सहाध्यायी अध्ययन म्हणजे सहाध्यायी सोबत शिकणे learning outcomes

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सहाध्यायी अध्ययन म्हणजे सहाध्यायी सोबत शिकणे learning outcomes

 

Learning outcomes Learning Interventions Peer Learning Group Learning विषय मित्र

भविष्यवेधी शिक्षण विचारातील Learning intervention एक महत्त्वपूर्ण बाब आहे. जीवन हे सहचर्य आहे, प्रत्येक बाब परस्परपूरक आहे. शिकण्याची प्रक्रिया जरी स्व-स्तरावरील असली तरी शिकणे मात्र अवतीभोवतीच्या अनुभवातून होत असते. व्यक्ती म्हणून जेव्हा एकट्याने शिकण्याची प्रक्रिया होत असते, तेव्हा ती एकांगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात त्यातही इतर लोक अप्रत्यक्षपणे सहभागी असतातच. सोबतच्या शिकणाऱ्या व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग शिकण्याच्या प्रक्रियेत करून घेतल्यास शिकणाऱ्याची गती वाढण्यास मदत होते. अध्ययन प्रक्रिया गतिमान होण्यासोबतच आनंदी होऊन विदयार्थ्यामध्ये उत्साह निर्माण होतो. मुले प्रौढांकडून जे शिकतात 7 त्याहून कदाचित जास्त चांगले सहाध्यायी मित्रांकडून शिकतात. परंपरागत वर्गात शिक्षकांकडून शिकण्याच्या पद्धतीपेक्षा सहाध्यायी समूह किंवा विषय मित्रासोबत केलेल्या Learning intervention मुळे जास्त प्रमाणात आणि कसदार शिक्षण मिळते.

सहाध्यायी अध्ययन – (Peer learning) Peer मध्ये शिकणे म्हणजे सहाध्यायी सोबत शिकणे. Peer चा

परंपरागत विचार केल्यास दोघांच्या जोडीतील एका हुशार मुलाने दुसऱ्या अध्ययन गती कमी असणाऱ्या विदद्यार्थ्याला शिकविणे. बऱ्याचदा शाळेत केलेल्या जोड्या अशा पद्धतीने केलेल्या असतात. त्यात एकाची भूमिका शिकण्याची, तर दुसऱ्याची शिकविण्याची असते. केवळ याच उद्देशाने केलेल्या जोड्या फार काळ परिणाम देत नाहीत असे लक्षात आले आहे. अशा जोडीला Peer नाही तर, Pair म्हणावे लागेल. Pair म्हणजे दोघांची जोडी, फक्त जोडी. Peer म्हणजे अध्ययनास परस्परपूरक जोडीदार, परस्पर पूरक याचा अर्थ दोघांच्या भूमिका परस्परांना पूरक आहेत. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ नसून दोघांच्या भूमिका समतुल्य आहेत एकमेकांच्या गरजेनुरूप त्या भूमिका बदलत जातात. भूमिकेत झालेला बदल हा सहज आणि स्वीकार्य असतो.

मुले एकमेकांच्या मदतीने खूप छान शिकतात. नैसर्गिकरीत्या विचार केल्यास मुलांना ते सहज जमते. आपल्या आवडीनुसार व हव्या त्या वेळी शिकण्याची संधी Peer learning मुळे उपलब्ध होते. Peer learning च्या आपल्या गरजेनुरूप जोड्या करता येतात. उदा., वर्गातील मुलांची जोडी, शाळेतील मुलांची जोडी, गरजेनुरूप जोडी. वरील तिन्ही प्रकारच्या जोड्या करताना त्यातील पोटप्रकार पण लक्षात घेणे गरजेचे आहे. (अ) दोन हुशार मुलांची जोडी (PISA पातळी) (ब) मध्यम मुलांची जोडी. (NAS पातळी) (क) कमी गतीने शिकणाऱ्या मुलांची जोडी. (ASER पातळी) (ड) हुशार मध्यम मुलांची जोडी. (PISA-NAS पातळी) (इ) मध्यम-गती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची जोडी. (NAS-ASER पातळी). (फ) हुशार गती कमी असलेल्या विदयार्थ्यांची जोडी. (PISA-ASER पातळी.) विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांची आवड असते त्या आवडीला जोपासण्याचे काम एकमेकांनी शिकायला व शिकवायला संधी दिली की होते. विदयार्थ्यांच्या आवडीच्या विषयानुसार Peer केल्यास मुलांना अधिक गती येते. अशा प्रकारचे Peer केल्यास अधिक फायदा होईल.

वरील जोड्यांचे विविध प्रकार करीत असताना या जोड्या विशिष्ट कालावधीनंतर बदलत गेल्या पाहिजेत. आपण पाहतो की, वर्गात वीस-पंचवीस मुले असली तरी सर्व मुले सर्व मुलांसोबत मिसळत नाहीत. विशिष्ट मुलांचे गट किंवा जोडीदार तयार होतात ते त्यांच्यासोबतच राहायला, खेळायला प्राधान्य देतात. वरीलप्रमाणे जोड्या केल्या

की वर्गातील सर्व मुलांचा वैयक्तिक पातळीवर संबंध येतो वर्गातील सर्व मुलांमध्ये एकोपा निर्माण होतो, ज्यामुळे एकविसाव्या शतकातील सहयोग (Collaboration), संवाद (Communication), आत्मविश्वास (Compassion) আছি Confidence विकसित होतात. शाळेतील विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या विषयात रस घेत असतात. त्यातील काही विषय शाळेत शिकविले जातात, तर काही शिकविले जात नाहीत. शाळेत शिकविले जात नाहीत याचा अर्थ ते महत्त्वाचे नाहीत असा होत नाही, परंतु शाळा स्तरावर सर्वच विषय प्रत्येकाला हव्या त्या स्वरूपात शिकविण्याला मर्यादा येतात. त्या मर्यादा ओलांडण्याचे काम गटामधून होत असते.

वर्गातील मुलांची जोडी : एकाच वर्गातील दोन मुलांच्या जोड्या यात अपेक्षित आहेत. एखादी बाब एकट्याने शिकणे आणि ती जोडीदारासोबत शिकणे यात फरक आहे. जोडीदारासोबत शिकल्यास सदर बाबीचे स्वतःच्या आकलनाव्यतिरिक्त पैलू लक्षात येण्याची शक्यता अधिक आहे. दोघांना एकमेकांची मदत झाल्यामुळे अध्ययन गती वाढते. वर्गातील मुले विविध स्तरात असतात. त्यांच्या वेगवेगळ्या आकलन क्षमता एकमेकांना अध्ययनास पूरक ठरतात. वर्गातील अध्ययन गती चांगली असणाऱ्या मुलांचा उपयोग अध्ययन गती तुलनेत कमी असणाऱ्या मुलांसाठी करून घेता येतो. वर्गात चालणाऱ्या दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रत्येक वेळी या मुलांची एकमेकांना मदत होते. विविध घटकांमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच स्वाध्याय बाबतीत त्यांची एकमेकांना मदत होते.

शाळेतील मुलांची जोडी शाळेतील वरच्या वर्गातील एक विद्यार्थी व खालच्या वर्गातील एक विद्यार्थी

मिळून एक जोडी. बहुवर्ग अध्यापन करीत असलेल्या शाळेत याचा जास्त उपयोग करून घेता येतो. विदयार्थी जेव्हा घरी असतात, तेव्हा वर्गातील जोडीदार सोबत असेलच असे नाही, त्यावेळी शाळेतील जोडी करताना शेजारील विदयार्थी सोबत असेल असे प्रयोजन करता येईल. जेव्हा आपल्याला आपल्या वर्गातील मुलांना वरच्या इयत्तांच्या संदर्भातील क्षमता किंवा मोठ्या मुलांच्या सवयी व संस्कार रुजवायचे असतात, तेव्हा अशी जोडीची मदत होते. उदा., वाबळेवाडीतील इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थी programming आणि coding करतात. शिक्षकांची अपेक्षा होती की, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पण programming आणि coding यावे पण नेहमीप्रमाणे शिक्षकांनी न शिकविता. मग त्यांनी वरच्या इयत्तेतील एक विद्यार्थी आणि खालच्या वर्गातील एक विद्यार्थी अशा जोड्या तयार केल्या. वरच्या वर्गातील मुलांची मदत खालच्या वर्गातील मुलांना शिकण्यासाठी करून घेण्याचे नियोजन केले. याचप्रमाणे विदयार्थी शिकत असलेल्या वर्गाच्या व्यतिरिक्त पुढील वर्गातील क्षमता प्राप्त करून देण्यासाठी याचा उपयोग होतो. विविध प्रकल्प करीत असताना खालच्या वर्गातील विद्यार्थी वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत असला तरी याचा फायदा विदयार्थ्याला होतो. गरजेनुरूप जोडी, परस्पर चर्चा, दोघांनी मिळून करावयाचे प्रकल्प किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण बाब करावयाची झाल्यास अशी गरजेनुरूप जोडी करता येतील.

अशा विविध प्रकारच्या जोड्या उपयोगात आणल्यास मुलांचा जास्त मुलांशी संपर्क येतो. एकाच जोडीदारावर अवलंबून न राहता विविधता कळते. तसेच एखादे मूल एका जोडीदाराकडून शिकण्यात अडचण येत असेल तर इतर मुलांशी जोडी बरोबर काम करताना अधिक शक्यता पडताळता येतात. त्यातून शिकण्याच्या संधी वाढतात. वर्गातील जोडी वर्गातील घटक दृढ करेल. शाळेतील जोडी इयत्तांच्या घटकांचे बंधन तोडून घटक दृढ करेल. गरजेनुसार तयार झालेली जोडी ही विशेष प्रसंगी अनुधावन अथवा असर पातळीवर पार करण्यासाठीच्या विशेष प्रयत्नाचा भाग असेल- या गरजेनुसार जोडीची व्यापकता आणि आवाका प्रचंड आहे. यात विशेष कौशल्य प्राप्त विदयार्थी इतरांना मार्गदर्शन करतानाही जोडी बनू शकते आणि नंतर गल्ली मित्र किंवा गल्लीतील /गावातील जोडी. शाळा हे शिक्षणाचे मर्यादित

मुळे

त.

रूप आहे तर समाज हे शिक्षणाचे अफाट रूप आहे. समाजरूपाने मिळणारे शिक्षण नियंत्रित वा संयमीच असेल असे नाही; म्हणूनच तर नको त्या गोष्टीही विद्यार्थ्यांनी अजाणतेपणी शिकलेल्या दिसत नियंत्रित वा संयमीच असेल असे आणि नियंत्रित शिक्षण समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी गल्ली मित्र ही संकल्पना कमालीची यशस्वी उस शिकारि मुलांना परिसराची आणि जीवनाची भाषा भावते. शाळेत त्याला नाही म्हटले तरी काही अंशी यांत्रिकता येते. तेव्हा त्यांच्या जीवनाची भाषा जास्त प्रभावी ठरते. असे नसेल तर मग कविता पाठांतर करू न शकणारे विदयार्थी वित्रपटातील भली मोठी गाणी कशी पाठ करतात? कीर्तनकार बुवांनी सांगितलेल्या गोष्टी मुलांच्या लक्षात असतात; पिया शिक्षकाने सांगितलेल्या का नाही? मित्र सोबत असताना कमालीची कृतिप्रधान असणारी मुले शाळेत निराशेच्या छायेत का असतात? याचे उत्तर जीवनाच्या भाषेत दडलेले आहे, हव्याहव्याशा सोबतीत दडलेले आहे.

शिकायला आणि शिकवायलाही कारण पाहिजे. विनाकारण केलेली कृती जीवनाभूती म्हणता येईल अशा अनुभवांना मुकते. येथे प्रत्येकालाच दुसऱ्याला शिकवायचे आहे; म्हणजे शिकायला कारण आहे. शिकविताना अचूकता जपायची आहे म्हणजे अभ्यासाचा परीघ वाढणार आहे. शिकविलेल्या घटकाला समोरचा मित्र दाद देणार आहे, नंतर शिक्षकही, म्हणजे ही अनुभूती जीवनमर पुरणार आहे.

सहाध्यायी अध्ययन (Peer learning) योजना कार्यान्वित करताना येणारी आव्हाने –

“१) सहकार्य करीत नाही, त्याला सांगूनही समजत नाही, परस्पर विदयार्थ्यांकडून तक्रारी.

२) शिक्षकांना अपेक्षित अध्ययन न करणे, मुलांचे होणारे विचलन.

३) जास्त वेळ अवधान केंद्रित न होणे.

४) जोडीपैकी एक जोडीदार गैरहजर असणे.

वरील सर्व आव्हानांचे मुख्य कारण आहे त्यांना जोडीने काम करण्याची सवय नसणे, त्यांच्या आवडीच्या विषयापासून त्यांना कामाची संधी दिली की, संस्कृती विकसित होण्यास मदत होते. एकदा संस्कृती निर्माण झाली की, शिक्षकाला वाटणारे कठीण विषयही मुले सहज शिकू लागतात.

सहाध्यायी अध्ययन (Peer learning) आव्हानांना सामोरे जाताना –

१) Peer learning ची सवय नाही म्हणून आव्हाने आहेत. एकदा सवय झाली की, सर्व आव्हाने संपणार आहेत.

२) संयम आणि सातत्य ठेवणे.

३) गरजेनुरूप विविध जोड्या तयार करणे. (कधी कधी जोडीदार बदलल्यामुळे पण अध्ययन गती वाढू शकते.) ४) विदयार्थ्यांना आवडणाऱ्या आव्हानांपासून कामास सुरुवात करणे. (पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त कामे देणे.)

५) सुरुवातीस जोडीने करत असलेल्या कामात जातीने लक्ष घालणे, सतत प्रेरित करीत राहणे.

६) मुलांना जोडीतील त्यांची भूमिका व जबाबदारी समजण्यास मदत करणे.

) Peer learning मुळे मिळणारा आनंद याची अनुभूती करून देणे. यश दाखविणे व आनंद घेण्यास शिकविणे.

(७ ८) जोडीत शिकण्याचीच नाही, तर शिकवण्याची भूमिका पण करता येईल अशी व्यवस्था करणे.

जोडीमध्ये काम करण्याची सवय लावताना काही सोप्या कृती दिल्यास मुलांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित होऊन सोबत काम करण्याची आवड निर्माण होते. उदा. सुनिता वाघ मॅडम या काटा शाळेत कार्यरत असून दुसऱ्या वर्गाला शिकवतात. त्यांची तक्रार असायची की, माझ्याकडील मुले लहान आहेत त्यांना peer मध्ये काम करायला दिले की खूप गोंधळ होतो. वर्ग नियंत्रण करायला त्रास होतो, वर्ग आहे असे वाटतच नाही, शिकविणे पण होत नाही.

मॅडमच्या वर्गात आम्ही काही तासिका काम केले आणि खालील कृती करून पाहिल्या. प्रथमतः peer मध्ये काम करत असताना होणारा गोंधळ हा गोंधळच असेल असे नाही. वर्गातील मुलांच्या गप्पा-गोष्टी, खेळणे, याकडे कायम गोंधळ म्हणून पाहणे हे शिक्षणक्षेत्राच्या अपयशाचे मुख्य कारण आहे. सदर बाब त्यांच्या लक्षात येण्याकरिता peer मध्ये बसलेल्या मुलांच्या गप्पा-गोष्टी ऐकायला सांगितल्या ते कोणत्या विषयावर बोलतात? काय बोलतात? कशासाठी गोंधळ घालतात ? हे आम्ही तिघांनी निरीक्षण केले, केलेल्या निरीक्षणावर गप्पा मारल्यावर असे लक्षात आले की, बहुतांश मुले दिलेल्या अभ्यासावरच बोलत होती. काही मुले दिलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने इतर बाबींवर चर्चा करीत होते. मॅडमला काय अपेक्षित आहे यावर चर्चा करून peer चे मत बनवीत होते. मॅडमने कबूल केले मी याला गोंधळ समजत होते, परंतु हे तर खरे शिक्षण आहे. अर्थात काही मुलांचा प्रतिसाद नव्हता हेही खरेच आहे. प्रतिसाद का नव्हता या कारणाचा शोध घेतला असता असे लक्षात आले की, त्यांना peer किंवा गटामध्ये काम करण्याची सवयच नाही. peer मध्ये काम करण्याची सवय नसेल, तर सवयीसाठी आवडत्या विषयापासून सुरुवात केली तर कामाची स्वीकारार्हता वाढते व सवय लवकर लागण्याची शक्यता असते. एकदा का peer किंवा गटामध्ये काम करण्याची सवय झाली की मग कठीण, अनोळखी, नावडती कामेही करता येतात. शाळेत मात्र peer मध्ये शिकविण्यास किंवा शिकण्यास सांगितले की, सरळ अभ्यास दिला जातो. आता अभ्यास किती मुलांना आवडणारा, ओळखीचा आणि सोपा असतो हे आपल्याला माहीतच आहे. मुलांना peer आणि गटात काम कारण्याची सवय लागण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या आवडीचे, खेळ वाटावे असे काम देणे गरजेचे आहे. खोलात विचार केला तर आमचे दोघांमध्ये खेळले जाणारे बरेचसे खेळ vec delta peer साठी पूरक नसून विरोधी किंवा स्पर्धा निर्माण करणारे असतात. त्यात एक जिंकणार, तर दुसरा हरणार. ज्याची रचना विरोधी खेळाडू म्हणून केलेली असते. उदा. कॅरम, बॅडमिंटन, विटी दांडू इ. खेळाडूची स्थिती पण समोरासमोर लढण्यास, खेळण्यास सज्ज असणारी. त्याचा परिणाम की काय दोघांनी मिळून काम करण्याचा अभाव दिसतोच.

मुलांना peer मध्ये काम करण्याची सवय लागावी म्हणून कृती करायला सांगितल्या.

१) तुम्हांला आवडेल त्या मित्र-मैत्रिणींसोबत Peer मध्ये जाऊन बसा आणि तुम्हांला हव्या त्या विषयावर त्यांच्याशी बोला. (मुलांना वेळ दिला, त्यांना हवे तसे बसू दिले, शिक्षकाला अडथळा करू दिला नाही. मुले एकमेकांच्या समोर तोंड करून बसली. भांडण करायला पण हीच स्थिती हवी असते. आम्हांला ती एकमेकांच्या जवळ, बाजूला बसलेली हवी होती पण तसे त्यांना सांगितले नाही.)

२) मुलांना विचारले तुम्हांला चित्रे काढायला आवडतात का? त्यांचा हो असा प्रतिसाद आला. मुलांना सांगितले चित्रकलेची वही काढा. सर्वांनी वह्या काढल्या. पुढील सूचना होती दोघांपैकी एकाची वही बाहेर ठेवा. काहींनी ठेवल्या, तर काहींची कोणाची वही ठेवायची यावर एकमत होत नव्हते. आता माझी ठेवतो, पुढच्या वेळी तुला ठेवावी लागेल असा करार पण झाला. “एकाच वहीवर दोघांनी तुम्हांला हवे ते चित्र काढायचे.” मुलांनी एकाच वहीच्या दोन स्वतंत्र पानांवर चित्र काढायला सुरुवात केली. परस्पर विरोधी तोंड करून बसलेली मुले मांडीला मांडी लावून बसली आहेत, कुठल्याच प्रकारचा गोंधळ न करता त्यांचे काम सुरू होते.

३) दुसऱ्या टप्यात दिलेलेच काम करायचे परंतु थोडासा बदल. एकाच वहीवर दोघांनी चित्र काढायचे; पण आता वहींचे एकच पान वापरायचे, एकाच पानवर दोघांनी चित्र काढायचे. मुलांनी अर्धे-अधे पान वाटून घेतले आणि चित्र काढणे सुरू ठेवले. मुलांमध्ये अधिक जवळीकता निर्माण झाली.

४) तिसऱ्या टप्प्यात दिलेलेच काम परंतु थोडासा बदल-एकाच वहीवर एकाच पानावर दोघांनी मिळून एकच चित्र काढायचे. मुलांनी विचार केला चित्र ठरविले, चर्चा झाली कोणी काय काढायचे? याविषयी बोलणे झाले, चित्र काढायला लागले. दोघांमध्ये समन्वयाचे उत्तम उदाहरण आम्ही पाहत होतो.

५) चौथ्या टप्प्यात दिलेलेच काम परंतु थोडासा बदल-एकाच वहीवर एकाच पानावर दोघांनी मिळून एकच चित्र काढायचे; परंतु आता दोघांनी एकच पेन्सिल वापरायची. चार मध्ये जे घडले ते येथेही घडले. खूपच छान समन्वय मुलांमध्ये दिसून आला. ते करीत असेलेले काम पाहून मजाही खूप येत होती.

वरील प्रकारे peer किंवा गटामध्ये काम करण्याची सवय लावण्यासाठी अशा प्रकारच्या कृती घेता येतात. या कृतीतून Collaboration, Communication, Compassion सारखी एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये विकसित होण्यास मदत होते.

गट अध्ययन :

अध्ययन-अध्यापनाच्या गरजेनुरूप वर्गातील किंवा वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा गट तयार करणे. गटात तीन ते चार वि‌द्याथ्यर्थ्यांचा समावेश असतो. वेगवेगळ्या क्षमता, संमिश्र अध्ययन गती असणाऱ्या मुलांना गटात सहभागी करून घेतल्यास विद्यार्थ्यांना परस्परांचा फायदा होतो. गट करण्याच्या पद्धतीत विविधता आणण्यासाठी वि‌द्यार्थ्यांच्या अध्ययन गतीनुसार हुशार विदयार्थ्यांचा गट, मध्यम विदयार्थ्यांचा गट, अध्ययन गती कमी असणाऱ्या विदयार्थ्यांचा गट याप्रमाणे गट करता येतील. विविध प्रकल्प व विषयातील आवड पाहून वेगवेगळे गट करता येतात. गटामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीशिवाय शिकण्याच्या अविरत संधी निर्माण होतात.

Peer मध्ये येणारी आव्हाने गटामध्ये पण असतात त्यावर मात करण्यासाठी peer प्रमाणे अधिक विचार करता येईल. काही कालावधीनंतर गटात बदल करणे किंवा मुलांना एकाच गटात न ठेवता त्यांना वर्गातील, शाळेतील जास्तीत जास्त मुलांसोबत संबंध कसा येईल याचे नियोजन करीत राहायचे.

विषयमित्र :

मुले ही मुलांकडून चांगल्या गतीने आणि पद्धतीने शिकू शकतात. मुलांना शिकत असताना जर काही शंका असतील, तर सर्वच मुले शिक्षकांना विचारत नाहीत याचे कारण एकतर भीती असते किंवा अपमान होईल ही भावना असते. शंका मनामध्ये ठेवून अध्ययनाचा प्रवास सुरू झाला की, त्या रस्त्यावर एक थांबा येतो त्याचे नाव अप्रगत अवस्था. गरज असणे किंवा आवड असणे या दोनच अवस्थेमध्ये शिक्षण साध्य होऊ शकते आणि तणावरहित मानसिक अवस्था ही शिक्षणासाठीची मूलभूत गरज असते. प्रत्येक मुलाची शिकण्याची गती कधीही सारखी असू शकत नाही. काही मुलांना एकदा सांगितल्यावर समजते, तर काही मुलांना तीच गोष्ट दोनदा किंवा तीनदा समजून घ्यावी लागते हा प्रत्येकाचा एक नैसर्गिक वेग असतो. पटसंख्या जास्त असणे किंवा शिक्षक कमी असणे अशा परिस्थितीमध्ये शिक्षक या मुलांना त्यांच्या गतीनुसार शिकण्याचा संधींबाबत न्याय देऊ शकत नाहीत. अनेक बहुशिक्षकी व द्विशिक्षकी शाळांचा विचार केला तर, जवळपास जिल्हा परिषदेच्या ८० टक्के शाळांमध्ये अशीच परिस्थिती आहे. अशा शाळांसाठी तर ही विषयमित्र योजना एक वरदानच आहे.

यासाठी आपल्या शाळेतील मोठ्या वर्गातील काही हुशार व उत्साही मुलांची मदत घ्यावी लागते या वर्गामधील साधारण पटसंख्येनुसार सहा किंवा बारा मुलांचा गट मदतीला घेऊन त्यांना ज्या विषयात रुची आहे अशा विषयांची

जबाबदारी त्या मुलावर किंवा मुलांच्या गटावर दयावी लागते. पटसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक विषयाची जबाबदारी एक किंवा दोन किंवा तीन मुलांवर दिल्यास ही मुले आपल्या स्वतःच्या अभ्यासाबरोबर त्यांच्यावर जबाबदारी असलेल्या विषयाचाही पूर्णपणे अभ्यास करतात व आपल्या सहकारी मित्रांना जर काही शंका असेल तर कोठेही त्यांना मार्गदर्शन करू शकतात. इतर वर्गातील मुले ज्यावेळी त्यांना एखादया विषयामध्ये शंका उत्पन्न होईल त्यावेळी त्या विषयाचा विषय मित्र मुलांशी ते संपर्क साधून ती शंका निरसन करून घेतील. ही मुले अगदी सहजपणे न घाबरता आपली शंका विषय मित्रांना विचारतात. विषय मित्रांनाही इतर मुलांना शिकविण्यास खूप आनंद वाटतो. शंका निरसन होईपर्यंत ही मुले तीच शंका वारंवार विषय मित्रांना विचारू शकतात जे शिक्षकांच्या बाबतीत घडू शकत नसते.

शिक्षकांच्या अनुपस्थितीत किंवा शिक्षक काही काम करीत असतील त्या वेळी अथवा असे काही नसून केवळ एक वेगळा अनुभव म्हणून विषय मित्र मुलांना काही पायाभूत गोष्टी शिकवू शकतात. अशी संधी मुलांना दिल्यास त्याचाही खूप चांगला परिणाम दिसून येतो. अध्यापनाचा अनुभव हा त्या मुलांना शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासही देऊन जातो आणि इतर मुलेही सहजपणे शिकतात.

विषयमित्र योजनेच्या अनुषंगाने शाळेमध्ये एक अशी समांतर व्यवस्था उभी राहत असते जिथे शिक्षकांव्यतिरिक्त अध्ययन, अध्यापन, शंका समाधान, नवनिर्मिती आदी गोष्टी सहजपणे घडत असतात. सकाळी शाळेच्या वेळेच्या अगोदर एक तास अथवा शाळेनंतरच्या वेळेत ही मुले इतर मुलांच्या गटासोबत संस्थेने काम करतात. गृहपाठ वा स्पोकन इंग्लिश, गणित तयारी इत्यादी विषयांमध्ये फार चांगला परिणाम देऊ शकतात. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त घरी दिलेल्या गृहपाठाबद्दल जरी काही शंका असतील तर, त्यासाठी मुलांना एक हक्काची समांतर व्यवस्था गावात उपलब्ध असते. त्यामुळे शिक्षणाबाबतच्या भीतीचे वातावरण निश्चितपणे कमी होते.

विषयमित्र निवडून त्यांच्या विषयासंदर्भातील ओळख मुलांना करून दयावी लागते व शालेय वेळापत्रकामध्ये प्रत्येक वर्गावर दिवसातून किमान एक तासिका विषय मित्रांसाठी राखून ठेवावी लागते. बौद्धिक व शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, मानसिक, भावनिक पातळीवरही pi विषय मित्र योजनेचा फार चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो. विषयमित्र योजना आपल्याला लोकशाहीमूल्ये शिकविते. ही लोकशाही मूल्ये विदयार्थ्यांच्या नसानसात भिनविते ज्यावर त्यांना भविष्यात वाटचाल करायची असते.

सात वर्ग, सव्वा दोनशे मुले, दोनच शिक्षक आणि तरीही शासकीय मूल्यांकनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक ही अशक्य वाटणारी; परंतु वाबळेवाडीची सत्य परिस्थिती निर्माण होण्यासाठी विषयमित्र योजना एक मुख्य कारण आहे. मुख्य विषयांबरोबर उपविषयासाठीही आपण विषय मित्राची नेमणूक करू शकतो. शाळेमध्ये मुलांच्या भावविश्वात समरस होऊन अशी समांतर व्यवस्था निर्माण केल्यास शाळेला स्वतःची उद्दिष्टे गाठण्यात तर मदत होतेच शिवाय मुलांना आपण आनंदही देऊ शकतो.

 

Leave a Comment