सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्याबाबत krantijoti savitribai fule puraskar 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्याबाबत krantijoti savitribai fule puraskar 

संदर्भ :-

(१) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. साफुपु-२०११/ (१४८/११) समन्वय, दि. १५.१२.२०११

(२) शासन निर्णय, उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्र. साफुपु २०२४/ प्र.क्र.१२/७१६८४५/मशि-२, दि. २.२.२०२४

(३) संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांचे पत्र क्र. उशिस / साफुपु / जाहिरात/प्रशा-३/२०२५/२७२, दि. २८.१.२०२५

प्रस्तावना :-

संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी छाननी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये संचालक, उच्च शिक्षण पुणे यांनी सन २०२२-२३ या वर्षासाठीचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी छाननी समितीचा अहवाल शासनस्तरावरील निवड समितीसमोर सादर केला होता. त्यानुसार सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

सन २०२२-२३ या वर्षासाठीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे खालील विवरणपत्रात दर्शविल्यानुसार राज्यातील सहा महिलांना प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. प्रस्तुत पुरस्कार प्रदान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करुन पुरस्कार प्रदान करण्याची कार्यवाही संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी करावी.

३. सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रमावरील खर्च मागणी क्र.डब्ल्यु ४-२२०५-कला व संस्कृती, ८०० इतर खर्च (०१) समित्या व समारंभ, (०१) (०१) समित्या व समारंभ (२२०५ ०४५८)-०५ बक्षिसे (अनिवार्य) या लेखाशिर्षाखालील सन २०२४-२५ या वर्षातील उपलब्ध मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३०७१२१५१९१३०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Join Now