क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन २०२४-२५ करीता चाचणी व्दारे निवासी व अनिवासी खेळाडूं करीता नवीन प्रवेश देणे बाबत krida prabodhini pravesh
शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन २०२४-२५ करीता सहुळ व कौशल्य चाचणी व्दारे निवासी व अनिवासी खेळाडूं करीता नवीन प्रवेश देणे बाबत.”
महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातीलं प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती क्रीडापीठ म्हाळुंगे-बालेवाडी पुणे अंतर्गत राज्यात विविध क्रीडा प्रबोधिनी कार्यरत आहेत. सन २०२४-२५ साठी शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत सदर ०९ क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश (५०%) व कौशल्य चाचणी (५०% ) प्रक्रियेअंतर्गत खालील निकषानुसार निवासी व अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहेत. सदर प्रवेश प्रक्रीया साठी खालील प्रमाणे नियम अटी व शर्ती राहणार आहेत.
१. क्रीडा प्रबोधिनी ठिकाणे –
राज्यात पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, गडचिरोली अशा ९ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. सदर ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी मध्ये क्रीडा प्रशिक्षणार्थीची निवड करण्यासाठी प्रवेश प्रक्रीया राबवण्यात येणार आहे.
२. क्रीडा प्रबोधिनी मधिल क्रीडा प्रकार –
ज्युदो, जिम्नॅस्टीक्स, हॉकी, शुटींग, फुटबॉल, जलतरण, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हॅन्डबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग, बॉक्सींग अशा १७ क्रीडा प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते.
३. प्रवेश प्रक्रीया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी –
सरळ प्रवेश प्रक्रिया : क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरांवर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.
खेळनिहाय कौशल्य चाचणी: क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्यासंबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय १९ वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जातो.
वैद्यकीय चाचणी उपरोक्त चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाव्दारे चाचणी घेवून क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येत
४. जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर चाचण्या आयोजित करताना करावयाची कार्यवाही –
अ. जिल्हास्तर –
१. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विभाग व राज्य क्रीडा प्रबोधिनी चाचण्यां बाबत माहिती शैक्षणिक संस्था/शाळा/क्रीडा संस्था मंडळे/एकविध खेळ संघटना यांना परिपत्रक/पत्र काढून अवगत करण्यात यावा.
२. जिल्हायास्तरावर क्रीडा प्रबोधिनी विभाग चाचणीसाठी सहंमागी होणा-या खेळाडूंची नावे नोदणी करण्यात यावी. खेळाडूंचे नाव, जिल्हा, खेळप्रकार, जन्मदिनांक, वय व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र याबाबत माहिती संकलित करून विभागीय चाचणीसाठी पाठविण्यात यावे. खेळाडुचे जन्म दिनांक बाबत योग्य कागदपत्र तपासावीत.
३ . जिल्हास्तरावर नोदणी झालेल्या खेळाडूंची प्रवेशिका परिशिष्ट अनुसार विभागस्तर चाचणीकरिता
चाचणी दिनांकाच्या दोन दिवस पूर्वी पाठविण्यात यावी.
४. क्रीडा प्रबोधिनी चाचणीबाबत विस्तृत प्रसिध्दी स्थानिक वर्तमानपत्रे, मिडिया व इतर आवश्यक ठिकाणी करण्यात यावी.
b विभाग स्तर –
१. विभागस्तरावर कौशल्य व सरळ प्रवेश चाचण्यांचे आयोजन करण्यात यावे.
२. विभागाअंतर्गत जिल्हयातून प्रवेशिका नुसार खेळाडूंची खेळ निहाय चाचण्या घेण्यात याव्यात.
३. विभागीय उपसंचालक यांची खेळनिहाय विभागस्तर क्रीडा कौशल्य चाचणीचे आयोजन दिनांक ८ ते ९.
जुलै २०२४ दरम्यान आयोजित कराव्यात.
४. क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत नव्याने प्रवेश घेण्याच्या खेळाडूंना आगामी प्रशिक्षण घोरणाबाबत माहिती देण्यात याची-
मिशन लक्षवेध अंर्तगत खालील तीन स्तरीय प्रशिक्षण यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहेत.
➡️ राज्यस्तरावर – हाय पररफॉरमन्ससेंटर
➡️ विभागीय स्तरावर – विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर
➡️ जिल्हास्तर- क्रीडा प्रतिभा विकास केंद्र
मिशन लक्ष्यवेध अंतर्गत निवडलेल्या १२ क्रीडा प्रकारांची तीन स्तरावरील प्रशिक्षण यंत्रणा स्था५. केली जाणार आहे. प्रत्येक क्रीडा प्रकाराता तज्ज्ञ व्यतींच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंच्या क्रीडा कामगिरीनुसार विविक्षित क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंची निवड केली जाणार आहे. सर्वसाधारणतः राज्यस्तरावरील सहभागी/पदक विजेत्या खेळाडूंची निवड जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी करण्यात येईल. तर राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंची निवड विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर करिता करण्यात येईल. राष्ट्रीयस्तरावरील. पदक विजेते भारतीय संघा करिता निवडलेल्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या राज्यातील खेळाडूंची निवड हाय पररफॉरमन्स सेंटरकरिता केली जाईल. या निवड झालेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार त्रिस्तरीय प्रशिक्षण यंत्रणेच्या ठिकाणी अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येईल.
उपरोक्त बाबींचा विचार करता क्रीडा प्रबोधिनी मधिल खेळाडूंना यरील प्रमाणे आगामी काळात मिशन लक्षवेध अंतर्गत त्रिस्तरीय प्रशिक्षण सरचनेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संधी उपलब्ध राहणार आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनी मधिल प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना वरील १२ क्रीडा प्रकारातील मिशन लक्षवेध अंतर्गत प्रवेश देताना निर्धारीत केलेली प्रवेशाची मानके पूर्ण करणे आवश्यक राहणार आहेत. याबाबी विचारात घेता खालील
प्रमाणे क्रीडा प्रबोधिनी मध्ये नव्याने प्रवेश घेण्या-या प्रशिक्षणार्थीना या धोरण बाबत माहिती देण्यात यावी. मिशन लक्षवेध अंतर्गत हाय पररफॉरमन्ससेंटर १२ क्रीडा प्रकारात स्थापित करताना सदर सेंटर मध्ये क्रीडा
प्रबोधिनी प्रशिक्षणार्थी प्रवेशाची अर्हता पूर्ण करतील त्यांना प्राधान्य राहील. (राष्ट्रीयस्तरावरील पदक विजेते व भारतीय संघा करितानिवडलेल्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या राज्यातील खेळाडू) क्रीडा प्रबोधिनी मधिल जे प्रशिक्षणार्थी विभागस्तरावर गठीत होणा-या विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर मधिल प्रवेशाची अर्हता पूर्ण करीत त्यांना विभागीय सेंटरमध्ये प्रवेश देण्यात येईल. ज्या ठिकाणी विभागीय सेंटर सुरु होईलसदर ठिकाणी प्रबोधिनी प्रशिक्षणार्थीचा प्रवेश वर्ग करण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील
सहभागी पदक/विजेत्या खेळाडूंची निवड विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर करिता करण्यात येईल.
जे प्रशिक्षणार्थी जिल्हास्तरावरील क्रीडा प्रतिभा केंद्रा मध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सहभागी पदक/ विजेत्या खेळाडूंची निवड जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी करण्यात येईल. सदरचे केंद्रामध्य अनिवासी क्रीडा प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने खेळाडूंना सदर प्रकाराचे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
• क्रीडा प्रबोधिनी प्रवेशित प्रशिक्षणार्थी उपरोक्त प्रकाराचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याचा प्रवेश प्राधान्याने वर्ग करण्यात येईल. सदर खेळाडू या प्रकारचे प्रशिक्षण घेण्यास असहमती दर्शवली तर त्यांचा प्रवेश रद्द करणे
क्रमप्राप्त राहणार आहे.
५. क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळाडूंच्या रिक्त पद संख्या –
राज्यातील ९ क्रीडा प्रबोधिनी मध्ये खेळ निहायरिक्त पदांची संख्या सोबत परिशिष्ट-अ नुसार आहेत. त्यानुसार रिक्त संख्या तसेच खेळाडूंची क्षमता, कौशल्य विचारात घेवून प्रवेश देण्यात येईल. निवडण्यात येणा-या खेळाडूंना राज्यातील कोणत्याहि क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण स्थळ हे क्रीडा संचालनालय स्तरावर निश्चित करण्यात येईल. त्यानुसार प्रवेश संबंधित क्रीडा प्रबोधिनी मध्ये घेणे आवश्यक राहील.
6. सामान्य माहिती –
१. सदर चाचण्यांकरिता येणा-या खेळाडूंनी स्वतः निवास व भोजन व्यवस्था वैयक्तिक स्तरावर करावयाची आहे.
२. सदर चाचण्यांकरिता येणा-या खेळाडूंनी संबंधित स्पर्धेचे प्राविण्य / सहभाग प्रमाणपत्र, वयाचा पुरावा इ माहिती
चाचणीस्थळी आणणे बंधनकारक आहे.
३. सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांच्या कार्यक्रमावाचत राज्यातील सर्व जिल्हयात जाहीर व्यापक
स्वरुपाची प्रसिध्दी सर्व विभागीय उपसंचालक व सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी करावी.
४. सदर मान्यतेत निवड प्रक्रिया राबविताना सरळ प्रवेश प्रक्रियेन्वये जर इच्छुकांची संख्या ५०% पेक्षा जास्त असेल तर अशा प्रकरणी प्रथम त्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा व उर्वरित जागेंवर कौशल्य चाचणीव्दारे
प्रवेश देण्यात यावा.
५. क्रीडा प्रबोधिनी चाचणी आयोजित करताना चाचणीसाठी येणा-या खेळाडूंना पिण्याचे पाणी व्यवस्था, चेजिंग रुम, इ. सुविधा आवश्यक साहित्य तसेच क्रीडांगण तसेच साहित्य पुरविण्यात यावेत. यासाठी स्थानिक स्तरावर पुरेशी तयारी करण्यात यावी. प्रथमोपचार पथक सदर निवड चाचणी ठिकाणी ठेवण्यात यावे.
५. विभागस्तर चाचण्यांचा सविस्तर अहवाल सरळ प्रवेश व खेळनिहाय प्रक्रिया यांची स्वतंत्र पात्र खेळाडूंची निवड यादी, निवड समितीचे सदस्य सचिव यांच्या मान्यतेने दिनांक ११ जुलै २०२४ पर्यंत शिवछत्रपती क्रीडापीठ कार्यालयास mahakridapeeth@gmail.com वर सादर करावा जेणेकरुन पुढील प्रक्रिया करणे सोयिस्कर होईल
६. विभागीय उपसंचालक अमरावती /नागपूर/कोल्हापूर/अकोला/मुंबई यांनी राज्यस्तर चाचणीचा सविस्तर अहवाल सरळ प्रवेश व खेळनिहाय प्रक्रिया यांची स्वतंत्र पात्र व अपात्र खेळाडूंची गुणानुक्रमे अंतिम निवड यादी, निवड समितीचे सदस्य सचिव यांच्या मान्यतेने दिनांक २२ जुलै २०२४ पर्यंत शिवछत्रपती क्रीडापीठ कार्यालयास mahakridapeeth@gmail.com वर सादर करावा.
७. सद्यस्थितीतील महाराष्ट्रात विविध जिल्हयात असलेल्या वातावरणाची स्थिती लक्षात घेता सदर सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्या राबविताना आपल्या जिल्हयात असणारे तापमान व भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चाचण्या घेण्यात याव्यात जेणेकरुन सदर प्रक्रियेत कोणतीही बाधा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
(टिप्पणी मा. आयुक्त महोदयांनी मान्य केली आहे.)