिक्षकाची भूमिका मुलांना केवळ माहिती दयायची नाही, अथवा पारंपरिक पद्धतीने अध्यापन करावयाचे नाही तर प्रत्येक मूल शिकावे यासाठी नियोजन, व्यवस्थापन आणि मुलांच्या शिकण्याचे नेतृत्व करणे ही आहे.’

***

Leave a Comment