ladki bahin yojana mahiti लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे ? त्याकरिता लागणारी महत्वाची कागदपत्रे येथे पाहूया 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana mahiti लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे ? त्याकरिता लागणारी महत्वाची कागदपत्रे येथे पाहूया

महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना अमलात आणले आहे त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तसेच लाभ घेण्यासाठी लागणारी इतर सर्व कागदपत्रे यासंबंधी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने महिलांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे त्यासाठी महिलांकडून अर्ज देखील भरून घेण्यात आलेले आहेत या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेली आहे तसेच महिलांसाठी याची वयोमर्यादा देखील ठरवलेली आहे ती वयोमर्यादा व कोणती कागदपत्रे सादर करावयाची आहेत तसेच अर्ज कुठे द्यायचा आहे रजिस्ट्रेशन कसे करायचे आहे या संबंधी सर्व माहिती सदर पोस्ट मधून आपण पाहणार आहोत.

ladki bahin yojana mahitiमाझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024 याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली होती या अर्थसंकल्पामध्ये महिलांना तसेच विविध घटकांना चांगल्या योजना महाराष्ट्र शासनाने आणलेले आहेत त्यामधील एक योजना म्हणजे महिलांसाठी दीड हजार रुपये माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत देण्यात येणार आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक केलेले आहे.

ladki bahin yojana mahitiमाझी लाडकी बहीण योजना

 

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने या योजनेचा शुभारंभ केलेला आहे वर्ष 2024 पासून ही योजना चालू करण्यात आलेली आहे तसेच या योजनेचे लाभार्थी राज्यातील गरीब व निराधार महिला असणार आहेत.

तसेच या योजनेचे उद्दिष्ट देखील ठरविण्यात आलेले आहे गरीब महिलांना आर्थिक दृष्ट्या सबल करणे तसेच स्वावलंबी बनवणे हा एक यामागचा मोठा उद्देश आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करणे तसेच महिलांमध्ये स्वाभिमान जागृत करणे हा देखील या मागचा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये एवढे मानधन मिळणार आहे

अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे असणार आहे या

योजनेची सुरुवात एक जुलै 2024 पासून करण्यात आलेली आहे तसेच

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 असणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट खालील प्रमाणे आहे 

ladkibahin.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पोर्टल खालील प्रमाणे आहे 

NariDoot App 

माझी लाडकी बहीण योजना उद्देश

लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की महिलांचे आर्थिक दृष्ट्या सबलीकरण करणे तसेच सक्षम महिलांना बनवणे महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच महिलांना स्व ची जाणीव करून देणे स्वाभिमानी वृत्ती जोपासणे हा देखील यामागचा मुख्य उद्देश आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या महिलांना मिळणार लाभ निकष येथे पहा 

1.सदर महिला या राज्याच्या रहिवाशी असाव्यात

2.महाराष्ट्र राज्यातील विधवा विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांसाठी योजना आहे

3.महिलांचे कमीत कमी वय 21 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्षे वय असावे

4.यासाठी महिलांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे गरजेचे आहे.

5.ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे

माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

1. सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे

2. आधार कार्ड असणे गरजेचे आहे

3. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र तसेच जन्म दाखला राशन कार्ड किंवा मतदान कार्ड असणे गरजेचे आहे

4. उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याकडून घेणे बंधनकारक आहे

5. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत

6. KYC साठी फोटो पासपोर्ट फोटो

7. राशन कार्ड

8. माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींचे पालन बाबतचे हमीपत्र

माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अधिकृत वेबसाईट तसेच ऑनलाइन पोर्टल वर किंवा मोबाईल ॲप वर किंवा सेतू सुविधावर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा चार्ज घेतला जाणार नाही सर्व निशुल्क प्रक्रिया आहे.

खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा 

https://chat.whatsapp.com/Hw4Beg1sbWy1VRlWDnLCN9

Leave a Comment